Mahadevachi Aarti
नमस्कार मित्रांनो, आरती संग्रह या लेखाच्या माध्यमातून आज आपण भगवान शंकरजी (Shankarachi Aarti) यांच्या आरतीचे लिखाण करणार आहोत. सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ गणले जाणारे भगवान शंकरजी यांना अनेक नावांनी संबोधले जाते. त्यांचे भक्त त्यांना अनेक नावांनी ओळखतात.
शंकराची आरती – Shankarachi Aarti
Lavthavti Vikrala Aarti
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।
वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळां।।लावण्यसुंदर मस्तकीं बाळा।
तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।1।।
जय देव जय देव जय श्रीशंकरा।।
आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ।।ध्रु.।।कर्पुगौरा भोळा नयनीं विशाळा।
आर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा।
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा।ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। जय. ।।2।।देवी दैत्यीं सागरमंथन पैं केलें।
त्यामाजी जें अवचित हळाहळ उठिलें।
तें त्वां असुरपषं प्राशन केलें।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें।। जय. ।।3।।व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी। पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी।
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी।
रघुकुलतिलक रामदासा अंतरी।।
जय देव जय देव जय श्रीशंकरा।।4।।
भारतीय संस्कृतीची माहिती कथन करणाऱ्या अनेक धार्मिक वैदिक ग्रंथात भगवान शिव यांच्या अनेक नावांचा वेगवेगळा उल्लेख करण्यात आला आहे. जसे की, वैदिक साहित्यात रुद्र असा उच्चार करण्यात आला आहे तर, यजुर्वेद मध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख रुद्रसूक्त असा केला गेला आहे.
त्याचप्रमाणे पुराणकाळात त्यांच्या नावाचा उल्लेख शिव किंवा शंकर अश्या प्रकारे करण्यात आला आहे. शैव धार्मिक लोक केवळ भगवान शिव यांचीच आराधना करतात. तसचं, त्यांच्याशी संबंधित केवळ शिव पुराण, लिंग पुराण हे पुराणे अस्तित्वात आहेत.
आपल्या भू लोकावर भगवान शिव यांना अनन्य असे महत्व आहे. त्यांच्या जन्माबद्दल विशेष असी माहिती नसली तरी, हिंदू संस्कृती नुसार आपल्या देशांत भगवान शिव यांचे दोन महोत्सव साजरे करण्यात येतात. त्यांपैकी माघ वद्द्य त्रयोदशी च्या दिवशी देशभर साजरा होणारा महाशिवरात्री हा महोत्सव भाविक खुप उत्साहात साजरा करतात.
महाशिवरात्री निमित्त भाविक दिवसभर उपवास पकडतात. या दिवशी भगवान शिव यांच्या मंदिरात विशेष गर्दी पाहायला मिळते. मंदिरात सकाळी पूजा अर्चना करून महाआरतीचे आयोजन करण्यात येते. भाविक मोठ्या संख्येने मंदिरात आरतीसाठी दाखल होतात. शिवला बेल पत्ते आवडत असल्याने त्यांना बेलाची पाने अर्पण केले जातात, तसचं दुधाचा अभिषेक देखील केला जातो.
भगवान शिव यांच्या पिंडीला भगवान शिव यांच्या विविध रूपाचा शेष दिला जातो. महाशिवरात्र म्हणजे केवळ भगवान शिव यांची आराधना करण्याची रात्र. महाशिवरात्री पर्वा निमित्त अनेक धार्मिक कथा देखील प्रचलित आहेत.
त्याचप्रमाणे, हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यात भगवान महादेव यांची विशेष पूजा अर्चना केली जाते. याशिवाय, हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष असे महत्व आहे. या महिन्यात हिंदू धर्मातील अनेक महत्वपूर्ण सन येत असतात. हा महिना हिंदू धार्मिक लोक मोठ्या उत्साहात साजरा करतात. अनेक भाविक श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी उपवास करतात.
तसचं, भाविक दूर दुरून नदींच्या जलपात्रातील पाणी कावळच्या साह्याने आणून भगवान महादेव यांच्या पिंडीवर अर्पण करतात. श्रावण महिना हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिना असतो. या महिन्यात देवलोकांतील देवी देवता देखील भगवान शिव यांची आराधना करीत असतात अशी लोकांची धारणा आहे.
मित्रांनो, वरील उताऱ्यावरून आपणास आपल्या हिंदू धर्मात भगवान शिव यांना असलेले अनन्य महत्व समजलं असेल. परंतु त्यांचे संपूर्ण वर्णन तर शिव पुरण किंवा लिंग पुरणाच्या माध्यमातून आपणास कळू शकेल. हे ग्रंथ वाचनास खूप मोठे असल्याने भगवान शिव यांची आरतीचे लिखाण करण्यात आलं आहे.
आरतीच्या माध्यमातून भगवान शिव यांचे संपूर्ण वर्णन करण्यात आलं आहे. शिवाय, भाविक त्यांना प्रसन्न करण्यासाठी नियमित या आरतीचे पठन देखील करीत असतात. तरी, आपण या आरतीचे महत्व समजून नियमित पठन करावे. धन्यवाद..