Shikhar Dhawan Information in Marathi
क्रिकेट मध्ये असं म्हणतात कि, संघाचा विजय सलामवीर फलंदाजांच्या जोडीवर अवलंबून असतो. भारतीय क्रिकेट संघाला असाच धडाडीचा सलामवीर फलंदाज (Opening Batsman) लाभला आणि तो आहे शिखर धवन. चला तर मग शिखर धवन बद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
क्रिकेटर शिखर धवन बद्दल संपूर्ण माहिती – Shikhar Dhawan Information in Marathi
शिखर धवन बद्दल थोडक्यात माहिती – Shikhar Dhawan in Marathi
नाव (Name) | शिखर धवन (Shikhar Dhawan) |
जन्म (Birth) | ५ डिसेंबर १९८५ (5th December 1985) |
जन्मस्थान (Birth Place ) | दिल्ली, भारत (Delhi, India) |
वडील (Father Name) | महेंद्रपाल धवन (Mahendrapal Dhawan) |
आई (Mother Name) | सुनैना धवन (Sunaina Dhawan) |
पत्नी (Wife Name) | आयेशा मुखर्जी (Aayesha Mukharjee) |
पेशा (Occupation) | भारतीय क्रिकेट पटू (Indian Cricket Player) |
खेळाडू प्रकार (Player Type) | फलंदाज (डावखोरा) (Left Handed Batsman) |
सर्वाधिक धावा (एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना) (Highest Score in ODI) | १४३ (143) |
एकूण संपत्ती (Net Worth) | ७५ करोड रू. (अंदाजे) (Rs. 75 Cr.) (Approx) |
शिखर धवनचा जन्म आणि कुटुंब – Shikhar Dhawan Family
गब्बर या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवन यांचा जन्म राजधानी दिल्ली मध्ये ५ डिसेंबर १९५८ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव महेंद्रपाल तर आईचे नाव सुनैना धवन असे आहे. त्यांच्या बहिणीचे नाव श्रेष्ठा आहे. ३० ऑक्टोबर २०१२ साली यांचा विवाह आयेशा मुखर्जी यांच्याशी झाला. त्यांना झोरावर नावाचा मुलगा आणि रिया, आलीया अशा दोन मुली आहेत.
शिखर धवन यांच्या क्रिकेट जीवनाची सुरुवात : Shikhar Dhawan Cricket Starting
शिखरनी आपल्या खेळाची सुरुवात दिल्ली संघातून केली. शिखरला क्रिकेट चे धडे, त्यांचे कोच तारक सिन्हा आणि मदन शर्मा कडून मिळाले. त्यांनी २००४ साली १९ वर्षे खालील क्रिकेट स्पर्धेत ७ सामन्यांत ५०५ धावा काढल्या होत्या. यामध्ये ३ शतकांचा समावेश होता. आणि हीच त्यांच्या पुढील क्रिकेट कारकिर्दीसाठी सुवर्ण संधी ठरली.
शिखर धवनची क्रिकेट मधील कारकीर्द : Shikhar Dhawan Cricket Career
शिखरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये २०१० साली ‘चालेन्जर्स ट्रॉफी’ मधून पदार्पण केले. त्यांनी आपला पहिला एकदिवसीय सामना (One Day International) ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळला.
सचिन तेंडूलकर आणि विरेंद्र सेहवाग सारखे दिग्गज सलामवीर असतांना शिखरला सलामवीर फलंदाजाची संधी मिळणे कठीण होते. पण त्यांनी आपल्या जिद्दीनी आणि खेळातील कौशल्याने या संधीचे सोने केले आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.
भारतीय संघाच्या अनेक विजयात शिखर यांनी मोलाचे योगदान दिले आहे. २०१५ च्या विश्वचषकामधे शिखर धवन हे आघाडीचे भारतीय फलंदाज होते. यांशिवाय ते आय.पी.एल. (IPL) मध्ये देखील आपल्या अप्रतिम खेळाचे प्रात्यक्षिक दाखवतात.
शिखर धवन बद्दल थोडक्यात – Shikhar Dhawan Marathi Mahiti
- वय (Age) : ३६ वर्ष (२०२१ साली) (36 Years till 2021)
- एकूण संपत्ती (Net Worth) : ७५ करोड रू. (अंदाजे) (Rs. 75 Cr. Approx.)
- टोपण नाव (Nickname) : गब्बर (Gabbar)
- उंची (Height) : ५ फुट ११ इंच (१८० सेमी.) (5.11 ft./180cm)
- वजन (Weight) : ८० किलो (१७६ पौंड) (80 Kg./176 lb.)
- घर (Houses) : दिल्ली आणि मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) (Delhi and Melbourne, Australia)
शिखर धवन बद्दल काही तथ्य : Facts About Shikhar Dhawan
- त्यांनी सुरुवात फलंदाज म्हणून नाही तर यष्टिरक्षक म्हणून केली होती.
- शिखर यांनी आपले कसोटी शतक फक्त ८५ चेंडूत पूर्ण केलेले आहे.
- शिखरची पत्नी त्यांच्यापेक्षा १० वर्षांनी मोठी आहे.
- रिया आणि आलीया ह्या शिखरच्या सावत्र मुली आहेत.
शिखर धवन बद्दल काही महत्वाचे प्रश्न – About Shikhar Dhawan
१. शिखर धवन यांनी किती एकदिवसीय शतक केलेले आहेत?
उत्तर: १७ शतके.
२. शिखर धवन यांना कोणत्या टोपण नावाने संबोधले जाते?
उत्तर: गब्बर.
३. शिखर धवन हे कोणत्या आय.पी.एल. संघासाठी खेळतात?
उत्तर: दिल्ली कॅपिटल.
४. शिखर धवन यांच्या मुलीचे नाव काय आहे? (Shikhar Dhawan Daughter)
उत्तर: रिया आणि आलिया.
५. शिखर धवन यांची एकूण संपत्ती किती आहे? (Shikhar Dhawan Net Worth)
उत्तर: ७५ करोड रू. (अंदाजे)
६. शिखर धवन यांच्या पत्नीचे नाव काय आहे? (Shikhar Dhawan Wife)
उत्तर: आयेशा मुखर्जी.
७. शिखर धवन यांची उंची किती आहे? (Shikhar Dhawan Height)
उत्तर: ५ फुट ११ इंच.
८. शिखर धवन यांचे वय किती? (Shikhar Dhawan Age)
उत्तर : ३६ वर्षे (२०२१ साली)