सरकारच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या सुविधा – Government Facilities for Farmers
मृदा स्वस्थ कार्ड योजना – soil Health Card Scheme
सन २०१५ साली भारत सरकारने ही योजना सुरु केली असून, राजस्थानच्या सुरतगढ येथून या योजनेला सुरवात करण्यात आली. या योजने अंतर्गत जमिनीची चाचणी केली जाते. शेतकऱ्यांना शेती करता उपयुक्त असणाऱ्या जमिनीतील पौषक तत्व, तसेच इतर मुलभूत घटकांची माहिती या कार्ड द्वारे मिळते.
प्रधानमंत्री पीकविमा योजना – Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY)
सन १३ जानेवारी २०१६ साली सुरु करण्यात आलेली ही योजना, शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे. दरवर्षी होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे बऱ्याच प्रमाणात नुकसान होते. जसे, पूर, वादळ, गारपीट आणि मुसळधार पाऊस यामुळे शेतातील पिकं नासून जातात. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास नाहीसा होऊन जातो. याकरता प्रधानमंत्री पीकविमा योजना तयार करण्यात आली आहे.
या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना खरिपाच्या पिकाकरीता २ टक्के, रब्बी आणि तेलबियांच्या पिकांसाठी १.५ टक्के व वार्षिक व्यासायिक बागायती पिकांसाठी ५ टक्के पीकविमा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
निम कोटेड युरिया योजना – Neem Coated Urea (NCU) Scheme
खताच्या सबसिडीमुळे सरकारच्या तिजोरीवर वाढत असलेला भार, तस्करी आणि उद्योग धंद्यातील अवैध वापर रोखण्यासाठी “निम कोटेड युरिया” तयार करण्यात आला आहे. योजना सुरु करण्यामागील सरकारचा उद्देश आहे की, पिकासाठी उपयुक्त असणाऱ्या नायट्रोजनची उपलब्धता वाढावी व खताचा खर्च कमी व्हावा याकरिता ही योजना तयार करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री कृषीसिंचन योजना – Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana
“प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोहचवणे” या उद्देशाने १ जुलै २०१५ साली केंद्र सरकारने ही योजना तयार केली. शेतकऱ्यांना शेती करिता पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, एका शेतापासून दुसऱ्या शेतांपर्यंत सिंचन साखळी निर्माण करणे हा योजनेचा मुख्य हेतू आहे.
परंपरागत कृषी विकास योजना – Paramparagat Krishi Vikas Yojana
सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ही योजना तयार केली आहे. आज शेती करिता उरीया खताच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. युरियाच्या वापरामुळे शेतीची कास कमी होत जाते, परिणामी काही वर्षानंतर उत्पादनात घट होत जाते. मातीचे आरोग्य आणि जमिनीतील पौषक तत्व टिकून राहावे म्हणून सरकारने या योजनेची सुरवात केली आहे.
अश्या प्रकारे काही योजना सरकारने शेतकऱ्यांकरता सुरु केल्या आहेत. या लेखात आम्ही आपल्याला काही ठराविक योजनांची माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे.