Shivajicha Palna
नमस्कार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत हिंदू हृदय सम्राट मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनी गायल्या जाणाऱ्या विशेष पाळणा गीताचे लिखाण आज आम्ही खाज आपल्याकरिता केलं आहे. मित्रांनो, या भूलोकावर काहीच लोक असे असतील ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याबद्दल माहिती नसेल. आज सुद्धा जेंव्हा लहान मुलांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की त्यांच्या मुखातून जय असा नारा निघतो. या महान राज्यांमुळे आज आपला महाराष्ट्र राज्य आणि भारतातील हिंदू धर्म अस्तित्वात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवाय महाराष्ट्राची कल्पना करणे देखील कठीणच. एके काळी संपूर्ण देशांत मुघल शाहीचे सावट असतांना, आपल्या राज्यातील आया बहिणींवर होत असलेले अत्याचार तसचं, शेतीची आणि मंदिराची होणारी लुट अशी दयनीय अवस्था होत असतांना.
महाराष्ट्र राज्यातील सहयाद्री पर्वताच्या दऱ्या खोऱ्यात वावरणाऱ्या माता जिजाबाई याच्या पोटी सन १९ फेब्रुवारी १६३० साली पुणे येथील शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. माता जिजाबाई यांनी आपल्या बाळाचे नाव शिवाजी असे ठेवले. त्या दिवसापासून आपल्या राज्यात १९ फेब्रुवारी हा दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिन म्हणून साजर करण्यात येतो.
महिला शिवनेरी गडावर जावून जन्मोत्सव साजरा करतात. त्यावेळी या महिला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची महती सांगणाऱ्या पाळणा गीताचे गायन देखील करतात. मित्रांनो, आम्ही देखील या लेखाच्या माध्यमातून खास आपल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनी गायला जाणाऱ्या पाळणा गीताचे लिखाण केलं आहे.
छत्रपती शिवरायांचा पाळणा गीत – Shivajicha Palna
तुज जोजविते माय जिजाई बाळा। निज रे निज लडिवाळा।। मध्यरात्रीचा प्रहर लाडक्या आला। झोप का येईना तुजला।।
झोके देते गीते गाते अंगाई। तरी डोळा लागत नाहीं।।
बाळा असला थांबिव चाळा आतां। थकले मी झोके देतां।।
तूं महाराष्ट्राचा त्राता मनी धरली कसली चिंता
पाठीशी भवानी माता माउलिया जिवीचा जिव्हाळा। निज रे निज लडिवाळा।।१।।
चल ठेव दुरी हातामधली ढाल। निद्रा करी तान्ह्या खुशाल।।
झोपली कशी बारा मावळी थेट। शिवनेर जुन्नर पेठ।।
निःशब्द कशी पसरली रे शांती। या मराठी भूमिवरती।।
बागुलबुवा आला काळा। झडकरी झोप रे बाळा॥
कोकणच्या चौदा ताली झोपल्या की घाटाखाली
आणि रान बहुतचि झाली किती सांग तुला समजावू वेल्हाळा। निज रे निज लडिवाळा।।२।।
Shivaji Maharaj Palna
मी लोटते झोका तुज शिवबाळा। सुंदरा, नीज स्नेहाळा।।धृ।।
इतनुशांती शांत नीज तुज येण्या राष्ट्रगीत गाते तान्ह्या।।।
बघ दास्यि जळे मही अंबिका माय
हबरडा फोडी हाय निजशजूंनी हिचें भंगिले छत्र।
मांगल्या-सूत्र स्वातंत्र्य या दुःखाने दुःखी फार रे पाही मी जिजाबाई तव आई। बहू शत्रू मातले मेले रे। मेल्यांनी आर्यधन नेले रे।
आमचें राज्य बुडविलें रे। कुणी निपजेना शास्ता। या चांडाळा संहारा नीज स्नेहाला ।।१।।
भूमातेच्या भूतकाळी उद्धरणीं। झुंजली रणी मृडरमणी।।
‘श्रीरामाने रावण वधिला लढूनि। वानरां वीर बनवूनी।।
घे स्वतंत्रता कंसाच्यापासूनी। गोविंद गोप जमवूनी।।
तूं तसा वीर होशील का रे?
तलवार करी धरशील का रे ? रणी वधावयाला देशशत्रूचा मेळा। सुंदर नीज स्नेहाळा।।२।।
भूभक्तीचे प्रबल दुग्ध पाजीन। मी वीर तुला बनवीन।।
रिपुरक्तें भू तुझ्या करी न्हाणीन। सातंत्र्य घरी आणीन।।
साधीन सख्या जाण लोककल्याण। राज्य पदी स्थापून।।
स्वातंत्र्य वीराची माता रे। मी स्वतंत्र सुधन्य होतां रे।
ध्वज स्वातंत्र्याचा झुलता रे। ठेवीन तनू अशा आनंदमय वेळां। सुन्दरा नीज स्नेहाळा।।३।।
मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनी पाळणा गीत गाणे कोणाला आवडणार नाही. केवळ छत्रपती असा शब्द देखील जरी कोणी उद्गारला तर आपल्या तोंडून नकळत शिवाजी महाराज असा पुढील शब्द बाहेर पडतो. परंतु, अशी ख्याती निर्माण करणे प्रत्येक व्यक्तीच काम नाही.
त्याकरिता आपल्या बालमनावर लहान पणीच खूप चांगले संस्कार, उत्तम शिक्षण, योग्य जडण घडण आणि कठीण परिश्रम, आदी गोष्टी कोरल्या गेल्या पाहिजात. अशी कामगिरी केवळ माता जीजाऊ यांनी शिवाबांवर केली होती. म्हणूनच मोठे झाल्यावर त्यांनी आपल्यावर केल्या गेलेल्या संस्काराची जाणीव संपूर्ण जगाला सिद्ध करून दाखविली.
आपल्या वयाच्या केवळ सोळाव्या वर्षापासून त्यांनी गड किल्ले जिंकण्यास सुरवात केली होती. शिवाजी महाराजांनी जात पात न मानता डोंगर दऱ्या मध्ये राहणाऱ्या आदिवासी मुलांन सोबत राहून लहानाचे मोठे झाले. शिवाजी महाराजांचे मित्र मंडळी ही खालच्या वर्गातील होती. परंतु, राजांनी कधीच जातीभेद मानला नाही. त्यांच्याकरिता सर्व लोक समान होती.
त्यांनी आपल्या राज्यातील लोकांना उत्तम प्रकारे न्याय देण्याचे काम केलं. अश्या प्रकारे अनेक महान कामगिरी सिद्ध करणारे महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिन आज देखील मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिनाच्या उत्साहाची सुरवात जरी लोकमान्य टिळकांनी केली असली तरी आजपर्यंत ती जोपासली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महिला या दिवशी शिव जन्मोत्सवानिमित्त पाळणा गीत सादर करतात. आम्ही देखील या दिनी गायिल्या जाणाऱ्या पाळणा गीताचे लिखाण खास आपणासाठी केलं आहे.