Story of Mahishasura
पुराणातील कथांच्या नुसार आपल्याला माहिती आहे, महिषासुर एक क्रूर राक्षस होता, त्याच्या अत्याचाराच्या आणि बऱ्याच कथा आपण पुराणात पाहिलेल्या आहेत, तो किती क्रूर होता आणि तो हे सर्व कशाच्या भरवश्यावर करायचा?
ह्या सर्व गोष्टींचे उत्तर आपल्याला पुराणातील कथांमध्ये मिळतेच, तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत कि कशाप्रकारे महिषासुराला वरदान प्राप्त झाले आणि तो मारल्या गेला.
तर चला जाणून घेवूया. आजच्या या छोट्याश्या लेखातून.
दुर्गा मातेने महिषासुराला का मारले? हे होते त्यामागील कारण – Story of Mahishasura
राक्षसांच्या कुटुंबातील रंभ नावाच्या राक्षसाला पाण्यात राहणारी म्हैस त्रिहायणी शी प्रेम झाले, तिच्यापासून महिषासुर नावाच्या राक्षसाची उत्पत्ती झाली.
या कारणामुळे महिषासुर जेव्हा पाहिजे तेव्हा तो मनुष्य आणि पाहिजे तेव्हा म्हशीचे रूप घ्यायचा, पुढे चालून तो राजा बनला.
त्या नंतर त्याने ब्रम्ह देवाची कठोर तपस्या केली, या तपस्सेचा कालावधी होता, दहा हजार वर्ष. इतके दिवस तपस्या केल्यानंतर ब्रम्ह देव प्रसन्न झाले आणि त्यांनी महिषासुर ला वरदान मागायला सांगितले.
त्यावर महिषासुर ने ब्रम्ह देवाला वरदान मागितले कि मला अमरत्व प्राप्त झाले पाहिजे, तेव्हा यावर ब्रम्ह देव म्हणाले, “हे सृष्टीच्या नियमांच्या विरुद्ध आहे, हे वरदान देणे अशक्य आहे, तेव्हा तू दुसरा एखादा वर माग.”
तेव्हा महिषासुर ब्रम्ह देवाला म्हणाला कि मला देव दानव, आणि मानव यांच्या पैकी कोणीच मारू शकणार नाही असा वर द्या तेव्हा ब्रम्हदेव म्हणाले, पुन्हा एकवेळ विचार कर कि असाच वर देऊ ना तेव्हा महिषासुर म्हणाला हो आता बाकी जगात कोणच आहे जो मला मारू शकणार.
यापैकी उरल्या फक्त स्त्रिया ज्या मला कधी मारू शकणार नाहीत असे म्हणत त्याने ब्रम्ह देवाकडून वरदान प्राप्त केले, पण तेव्हा त्याला माहिती नव्हत कि पुढे काय होणार आहे.
वरदान प्राप्त केल्या नंतर तो देवांवर आक्रमण करायला निघाला, त्याने बरेचश्या देवांना टक्कर दिली युद्धामध्ये हरवून टाकले, त्यानंतर तो इंद्रावर आक्रमण करायला निघाला, त्याने इंद्राला सुद्धा हरविले, तेव्हा इंद्र त्राही त्राही करत ब्रम्ह देवाजवळ गेले आणि त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला.
या नंतर ब्रम्ह देव इंद्राला आणि बाकी देवतांना घेऊन शंकर जी कडे गेले, शंकर जी सर्वांना घेऊन भगवान विष्णू कडे गेले. आणि सर्व घडलेला प्रकार सांगितला.
तेव्हा त्यांनी यावर उपाय देत सगळ्यांना सांगितले कि दुर्गा मातेला प्रसन्न करावे लागेल तेव्हाच या राक्षसाचा समूळ नायनाट करता येईल. हे ऐकल्या नंतर सर्व देवतांनी दुर्गा मातेचे आवाहन केले, त्यानंतर दुर्गा माता तेथे प्रगट झाली.
तेव्हा सर्व देव गण मिळून दुर्गामातेकडे मदत मागायला लागले. कि महिषासुर च्या त्रासापासून आम्हाला मुक्ती द्या. तेव्हा दुर्गा मातेने सर्वांना निश्चिंत राहण्यास सांगितले आणि तेथून निघून महिषासुर सोबत लढण्यासाठी गेल्या.
तेव्हा महिषासुर चा अन्याय देवतांवर भारी पडत चालला होता, एका स्त्रीला आपल्या समोर पाहून महिषासुर हसला आणि त्याने दुर्गा मातेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा दुर्गा मातेने त्याच्यावर वार करत युद्ध सुरु केले, तेव्हा दुर्गा मातेने महिषासुर च्या अनेक सेनापतींना मृत्यू दिला.
दुर्गा मातेचे महिषासुराशी नऊ दिवस युद्ध चालले आणि दहाव्या दिवशी महिषासुराचा वध केला. यानंतर बाकी उरलेली सेना पळून गेली,
देवतांनी दुर्गा मातेचा जय जयकार करून केलेल्या मदतीसाठी धन्यवाद व्यक्त केला. आणि एका स्त्री च्या हातून स्त्रीला कमजोर समजणारा राक्षस मारल्या गेला.
स्त्रिया ह्या देवीचच एक रूप असतात, त्यांच्यामध्येच दुर्गा, काली, आणि जगदंबा सारख्या अनेक देव्यांच्या शक्ती आहेत, म्हणून कोणत्याही स्त्रीला कमजोर समजू नये, त्यांचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे.
आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.
सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!