Bhrashtachar Slogan
आजच्या काळात भ्रष्टाचार खूप मोठी समस्या झालेली आहे, भ्रष्टाचार हा सार्वजनिक मुद्दा झालेला असून कोणताही पक्ष फक्त राजकारणा इतका त्या मुद्द्याला मर्यादित ठेवत असतात, एक वेळ निवडणुका झाल्या मग कोणत्याही प्रकारची वार्ता त्यावर होताना आपल्याला दिसत नाही. ज्या झपाट्याने देशाची लोकसंख्या वाढत आहे, त्या झपाट्याने देशात बेरोजगारी वाढत आहे, आपण जर भ्रष्टाचारावर नियंत्रण आणू शकलो तर देशात बर्याचश्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
भारत देशात आज बरेच अशे विषय आहेत जे फक्त निवडणुकां पुरते मर्यादित राहिले आहेत, त्यापैकी एक मुद्दा म्हणजे भ्रष्टाचार, या मुद्याला वर घेऊन आज पर्यंत किती तरी पक्ष वर आले आहेत.
भ्रष्टाचाराविषयी मराठी स्लोगन – Slogans on Corruption in Marathi
तर आज आपण भ्रष्टाचार या विषयी काही घोषवाक्ये पाहणार आहोत.
तर चला सुरुवात करूया,
- भ्रष्टाचार मिटवूया, देशाला पुढे नेऊया.
- देशाचा आजार आहेत हे भ्रष्टाचारी, गरिबांच्या पोटावर लाथा मारतात हे भिकारी.
- जंगलात नाचतो मोर, भ्रष्टाचारी आहेत सर्व चोर.
- करू नका भ्रष्टाचार, होऊ नका लाचार.
- भ्रष्टाचार करू नका, मोहात पैश्याच्या राहू नका.
- उत्पन्नाने समाधी रहा, ब्र्हष्टाच्यारापासून दूर व्हा.
- भ्रष्टाचार मिटवूया, भ्रष्ट नेत्यांना हटवूया.
- वाढवायचा असेल विकास दर जर, भ्रष्टाचार मिटवावा लागेल तर.
- लोभ करते जनतेचे शोषण, हेच आहे भ्रष्टाचाराचे मुख्य कारण.
- भ्रष्टाचार आहे देशाच्या नाशाचे कारण, याला संपवून ठेवू नवे एक उदाहरण.
- पैशाची हाव, करी माणसाचा पाव.
- पैसा नाही सर्व काही, उत्पन्नावर समाधानी राही.
- देशाचा जर हवा असेल विकास, भ्रष्ट नेत्यांना ठेवू नका आसपास.
- करते करप्शन आपल्या हक्क्कांचे उल्लंघन.
- भ्रष्टाचार विरोधी मोहीम पाळा, त्यामुळेच लागेल भ्रष्टाचारावर आळा.
- भ्रष्टाच्यार्यांनो खबरदार, भारत देश आहे तयार.
- आचरण सुधारा, भ्रष्टाच्याराला विरोध करा.
- लोभ तुमच्या जवळून भ्रष्टाचार करून घेईल, नंतर सर्व काही गमावेल.
- भ्रष्टाचारी मिटवा, भ्रष्टाचार हटवा.
- एकच करा विचार, मुळासकट मिटवू भ्रष्टाचार.
आपल्या देशात जर भ्रष्टाचार वाढला तर आपला देश अधोगतीच्या मार्गावर जाईल. त्यासाठी आपल्या आजूबाजूला जर भ्रष्टाचार होताना दिसला तर त्याला आळा घातला गेल्या पाहिजे.
म्हणून समाजात भ्रष्टाच्याराविषयी जागरुकता पसरविणे आवश्यक आहे. आणि या लेखाच्या माध्यमातून आम्ही तेच काम करण्याचे प्रयत्न करत आहोत.
आपण ही समाजामध्ये जागरुकता पसरविण्यामध्ये आपले योगदान देऊ शकता या लेखाला जेवढ्या जास्त व्यक्तीपर्यंत पोहचवता येईल तेवढ्या व्यक्तींपर्यंत पोहचवा. आणि आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांपर्यंत शेयर करायला विसरू नका ,आणि आमच्या माझी मराठी ला एकदा अवश्य भेट दया.