Sonali Kulkarni chi Mahiti
स्मिता पाटील ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीला मिळालेलं एक अनोख वरदान आहे! आज ती आपल्यात नसली तरी तिने भुमिका केलेले चित्रपट पाहिल्यानंतर तिच्यात असलेली समज, प्रगल्भता, अभिनयाची उंची, भुमिकेशी समरस होणं काय असतं ते कळतं.
ती गेल्यानंतर मात्र हे सर्व संपलं असं समजुन केवळ हळहळणं आपल्या हातात आहे. स्मिता पाटील यांच्या अभिनयाशी कुणाची देखील तुलना होऊ शकत नाही परंतू ज्याप्रमाणे एखाद्या शब्दाचा समानार्थी शब्द आपण शोधतो नां तसच स्मिता नंतर सोनाली कुलकर्णी ला पाहतांना जाणवतं.
भुमिका निवडणं, त्यात समरस होणं, अभिनयाची तीच उंची, प्रगल्भता, शब्दफेक, शब्दांची जाण, अभिनयाची जाण, ही सोनालीला आहे हे तिचा अभिनय पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही.
चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी – Actress Sonali Kulkarni Biography in Marathi
सोनाली कुलकर्णी यांचा अल्पपरिचय – Sonali Kulkarni Information in Marathi
नाव: | सोनाली कुलकर्णी |
जन्म: | ३ नोव्हेंबर १९७३ |
शालेय शिक्षण: | अभिनव विद्यालय पुणे |
पदवी शिक्षण: | फर्ग्युसन महाविद्यालय पुणे |
कार्यक्षेत्र: | अभिनेत्री, लेखिका |
पतीचे नाव: | नचिकेत पंतवैद्य |
सोनाली कुलकर्णी याचं करिअर – Sonali Kulkarni Career
आपल्या अभिनयाच्या कौशल्यामुळे सोनालीला अनेक व्यक्तिमत्वांच्या भुमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळाली. समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या जीवनावर ज्यावेळी चित्रपट करण्याचे ठरले त्यावेळी डॉ. सौ. मंदाकिनी आमटेंची भुमिका सोनालीच्या वाटयाला आली.
तीने या भुमिकेचे अक्षरशः सोने केले. समजुन उमजुन, त्या भुमिकेत शिरून अभिनय करण्याचा शिरस्ता असल्यामुळे सोनाली मिळेल त्या भुमिकेत प्राण फुंकते. सोनालीने आजवर अनेक भाषांमधील चित्रपटांमधे अभिनय केला आहे.
सोनाली कुलकर्णी याचे काही मराठी चित्रपट – Sonali Kulkarni Marathi Movie
- मुक्ता
- दोघी
- घराबाहेर
- देवराई
- सखी
- रिंगा रिंगा
- त्या रात्री पाऊस होता
- अगं बाई अरेच्चा २
- पुणे 52, कैरी
- डॉ. प्रकाश बाबा आमटे
- देऊळ
- गुलाबजाम
सोनाली कुलकर्णी याचे काही हिंदी चित्रपट – Sonali Kulkarni Hindi Movie
- दिल चाहता है
- प्यार तुने क्या किया
- टॅक्सी नं. ९२११
- सिंघम
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- मिशन कश्मीर
- दायरा
- अग्निवर्षा
- ब्राईड अॅण्ड प्रज्युडिस
- डरना जरूरी है
- कितने दूर कितने पास
- दिल विल प्यार व्यार
सोनाली कुलकर्णी याचे इंग्रजी चित्रपट – Sonali Kulkarni English Movie
- ब्राईड एण्ड प्रेज्युडिस
- डॉ. आंबेडकर
- सायलेन्स प्लीज.. द ड्रेसिंग रूम
- माया द रिअॅलिटी
- फायर ऑफ माय हार्ट (इटालियन चित्रपट)
- माया मादम (तामिळ चित्रपट)
- यल्लम्मा (तेलगू)
- लव्ह इज ब्लाईंड (गुजराती)
- या अभिनेत्रीने ‘सो कुल’ या पुस्तकाचे लेखन सुध्दा केले आहे.
सोनाली कुलकर्णी यांचा विवाह – Sonali Kulkarni Marriage
सोनाली कुलकर्णीने सुरूवातीला चंद्रकांत कुलकर्णी (लेखक दिग्दर्शक चित्रपट, रंगभुमी) यांच्याशी विवाह केला परंतु त्यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर तीने नचिकेत पंतवैद्य यांच्याशी ती विवाहबध्द झाली. या दोघांना एक कन्यारत्नं देखील आहे.
आपल्या कसदार आणि प्रगल्भ अभिनयाने, उत्कृष्ट वक्र्तृत्वाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सोनाली कुलकर्णीला अभिनयाची अनेकानेक शिखरं पादाक्रांत करायला मिळो याच सदिच्छा!
असेच नवीन माहितीपर लेख वाचण्यासाठी माझी मराठी सोबत कनेक्ट रहा. तसेच या लेखाला फेसबुक वर आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.