Shani Dev Chalisa
शनि महाराज यांना प्रसन्न करण्यासाठी मंदिरात पठन करण्यात येत असलेली शनि चालीसा आपण सर्वांना माहिती आहे. भाविक दर शनिवारी मोठ्या एकनिष्ठेने ही चालीसा मंदिरात वाचत असतात. आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये देखील शनि चालीसा पठन करण्याबाबत उच्चार करण्यात आला आहे. तसचं, ज्योतिष शास्त्रात देखील या चालीसेचे पठन करण्यास विशेष महत्व दिले आहे.
आज आम्ही देखील या लेखाच्या माध्यमातून खास आपणासाठी या महान शनि चालीसेचे लिखाण केलं आहे. तरी, आपण या चालीसेचे महत्व समजून नियमित पठन करावे.
शनि देव चालीसा – Shani Chalisa
जय गणेश गिरिजा सुवन, मंगल करण कृपाल।
दीनन के दुख दूर करि, कीजै नाथ निहाल॥
जय जय श्री शनिदेव प्रभु, सुनहु विनय महाराज।
करहु कृपा हे रवि तनय, राखहु जन की लाज॥
जयति जयति शनिदेव दयाला।
करत सदा भक्तन प्रतिपाला॥
चारि भुजा, तनु श्याम विराजै।
माथे रतन मुकुट छबि छाजै॥
परम विशाल मनोहर भाला।
टेढ़ी दृष्टि भृकुटि विकराला॥
कुण्डल श्रवण चमाचम चमके।
हिय माल मुक्तन मणि दमके॥
कर में गदा त्रिशूल कुठारा।
पल बिच करैं अरिहिं संहारा॥
पिंगल, कृष्णो, छाया नन्दन।
यम, कोणस्थ, रौद्र, दुखभंजन॥
सौरी, मन्द, शनी, दश नामा।
भानु पुत्र पूजहिं सब कामा॥
जा पर प्रभु प्रसन्न ह्वैं जाहीं।
रंकहुँ राव करैं क्षण माहीं॥
पर्वतहू तृण होई निहारत।
तृणहू को पर्वत करि डारत॥
राज मिलत बन रामहिं दीन्हयो।
कैकेइहुँ की मति हरि लीन्हयो॥
बनहूँ में मृग कपट दिखाई।
मातु जानकी गई चुराई॥
लखनहिं शक्ति विकल करिडारा।
मचिगा दल में हाहाकारा॥
रावण की गति-मति बौराई।
रामचन्द्र सों बैर बढ़ाई॥
दियो कीट करि कंचन लंका।
बजि बजरंग बीर की डंका॥
नृप विक्रम पर तुहि पगु धारा।
चित्र मयूर निगलि गै हारा॥
हार नौलखा लाग्यो चोरी।
हाथ पैर डरवायो तोरी॥
भारी दशा निकृष्ट दिखायो।
तेलिहिं घर कोल्हू चलवायो॥
विनय राग दीपक महं कीन्हयों।
तब प्रसन्न प्रभु ह्वै सुख दीन्हयों॥
हरिश्चन्द्र नृप नारि बिकानी।
आपहुं भरे डोम घर पानी॥
तैसे नल पर दशा सिरानी।
भूंजी-मीन कूद गई पानी॥
श्री शंकरहिं गह्यो जब जाई।
पारवती को सती कराई॥
तनिक विलोकत ही करि रीसा।
नभ उड़ि गयो गौरिसुत सीसा॥
पाण्डव पर भै दशा तुम्हारी।
बची द्रौपदी होति उघारी॥
कौरव के भी गति मति मारयो।
युद्ध महाभारत करि डारयो॥
रवि कहँ मुख महँ धरि तत्काला।
लेकर कूदि परयो पाताला॥
शेष देव-लखि विनती लाई।
रवि को मुख ते दियो छुड़ाई॥
वाहन प्रभु के सात सुजाना।
जग दिग्गज गर्दभ मृग स्वाना॥
जम्बुक सिंह आदि नख धारी।
सो फल ज्योतिष कहत पुकारी॥
गज वाहन लक्ष्मी गृह आवैं।
हय ते सुख सम्पति उपजावैं॥
गर्दभ हानि करै बहु काजा।
सिंह सिद्धकर राज समाजा॥
जम्बुक बुद्धि नष्ट कर डारै।
मृग दे कष्ट प्राण संहारै॥
जब आवहिं प्रभु स्वान सवारी।
चोरी आदि होय डर भारी॥
तैसहि चारि चरण यह नामा।
स्वर्ण लौह चाँदी अरु तामा॥
लौह चरण पर जब प्रभु आवैं।
धन जन सम्पत्ति नष्ट करावैं॥
समता ताम्र रजत शुभकारी।
स्वर्ण सर्व सर्व सुख मंगल भारी॥
जो यह शनि चरित्र नित गावै।
कबहुं न दशा निकृष्ट सतावै॥
अद्भुत नाथ दिखावैं लीला।
करैं शत्रु के नशि बलि ढीला॥
जो पण्डित सुयोग्य बुलवाई।
विधिवत शनि ग्रह शांति कराई॥
पीपल जल शनि दिवस चढ़ावत।
दीप दान दै बहु सुख पावत॥
कहत राम सुन्दर प्रभु दासा।
शनि सुमिरत सुख होत प्रकाशा॥
दोहा
पाठ शनिश्चर देव को, की हों ‘भक्त’ तैयार।
करत पाठ चालीस दिन, हो भवसागर पार॥
शनि महाराज यांची स्तुती म्हणून लिखाण करण्यात आलेल्या पवित्र शनि चालीसा ग्रंथाची रचना अयोध्या नरेश दशरथ यांनी केली असून, याबाबत पौराणिक कथा देखील प्रचलित आहे.
राजा दशरथ यांच्या कारकिर्दीत त्यांच्या राज्यातील सर्व प्रजा आनंदी आणि शांत होती. चोहीकडे आनंदिमय वातावरण होते. एक दिवशी राजदरबार भरला असता दरबारातील ज्योतिषांनी शनि देवाला कृत्तिका नक्षत्राच्या अंतिम चरणात पाहून राजा दशरथ यांना सांगितल की, शनि देव रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहेत.
यालाच आपण शनि शक्ती भेदन असे देखील म्हणतो. राज दरबारातील ज्योतिषांनी राजा दशरथ यांना सांगितल की, शनि देवाने रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणे म्हणजे देवता आणि असुर दोघांसाठी खूप कष्टदायक असते. तसचं, रोहिणी शक्ती भेदन झाल्यास राज्यांत विनाशकारी अकाल देखील पडतो. सर्वीकडे दुखमय वातावरण होवून जाते. राजा दशरथ यांनी ज्योतिषांची व्यथा ऐकल्यानंतर आपल्या प्रजेच्या हितासाठी गुरु वशिष्ठ ऋषी तथा आपल्या राजदरबारातील प्रमुख वेद ब्राह्मणांना या समस्येवर उपाय विचारू लागले.
गुरु वशिष्ठ ऋषीं रोहिणी नक्षत्र भेदन होण्याबाबत सांगू लागले की, हे राजा रोहिणी नक्षत्रात भेदन झाल्यास प्रजाजन सुखी कसे राहू शकते. या योगाच्या दुष्प्रभावापासून आपल रक्षण करण्यास देव लोकांतील इंद्रदेव, तथा साक्षात ब्रह्मदेव सुद्धा आपली रक्षा करण्यास असमर्थ आहेत.
राजा दशरथ वशिष्ठ ऋषींचे म्हणने ऐकल्यानंतर आपल्या मनी विचार करू लागले की, आपण जर या संकटाच्या वेळी प्रजेचे रक्षण केले नाही तर प्रजा आपल्याला कमजोर समजेल. असा विचार करताच त्यांनी, आपली सेव शक्ती एकवटली आणि आपले दिव्य धनुष्य आणि दिव्य रथ घेऊन वाऱ्याच्या वेगाने चंद्रापेक्षा तीन लाख पट दूर असलेल्या नक्षत्रावर गेले.
त्याठिकाणी शनि देवाला कृत्तिका नक्षत्रांनंतर रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतांना पाहून राजा दशरथ आपला बाण शनि देव यांच्यावर रोखून निर्भीडपणे उभे राहिले. शनि देवाला राजा दशरथ यांचे धाडस पाहून आनंद झाला. सुरुवतीला राजा दशरथ यांची कृती पाहून शनि देवाला थोडी भीती वाटली. परंतु, नंतर ते राजा दशरथ यांनी केलेल्या धाडसाची प्रशंसा करू लागले.
शनि महाराज राजा दशरथ यांना सांगू लागले की, हे राजन तुमच्या सारख धाडस आज पर्यंत मी कोणताच पाहिलं नाही. वास्तविकता माझ्या समोर उभ राहण्याची कोणाची हिम्मतच होत नाही. देवता, असुर, मनुष्य, सिद्ध, विद्याधर, आणि सर्प यासारखे जीव माझ्या नावानेचं भितात. तुमची निर्भीडता पाहून मी तुमच्यावर प्रसन्न झालो. तेंव्हा हे राजन, तुम्हांला पाहिजे तो वर मागा मी तुम्हाला देईल.
अयोध्या नरेश शनि महाराजांची प्रसन्नता पाहून त्यांना वर मागतात की, हे सूर्यपुत्र शनि देव जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात आणि आपण जर मला वर देवू इच्छिता तर मी तुम्हाला एक वर मांगतो की, जो पर्यंत या सृष्टीवर सूर्य, चंद्र, नदी, समुद्र आणि पृथ्वी या संसारात अस्तित्वात आहे तो पर्यंत, आपण रोहिणी शक्ती भेदन कधीच करणार नाहीत. राजा दशरथ यांचा वर ऐकल्यानंतर शनि देवाने त्यांना तथास्तु म्हणत वर दिला.
राजा दशरथ शनि महाराजांकडून वर प्राप्त केल्याने आपल्याला खूप भाग्यवान समजू लागले. राजा दशरथ यांच्या कृतीबद्दल शनि महाराज इतके प्रसन्न झाले की त्यांनी राजा दशरथ यांना दुसरा वर मागण्यास सांगितला. शिवाय, त्यांनी राजा दशरथ यांना आशीर्वाद दिला की, हे राजन तू निर्भीड रहा पुढील बारा वर्ष तुझ्या राज्यात कोणत्याच प्रकारचा दुष्काळ पडणार नाही.
तसचं, तुझी कीर्ती तिन्ही लोकांत पसरेल. शनि महाराजांकडून वर प्राप्त केल्याने राजा दशरथ खूप प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या हातातील धनुष्य रथात ठेवून हात जोडून देवी सरस्वती आणि श्री गणेश यांचे ध्यान करून शनि महाराजांची स्तुती करू लागले. राजा दशरथ यांनी शनि देवाची केलेली स्तुती म्हणजेच शनि चालीसा होय.
शनी चालीसा वाचल्याने होणारे फायदे – Shani Chalisa Benefits
मित्रांनो, या शनि चालीसेचे आपल्या जीवनांत अनन्य साधारण महत्व असून आपण त्यांचे पठन केल्यास आपली सर्व दुख दारिद्र्य नाहीसे होतात. तसचं, या चालीसेचे पठन केल्याने शनि महाराजांची कृपा आपल्यावर कायम राहते.
वरील लेखात शनि चालीसे बाबत लिखाण करण्यात आलेली दंतकथा आम्ही इंटरनेटच्या माध्यमातून मिळवून आपल्यासमोर सादर केली आहे. तरी आपण या लेखाचे महत्व समजून शनि चालीसेचे नियमित पठन करावे. धन्यवाद..