रक्तदानाचा प्रचार करणारे घोषवाक्ये – Raktdaan Maratni Slogans
संकल्प नवा, ध्यास नवा, प्रत्येक घरी एक रक्तदाता हवा.
रक्तदानाचे महत्व तेव्हांच कळते, जेंव्हा त्याची गरज पडते.
अमृत रुपी एकचं हेवा रक्तदान हेची मनी ठेवा.
ज्ञान देऊ आरोग्याचे, महत्व वाढवू रक्तदानाचे.
कृती करावी मानवरूपी, रक्तदान करणे आहे जरुरी.
रक्तदान कोण करू शकत नाही – Who cannot Donate Blood
रक्तदान करण्याचे फ़ायदे आपण पहिले आता आपण रक्तदान कोण करू शकत नाही या बद्दल जाणून घेऊया.
- रक्तदात्याने रक्तदान करण्याच्या तीन दिवसापूर्वी कोणतेही प्रतिजैविक औषध घेतले असेल.
- मागील तीन महिन्यात मलेरिया झाला असेल.
- मागील एका वर्षात विषमज्वर, कावीळ किंवा श्वानदंश होऊन त्याने रेबीजची लास घेतली असेल.
- सहा महिन्यापूर्वी मोठी शस्त्रक्रिया झाली असेल.
- गर्भवती महिला, महिलेला एक वर्षाखालील मूळ असल्यास किंवा तिचा सहा महिन्यापूर्वी गर्भपात झाला असेल.
जे व्यक्ती या समस्येनी ग्रस्त असतील ते रक्तदान करण्यास कधीच पात्र ठरत नाहीत. रक्तदान करण्यापूर्वी रक्तदात्या कडून या सर्व गोष्टीची जाणीवपूर्वक माहिती घेतली जाते. त्याचप्रमाणे, ज्या व्यक्तींना रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी रक्तदान करण्याआधी रक्तदाबाची चाचणी करून घेणे आवश्यक असते. रक्तदान हे उपाशी पोटी किंवा जेवण झाल्याच्या अर्ध्या तासापर्यंत कधीच करू नये.
वरील माहिती मी या लेखाच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. तरी आपण रक्तदानाचे महत्व समजून घेऊन इतरांना सुद्धा या बद्दल सांगा. रक्तदान करण्यात आपलं महत्वपूर्ण योगदान दया.