Shetkari Status
“शेतकरी सुखी तर जग सुखी” या म्हणीचा आपण शांत पणे विचार केला तर, आपल्याला शेतकरी म्हणजे काय? या गोष्टीची जाणीव होईल. आपल्या देशातील बहुतांश लोकसंख्या ही ग्रामीण भागात वास्तव करत असल्याने, त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतीच्या उत्पादनावर ते आपला उदरनिर्वाह करतात. यामुळे आपला देश हा एकप्रकारे कृषिप्रधान देश आहे असे म्हणने चुकीचे ठरणार नाही. शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात, कारण तो स्वत:ची तहान भूक विसरून शेतात धान्य पिकवूतो व संपूर्ण जगाची भूक भागवतो. आज देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतकरी बांधवांचा खूप मोठा वाटा आहे.
शेतकरी हेच तर खरे निसर्गाचे मित्र आहेत, निसर्गाची हानी होण्यापासून तीचे रक्षण करतात. त्यांचे आपल्या जमिनीशी आई प्रमाणे नात असते. ते आपल्या शेतात कष्ट करून पिक घेतात. ऊन, पाणी, वारा अश्या प्रकारच्या कोणत्याही संकटाला न भिता सतत आपल्या काळ्या आईच्या पोटी मेहनत करत राहतात. आपल्या देशाच्या प्रत्येक भागातील जमिनीमध्ये विविधता आढळते. काही ठिकाणी जमिनी या कोरडवाहू आहेत तर काही ठिकाणच्या जमिनी या ओलिताच्या आहेत. जमिनीच्या प्रकारानुसार शेतात पिक घेतले जाते.
ओलिताच्या जमिनित बारमाही शेती केली जाते. परंतु, कोरडवाहू शेतीत पिक हे ऋतूंप्रमाणेच घ्यावं लागते. उत्पादनाच्या बाबतीती ओलिताची शेती खूप फायदेशीर असते. त्याचप्रमाणे देशातील सर्वच शेतकऱ्यांची परिस्थिती एकसारखी नसते, काही शेतकरी श्रीमंत असतात तर काही गरीब असतात. कोरडवाहू शेती असणरा शेतकरी पूर्णतः निसर्गावर अवलंबून राहतो.
जगाचा पोशिंदा बळीराजासाठी घोषवाक्ये – Farmer Slogans in Marathi

करुनी आपल्या रक्ताचे पाणी शेत पिकवी कास्तकारी.
Marathi Slogan on Shetkari

शेतकरी टिकेल तर शेत पिकेल.
Slogans on Farmers

अन्नधान्य पिकवेल शेतकरी, तर देशात नांदेल सुख समृद्धी.
Shetkari Slogan
जन जनात संदेश पोहचवूया, बळीराजाला आत्महत्ये पासून रोखूया.
Shetkari SMS

शेतकऱ्यांचा करून सन्मान, यातचं खरा देशाचा अभिमान.
Marathi Shetkari Status

बळकट असता शेतकरी, होईलं उन्नती घरोघरी.
शेतकऱ्यांसाठी कोट्स आणि स्टेटस – Status on Farmers
आपल्या देशात कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण जवळजवळ ६० ते ७० टक्के आहे. त्यामुळे ते शेतकरी पूर्णपणे पावसावर अवलंबून असतात. पाऊस चांगला पडला तर चांगले पिक घेऊ शकतात. परंतु, दुष्काळ जन्य परिस्थिती किंवा अतिवृष्टी झाल्यास त्यांच्या पदरी निराशाच पडते. अश्या परिस्थितीवर मात करणे त्यांना खूप कठीण जाते.
अश्या परिस्थितीत तर गरीब शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडते. कारण, त्या शेतकऱ्यांनी बियाण्याच्या सोयी करता सावकाराकडून कर्ज घेतलेले असते, शिवाय घराच्या जबाबदारीच्या ओझ्या खाली तो पूर्णपणे दबला जातो. “काय करु काय नाही!” असे विचार त्याच्या मनी सतत घोगावतात. आपला कर्जबाजारीपणा आणि घरची जबाबदारी या सारख्या विचाराने तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. कारण त्याच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसतो.
शेतकरी असता सक्षम शेती पिकवेल भक्कम.
Jai Jawan Jai Kisan Slogan

साधी राहणी मजबूत बांधा तोच आहे शेतकरी राजा.
Jai Jawan Jai Kisan
जय जवान, जय किसान
Farmer Status

नको लावू फास गळा बळीराजा, तूच आहेस देशाचा पोशिदा खरा.
Marathi Slogan on Shetkari
गाऊ आपण एकचं गाणी, पुसून टाकू शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी.
Shetkari Ghosh Vakya Marathi

समृद्ध शेतकरी सुखी शेतकरी.
शेतकऱ्याविषयी घोषवाक्ये मराठीमध्ये – Slogans On Farmer in Marathi
शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या राखण्यासाठी सरकार देखील प्रयत्न करीत आहे. कारण आज देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणत दिवसांदिवस वाढ होत आहे. आपल्याला वर्तमानपत्रे, दूरदर्शन किंवा आकाशवाणी आदी साधनांद्वारे शेतकरी आत्महत्ये संबंधी बातमी कळते. आपल्या देशातील शेतकरी आपले अन्नदाते आहेत. त्यांची जर अशीच आत्महत्या होत गेली तर आपण अन्नास त्रासून जाऊ. महागाई गगनाला जाऊन भिडेल यातून अनेक समस्यांना तोंड फुटतील याचा विचार आपण आपल्या मनी आणला पाहिजे.

खाऊन भाकर पिऊनी पाणी, कष्ट करी शेतकरी.
Marathi Slogans on Farmers

शेतकरी आहे अन्नदाता तोच आहे देशाचा खरा भाग्यविधाता.
Shetkari Ghosh Vakya

जमिनीवरील एकचं तारा शेतकरी आमचा न्यारा.
Farmer Quotes

करुनी सर्व संकटावरी मात शेतकरी राबतो दिवसरात.
Farmer Quotes in Marathi

कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा किंवा बरसत असो पावसाच्या ओल्याचिंब धारा तरी राबतो आपला सर्जाराजा.
शेतकऱ्यांसाठी मॅसेज मराठीमध्ये – Massage On Farmer in Marathi
शेतकरी आपल्या रक्ताचे पाणी करून उपाशी पोटी दिवस आणि रात्र आपल्या शेतात राबराब राबतात परंतु त्याच्या पदरी पडते काय तर आत्महत्या व कर्जबाजारी. देशातीलं सरकारने याच्यावर लवकरात लवकर काही पर्याय शोधला पाहिजे. त्यांच्या करिता सरकारमार्फत कमी दारात उत्तम दर्जाच्या बियाण्याची सोय उपलब्ध करण्यात आली पाहिजे. तसेच, त्यांना सरकारी बैंक मार्फत कमी व्याजदरावर कर्ज दिल पहिजे. या प्रकारे शेती उपयोगी जितक्या जास्त सुविधा त्यांना देणे सरकारला शक्य होत असतील तितक्या सुविधा त्यांनी दिल्या पाहिजात.

बळीराजा तू घेऊ नको फाशी, जग राहील तुझविन उपाशी.
Shetkari Thoughts in Marathi

इडा पिडा टळू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे..
Jai Jawan Jai Kisan Slogan
बळीराजा माझा लयं इमानी, कष्टाने पिकवितो पीकपाणी.
Farmers Slogan in Marathi

काळ्या मातीची त्याची खाण, राबी तो त्याच्यात विसरुनी भान.
Shetkari Slogan

कष्टाची खाऊनी भाजीभाकरी, आनंदाने गातो गाणी.
Farmer Status in Marathi

जोडूनी काळ्या मातीशी नाळ, कष्टाने करतो आपल्या काळावर मात.
Shetkari Ghosh Vakya

करून शेती उगवून धान, यातचं खरी बळीराजाची शान.
Shetkari Thoughts

करुनी कष्ट गाळुनी घाम, असां आहे आपला शेतकरी महान.
ज्याप्रमाणे आपल्या देशाचे सैनिक सीमेवर राहून रात्रदिवस आपल्या जीवाची पर्वा न करता देशाची सुरक्षा करतात. त्यानुसार शेतकरीदेखील शेतात धान्य पिकवून देशाच्या उन्नतीत आपले महत्वपूर्ण योगदान देतात. शेतकरी आपल्या देशाचा महत्वपूर्ण घटक आहे. त्यांच्या कार्याची स्तुती जितकी करावी तितकी कमीच आहे. सरकारने तर शेतकऱ्यांच्या नावाने शेतकरी सन्मान योजना देखील सुरु केली आहे.
आजचा शेतकरी हा सुशिक्षित शेतकरी होत चालला आहे, तांत्रिकरित्या शेती करण्याची पद्धत अवगत करून त्या पद्धतीनुसार शेती करण्यावर जास्त भर देत आहे. सरकारने देखील त्यांच्यासाठी विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत जसे की, शेतीच्या संबंधी काही प्रश्न असल्यास मोबाइल सुविधा उपलब्ध केली आहे,त्यावर आपल्या प्रश्नांचे निराकरण होते. तसेच, दूरदर्शनवर सुद्धा कृषी वाहिनी सुरु केली आहे. आकाशवाणीवर देखील शेती संबंधित कार्यक्रम होत असतात. पूर्वीच्या तुलनेने आज शेती क्षेत्र खूप उन्नत झाले आहे.
परंतु, शेतकऱ्याच्या परीस्थित काहीच सुधारणा झाली नाही. त्याला कारणी भूत कोरडवाहू शेती आणि त्या करिता नसलेली पाटबंधारे. कोरडवाहू जमिनीत फक्त वर्षातून तीनच पिक घेतली जातात. त्या ठिकाणी सरकारने पाटबंधारे बांधून शेतकऱ्यांना शेती करता पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. तसेच त्यांना शेत तळी उभारून दिले पाहिजात. जेणेकरून ते सुद्धा आपल्या शेतात बारामाही पीक घेऊ शकतील.
पुढील पानावर आणखी…