Sniffer Dogs are Detecting Coronavirus in German
जगात सध्या सगळीकडे कोरोना विषाणू जास्त प्रमाणात पाय पसरवत आहे. सोबतच बऱ्याच देशांनी कोरोनाच्या पार्शवभूमीवर लॉकडाऊन सुरु केले होते, पण आता लोकांना बऱ्याच प्रमाणात ढील दिली जात आहे,
रशियाने काढलेली लस तिसऱ्या चाचणी मध्ये अडकली आहे, आणि तसेच बरेच देश कोरोनावर लस काढण्याच्या पूर्ण तयारीत आहेत, मग ते ब्रिटन असो कि अमेरिका. ऑस्ट्रेलिया असो कि भारत.
प्रत्येक देश कोरोनाला मात देण्यासाठी हवे तितके प्रयत्न करत आहेत, काही देशांचे प्रयत्न सफलतेकडे जाताना दिसत सुद्धा आहेत. काही देश नवीन गोष्टीच्या शोधात आहेत. जसे बरेच देशांमध्ये आता कोरोनाने संक्रमित असलेली व्यक्ती ओळखण्यासाठी कुत्र्यांना ट्रेनिंग दिल्या जात आहे.
चला तर जाणून घेवूया या नवीन प्रयोगाविषयी.
कुत्रे ओळखतील आता कोरोनाचे रुग्ण – Sniffer Dogs are Detecting Coronavirus in German
नेमका काय विषय आहे?
बऱ्याच देशांमध्ये कोरोनाने संक्रमित असलेल्या व्यक्तींना ओळखण्यासाठी कुत्र्यांना प्रशिक्षित केल्या जात आहे, कारण कुत्रांची वास घ्यायची क्षमता हि मानावापेक्षाही १० हजार पटीने जास्त असते, आणि काही शास्त्रज्ञाचं असे म्हणणे आहे कि कुत्रांच्या या वेगळ्या प्रतिभेला आपण उपयोगात आणून त्यांच्या मदतीने कोरोनाने संक्रमित असलेल्या व्यक्तींना ओळखल्या जाईल.
हे काम जर्मनीच्या काही शास्त्रज्ञांनी शक्य असल्याचे सांगितले आहे, माणसाच्या लाळेच्या मदतीने या सर्व गोष्टी शक्य असल्याचे शास्त्रज्ञ सांगताना दिसत आहेत.
काही शास्त्रज्ञांनी या प्रयोगाला करण्यासाठी जर्मनीच्या सशस्त्र सेनेच्या आठ कुत्र्यांना एका आठवड्यात प्रशिक्षित केले, या कुत्र्यांची टोळी १००० लोकांच्या लाळेचा वास घेत असे. त्यापैकी काही लोक निरोगी होते, तर काही लोक कोरोना संक्रमित.
कुत्रे ठरू शकतात उपयोगी.
कुत्र्यांना या विषयी व्यवस्थित प्रशिक्षण दिल्या गेले तर ते आपल्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते, आणि SARS-CoV-2 ने संक्रमित माणसाच्या लाळेचे नमुने आणि त्याचे संक्रमण नसलेल्या नमुन्यांचे परीक्षण करण्यात कुत्र्यांचे मोठ्या प्रमाणात योगदान ठरू शकते, फक्त त्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण दिल्या गेले पाहिजे,
एखाद्याला कोरोनाचे संक्रमण झाले तर त्याला कुत्रा ओळखू शकतो असा विचार तेथील एका महाविद्यालयाच्या प्रोफेसर ने मांडला, त्यांचे नाव मारेन वॉन कोएक्रिटज़-ब्लिकवेड.
कारण कोरोना विषाणू मुळे माणसाच्या शरीरात वेगवेगळे बदल होत राहतात, आणि त्या बदलांच्या भरवशावर कुत्रे कोरोना संक्रमित व्यक्तीला ओळखू शकतात. या संशोधनात ९४% योग्य परिणाम मिळाले आहेत.
भविष्यात कुत्र्यांचा वापर करून कोरोना संक्रमित लोकांची स्क्रीनिंग केल्या गेल्या जाऊ शकते. आशा आहे लवकर कोरोनाची लस निघेल. आणि सर्वांपर्यंत पोहचेल.
आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहीलेला हा लेख आवडला तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले हा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!