Marathi Story on Stress Management
देशात आज बरेच लोक तणावाचे शिकार होऊन स्वतःचा जीव सुध्दा देण्यास मागे पुढे पाहत नाहीत, पण काही जाणकार लोकांच्या मते ते लोकं कमजोर नसतात तर त्यांना त्यावेळी हवी असते एका योग्य व्यक्तीची गरज. जर त्यावेळी त्यांना ती योग्य व्यक्ती मिळाली तर ते त्यामधून बाहेर निघतात आणि नवीन आशेने पुन्हा आपले जीवन सुरू करतात, पण तेच तेव्हा त्यांच्या मनातील गोष्टी शेयर करण्यासाठी कोणी मिळाले नाही तर ते जीवनापासून हारून वाईट पाऊले उचलतात. तर आपण किंवा आपल्या आजूबाजूला कोणीही तणावात असेल तर त्याला फक्त मी सोबत आहे तुझ्या हे वाक्य पुरेसे आहे तणावातून बरे करण्यासाठी.
या तणावाविषयी बरेच बोलल्या जात आहे पण तणावातून बाहेर निघण्यासाठी नेमकं काय करणे आवश्यक आहे किंवा त्या परिस्थितीत स्वतःला कश्या प्रकारे सावरायच. ह्यावर आजच्या लेखात आपण एका छोट्याश्या स्टोरी मधून पाहूया. तर चला पाहूया छोटीशी स्टोरी जी तणावातून बाहेर निघण्यास आपली मदत करेल.
डिप्रेशन मधून बाहेर निघण्यासाठी मदत करेल ही बोधकथा – Marathi Story on Stress Management
एका शहरात एक माध्यवर्गीय परिवार राहत होता, आई, वडील, आणि त्यांचा एक मुलगा. त्यांचा मुलगा लहान पणापासून हुशार, मेहनती, आणि सर्वांची आज्ञा पाळणारा. घरात सुध्दा आई वडिलांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन योग्य रित्या करणारा, शाळेमध्ये वर्गातून हुशार, नेहमी चांगल्या मार्कानी पास होणारा, शाळेतील वर्गशिक्षकांचा एकमेव आवडता विध्यार्थी. पण जेव्हा शाळेतून कॉलेजात त्याचा प्रवेश झाला, आणि एक दोन महिन्यांनंतर अचानक तेव्हा त्याचा स्वभाव बदलला.
त्यांनंतर तो कोणाचेही ऐकेना, ना अभ्यासात लक्ष द्यायचा, खोटे बोलून घरून पैसे घेऊन जायचा, या सर्व गोष्टींमुळे सर्वांना अचानक आश्चर्य झाले की या मुलात एवढा बदल अचानक कसा झाला, यामागचे कारण माहिती करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा त्याच्या घरच्यांना कळून चुकले की त्यांचा मुलगा काही वाईट मुलांच्या संगतीत पडला आहे, जे विनाकारण पैशांची उधळण करत असतात, सिनेमा पाहायला जातात धूम्रपान करतात.
यानंतर त्याला घरच्यांनी समजून सांगण्याचे प्रयत्न केले की तू वाईट मुलांच्या संगतीत आहेस तू त्यांच्या नादी लागून स्वतःच आयुष्य खराब करू नकोस, तू तूझ्या अभ्यासावर लक्ष दे तेव्हा तो उलट बोलत होता की, मी आता मोठा झालो आहे. मला काय चांगलं आणि काय वाईट खूप योग्य प्रकारे कळतं. मी जरीही त्या मुलांसोबत राहतो पण त्यांच्या संगतीचा प्रभाव मी माझ्यावर पडू देत नाही. असे त्याचे म्हणणे होते.
असेच बरेच दिवस होत गेले आणि त्यांनंतर त्या मुलाचे परीक्षेचे दिवस आलेत त्याने अभ्यास करायला सुरुवात केली पण जेवढा अभ्यास तो या आधी करायचा तेवढा अभ्यास आता केला नव्हता. आणि परीक्षा तोंडावर येऊन थांबली होती, तेवढ्याच अभ्यासात त्याने परीक्षा सुध्दा दिली पण जेव्हा परीक्षेचा निकाल समोर आला तेव्हा तो एका विषयात नापास झालेला होता.
जो विध्यार्थी नेहमी चांगल्या मार्कने पास होत होता तो आज एका विषयात नापास झाला होता या गोष्टीचे त्याला खूप वाईट वाटले, त्याला एकप्रकारे धक्का बसला होता, यानंतर तो एकटा एकटा राहायला लागला, खूप कमी बोलायला लागला, स्वतःमध्येच काहीतरी विचार करायला लागला, स्वतःच्या खोलीतून बाहेर पडणे सुध्दा त्याला एक प्रकारे खुपत होत. तरीही त्याला सर्वांनी सांगितले की मागच्या निकालाला विसरून समोर होणाऱ्या परिक्षांवर लक्ष केंद्रित कर जे झालं त्याला विसरून जा, पण तो कुणाचेही ऐकायला तयार नव्हता आणि स्वतःला दोष देत होता.
एक दिवस त्याच्या निकला विषयी त्याच्या शाळेतील वर्गशिक्षकांना माहिती झाले, त्यांनंतर त्या शिक्षकांनी त्याला भेटण्याचे ठरवले, आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्या त्या आवडत्या विधार्थ्यांला त्यांनी भेटायला आपल्या घरी बोलावले. दुसऱ्याच दिवशी तो विध्यार्थी त्यांना भेटायला त्यांच्या घरी आला. तेव्हा त्याचे गुरुजी बाहेर अंगणात लाकडांची शेकोटी जवळ बसलेले होते. तेवढ्यात हा विध्यार्थी सुध्दा त्यांच्याजवळ जाऊन बसला. काही मिनिटे एकमेकांत शांतता होती.
पण काही वेळानंतर गुरुजींनी जळत्या शेकोटीतील एक कोळसा बाहेर काढला आणि त्या कोळश्याला मातीत टाकले. त्यानंतर शेकोटी मधून काढलेला पेटणारा कोळसा काही वेळानंतर विझला आणि मुलाने शिक्षकांना विचारले आपण असे का केले, कोळसा तर शेकोटीत चांगल्या प्रकारे जळून आपल्याला उष्णता देत होता, मातीत गेल्यामुळे त्याने आपल्याला उष्णता देणे बंद केले, आता तो कोणत्याही कामाचा राहिला नाही, तेव्हा गुरुजींनी उत्तर देताना सांगितले की नाही कामाचा राहिला नाही असे नाही तर तो अजूनही कामाचाच आहे गुरुजींनी परत त्या कोळश्याला आगीत टाकून मुलाला सांगितले की पहा परत त्याच कोळशाने पेट घेतली आहे. आणि उष्णता सुध्दा देत आहे.
त्याचप्रमाणे तू सुध्दा जेव्हा आपल्या आईवडिलांचे ऐकत होता, अभ्यास करत होता तेव्हा तुझा निकाल सुध्दा योग्य येत होता, पण तू जसा वाईट संगती मध्ये गेला तसाच कोळसा सुध्दा मातीत गेला होता आणि आपल्याला वाटले की तो काहीही कामाचा राहिला नाही पुन्हा जर तू आपल्या अभ्यासावर लक्ष देऊन, आई वडिलांच ऐकले तर तू सुध्दा पुन्हा त्या कोळशाप्रमाणे कामाचा ठरू शकतो. त्याचप्रमाणे जसे मातीतून निघून पुन्हा पेटत्या शेकोटीत कोळसा जातो आणि उष्णता देतो. या गुरुजींच्या गोष्टींनंतर मुलात एक बदल निर्माण झाला आणि तो पुन्हा पहिल्या सारखा एक गुणी मुलगा बनून समाजात वावरू लागला.
माणूस निसर्गाची अशी रचना आहे, जो दुःखांच्या डोंगराला पार करून यशाच्या शिखरावर चढू शकतो. जीवनात नेहमी आशेचा एक दिवा पेटता ठेवा जो नेहमी आपल्याला जीवनाची एक वाट दाखवत राहील. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या मित्रांची काळजी घ्या, स्वतःला कधी एकटं वाटले तर बिनदास्त पणे आपल्या मित्रांशी शेयर करा. हे केल्याने आपला तणाव नक्कीच कमी होताना आपल्याला दिसून येईल.
आशा करतो आपल्याला लिहिलेली ही छोटीशी स्टोरी आवडली असेल आपल्याला लिहिलेली ही छोटीशी स्टोरी आवडल्यास या स्टोरी ला आपल्या मित्रांना शेयर करून तणावापासून दूर करण्यास मदत करा, सोबतच अश्याच नवनवीन स्टोरींसाठी आणि लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!