Shooting Information in Marathi
जगात अनेक खेळ खेळले जातात. यांमध्ये एक प्रसिद्ध खेळ आहे नेमबाजी. प्राचीन काळापासून नेमबाजीचा (Shooting) खेळ खेळला जातो असे म्हटले जाते.
ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देखील या खेळला खूप महत्व आहे. या खेळामध्ये मानसिक आणि शारीरिक समतोल खूप महत्वाचा असतो. चला तर मग आज आपण नेमबाजी (Shooting) या खेळाबद्दल माहिती पाहणार आहोत.
नेमबाजी (Shooting) खेळाबद्दल संपूर्ण माहिती – Shooting Information in Marathi
नेमबाजी खेळाचा इतिहास – Shooting History
या खेळाचा उद्गम धनुर्विद्येपासून झाल्याचे समजते. पूर्वी धनुष्य बाणाचा उपयोग करून हा खेळ खेळल्या जात होता. परंतु आधुनिक काळात रायफल आणि पिस्तुलीच्या सहाय्याने खेळला जातो. या खेळात ठराविक अंतरावर लक्ष्य दिलेले असते, ज्यावर नेमबाजाला अचूक नेम साधावा लागतो.
या खेळाची सुरुवात १५-१६ व्या शतकात युरोप देशात झाल्याचे समजते. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नेमबाजीचा समावेश १८९६ सालच्या अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेपासून झाला आहे.
नेमबाजी खेळाचे ऑलिम्पिक मधील प्रकार – Types of Shooting Games
या खेळाचे पुरुषांसाठी ९ प्रकार आणि महिलांसाठी ६ प्रकार आहेत. हे प्रकार नेमबाजीसाठी वापरली जाणारी बंदूक, नेमबाजाची स्थिती आणि अंतर यांनुसार पाडलेले आहेत.
बंदुकी वरून पडलेले प्रकार – Types from Gun
- रायफल शूटिंग (Rifle Shooting) : यामध्ये नेमबाजाला ५० मी. आणि १० मी. एअर रायफलने लक्ष्यावर नेम साधावा लागतो.
- पिस्टल शूटिंग (Pistol Shooting): यामध्ये नेमबाजाला २५ मी. रॅपीड फायर आणि १० मी. एअर पिस्टलने लक्ष्यावर नेम साधावा लागतो.
शारीरिक स्थितीवरून पडलेले प्रकार – Types from Position
- उभे राहून (Standing Position)
- गुडघ्यावर बसून (Kneeling Position)
- झोपून (Prone Position)
वरील दोन्ही प्रकारांत लक्ष्य (Target) हे एका जागेवर स्थिर असते.
३. शॉटगन शूटिंग (Shotgun Shooting) : या प्रकारामध्ये लक्ष्य हे हवेत उडविले जाते व नेमबाजाला त्यावर नेम साधावा लागतो. हे लक्ष्य मातीचे असतात. शॉटगन शूटिंगचे पुन्हा दोन उपप्रकार पडतात.
- ट्रॅप (Trap): यामध्ये लक्ष्य हे एकाच ठिकाणाहून हवेत उडविले जाते आणि नेमबाजाला त्यावर नेम साधावा लागतो.
- स्कीट (Skeet): यामध्ये लक्ष्य हे उजवी आणि डावी कडून हवेत उडविले जाते आणि नेमबाजाला त्यावर नेम साधावा लागतो.
नेमबाजी खेळामध्ये दिल्या जाणारे गुण : Points in the Shooting
या खेळामधील लक्ष्य हे अनेक वर्तुळांनी बनलेले असते. हि वर्तुळे केंद्राकडे लहान होत जातात. केंद्रावर नेम साधल्यास पूर्ण गुण दिले जातात. तसेच केंद्रापासून जितके दूर नेम साधला तेवढे गुण कमी मिळतात.
नेमबाजी खेळाबद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न – Question about Shooting Games
१. नेमबाजी खेळाचे नियोजन करणारी आंतर राष्ट्रीय संस्था कोणती?
उत्तर: आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन (International Shooting Sports Federation)
२. महाराष्ट्रामधील प्रसिद्ध नेमबाज कोण आहेत?
उत्तर: महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध नेमबाज अंजली भागवत या आहेत.
२. नेमबाजीचा समावेश ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये केव्हापासून करण्यात आला?
उत्तर: १८९६ सालच्या अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेपासून नेमबाजीचा ऑलिम्पिक मध्ये समावेश करण्यात आला.
३. नेमबाजी खेळात ऑलिम्पिक सुवर्ण पदक कुणी पटकावले आहे?
उत्तर: अभिनव बिंद्रा.
४. ऑलिम्पिक मध्ये नेमबाजी या खेळत महिला सहभागी होऊ शकतात का?
उत्तर: होय, काही प्रकारांत महिला सहभागी होऊ शकतात.
५. नेमबाजीच्या विविध शारीरिक स्थिती कुठल्या ?
उत्तर: नेमबाज झोपून, बसून आणि उभे राहून अशा विविध शारीरिक स्थितीत नेमबाजी करू शकतो.
६. भारतात नेमबाजीची स्पर्धा कोणती संस्था आयोजित करते?
उत्तर: नॅशनल रायफल असोशिएशन ऑफ इंडिया (National Rifle Association of India)
७. भारताने नेमबाजीमध्ये आतापर्यंत किती ऑलिम्पिक पदक जिंकले आहेत?
उत्तर: एकूण ४ पदक. ज्यामध्ये १ सुवर्ण, २ रजत आणि १ कांस्य पदकाचा समावेश आहे.