Smell After Rain Petrichor
आपण ते गाणं तर ऐकलच असेल की ‘चिंब भिजलेले, रूप सजलेले, बरसुनी आले, रंग प्रीतीचे’ प्रीतीच्या जागी जर आपण मातीला ठेवले तर, माझा म्हणण्याचा अर्थ असा की जेव्हा पावसाच्या पहिल्या सरी जमिनीवर येतात आणि जमिनीवर पडल्यानंतर एक विशेष गंध आपल्याला देऊन जातात. प्रत्येकाला या सुगंधाशी प्रेम होऊन जाईल असा हा मातीचा सुगंध असतो.
आणि गावाकडे तर पाऊस पडण्याच्या आधीच दुरवर हा सुगंध दरवळत असतो आणि सांगत असतो की पाऊस येत आहे. पावसाची ती पहिली सर जेव्हा जमिनीवर पडते तेव्हा त्या सुगंधाची अनुभूती प्रत्येकाने घ्यावी असा तो सुगंध. आणि या सुगंधाला पेट्रीकोर (Petrichor) म्हटल्या जात. तर आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत की मातीचा हा सुगंध का येतो? आणि यामागे काय कारण आहे? तर चला पाहूया..
पाऊस पडल्यावर मातीचा सुगंध का येतो – When Rain Comes, Smell after Rain
पेट्रीकोर हा एक ग्रीक शब्द आहे, आणि याच अर्थ एक दगड होतो. मेसाचूट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील एका प्राध्यापकांनी याविषयी बोलताना सांगितले, की झाडा झुडपांमधून काही तेलीय पदार्थ उत्सर्जित होत असतात, त्या पदार्थांमध्ये काही जिवाणू उपस्थित असतात. हे जिवाणू एक वेगळ्या प्रकारची रसायने उत्सर्जित करतात, आणि हे उत्सर्जित केलेले जिवाणू जेव्हा पाण्याच्या थेंबांच्या संपर्कात येतात, आणि त्यांच्याशी अभिक्रिया होते आणि त्यांनंतर जेव्हा ते जमिनीवर पडतात त्यानंतर ते हवेच्या बुळबुळ्यांमध्ये रूपांतरित होऊन ते हवेत पसरतात आणि जेव्हा हे बुळबुळे फुटतात तेव्हा ते बारीक कणांमध्ये रूपांतरित होतात त्या कणांना एरसोल म्हटल्या जातं.
हे बारीक कण हवेमध्ये एक वेगळा सुगंध पसरवतात आणि त्यामुळे आपल्याला पावसाचे पहिले पाणी पडल्यावर सुगंध येतो आणि असे वाटते हा सुगंध असाच दरवळत राहावा. आपणही पहिल्या पावसाचा सुगंध अनुभवला असेल तर आमच्याशी शेयर करू शकता. आणि नसेल केला तर येणाऱ्या पावसाळ्यात आपण या पावसाचा सुगंध अनुभवू शकता.
आशा करतो लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!