Greatest Challenges in Space
पृथ्वीबाहेरील जगात दिवसाला अनेक घटना घडत असतात. आपल्या जगापेक्षा पृथ्वीबाहेरील जग खूप वेगळ आहे. पृथ्वीबाहेर पृथ्वीवर असणारे वातावरण उपस्थित नाहीत. तेथील जग हे पूर्णपणे वेगळं आहे आणि त्या जगात कोणत्या गोष्टी कशाप्रकारे घडतात ते आपण आजच्या लेखात पाहणार आहोत, की स्पेस मध्ये काही गोष्टी होतात तर त्या मागे काय कारण असते. अश्या काही गोष्टी आपण आज पाहूया, आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडणार. तर चला पाहूया.
आपल्याला पृथ्वीबाहेरील जगाविषयी प्रत्येक दिवशी काही तरी नवीन बातमी ऐकायला मिळते. मग त्यामध्ये ब्रह्मांडातील नवीन शोध असतील, अश्या प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या आपल्याला या मुळे ऐकायला मिळतात कारण पृथ्वीवरून आपण पृथ्वीबाहेर उपग्रह पाठवलेले असतात. आणि ते उपग्रह आपल्याला माहिती देत असतात. आणि काही गोष्टी ह्या संशोधनामुळे सामोरे आलेल्या असतात. तर आजही अश्या काही गोष्टी पाहणार आहोत की ज्या विषयी आपण याआधी कधीही ऐकलेले नसेल.
अंतराळात ह्या गोष्टींचा सामना करावा लागतो – Top 5 Strangest Things in Space
१) उंचीची वाढ पहावयास मिळते – Increase in Height
जेव्हा मानव अंतराळात जातो तेव्हा सहा महिन्यानंतर त्याच्या उंचीत वाढ पाहायला मिळते. आणि त्यांच्या जमिनीवरील उंचीत अंतराळात गेल्यावर तीन टक्क्यांची वाढ पाहायला मिळते. हे सर्व या मुळे होते कारण तेथे त्यांच्यावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा कोणताही प्रभाव पडत नाही. त्यामुळे त्यांची उंची ही वाढते. परंतु ही वाढलेली उंची जास्त दिवस तशीच राहत नाही, जेव्हा अस्ट्रोनॉट अंतराळातून पृथ्वीवर परत येतात तेव्हा काही महिन्यानंतर त्यांची उंची पुन्हा पहिल्यासारखी होऊन जाते.
२) पाण्याला गरम केल्यावर बुळबुळे निघत नाही – When Water is Heated, the Bubbles are not Form
साधारणतः जेव्हा आपण पाणी गरम करतो तेव्हा आपल्याला पाणी गरम होताना त्यामध्ये बुळबुळे निघताना दिसतात, कारण पाण्याचे तापमान हे वाढत असतं. परंतु जेव्हा अंतराळात पाणी तापवल्या जातं, तेव्हा पाण्यातून कोणत्याही प्रकारचे बुळबुळे आपल्याला निघताना दिसत नाहीत. परंतु अंतराळात पाणी गरम करतेवेळी फक्त एकच मोठा बुळबुळा पाहायला मिळतो. यामागे सुध्दा गुरुत्वाकर्षण असल्याचे वैज्ञानिकांचे मानणे आहे.
३) पृथ्वीपेक्षा अंतराळात मोठ्या संख्येने वाढतात जिवाणू – Bacteria Grow in Large Numbers in Space than on Earth
३० वर्षांच्या एका संशोधनात समोर आले आहे की पृथ्वीच्या मानाने अंतराळात जिवाणूंच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. आणि या वाढीमुळे संक्रमण लवकर पसरण्याची शक्यता असते. आणि हे अंतरळवीरांसाठी खूप जास्त धोक्याची गोष्ट असते.
४) सोडा पिऊ शकत नाही – Can’t Drink Soda
पृथ्वीवर तर खूप चांगल्या प्रकारे आपण सोड्याचा आनंद घेऊ शकतो. आणि त्याला पचवू पण शकतो, परंतु अंतराळात आपण सोडा पी सुध्दा शकत नाही आणि सोडा पिलाच तर त्याला अंतराळात पचवणे खूप कठीण असते, म्हणून अंतराळात सोडा पिल्या जात नाही, यावर उपाय काढत ऑस्ट्रेलिया च्या एक रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये स्पेस बिअर बनविल्या जात आहे. जे स्पेस मध्ये असताना सुध्दा कोणताही त्रास सहन न करता पिल्या जाऊ शकते.
५) घाम तसाच राहतो – Sweat Stays the Same
माणसाच्या शरीरातून प्रत्येक दिवसाला घाम बाहेर पडतोच, मग मनुष्य पृथ्वीवर असो की अंतराळात. माणसाला पृथ्वीवर घाम येतोही आणि पृथ्वीवरील वातावरणामुळे तो सुकतोही, परंतु अंतराळात असे काहीही होत नाही तेथे आपल्याला घाम तर येतो पण तो सुकत सुध्दा नाही आणि खाली टपकत सुध्दा नाही. तो तसाच राहतो. कारण अंतराळात गुरुत्वाकर्षण नाही आहे.
वरील लेखात आपण पाहिल्या काही न ऐकलेल्या गोष्टी ज्या अंतराळात गेल्यावर होत असतात तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!