Shakti Kapoor chi Mahiti
चित्रपटसृष्टीत शक्तीकपुर ची एक वेगळी ओळख आहे काहीजण त्यांना खलनायकाच्या रूपात ओळखतात तर काहींच्या नजरेत त्यांची कॉमेडीयन म्हणुनही ओळख आहे.
शक्ती कपुर ची फिल्मी कारकीर्द खुप मोठी आहे.
प्रतिभावंत कलाकार असल्यामुळे कोणत्याही प्रकारची भुमीका आहे तशी पार पाडण्यात त्यांचा हात कुणीही पकडू शकत नाही.
कोणतेही पात्र ते सहज रंगवुन जातात.
कोणतेही पात्र रंगवतांना त्यांना अडचणीचा सामना करावा लागत नाही.
शक्ति कपूर यांच्या विषयी माहिती – Actor Shakti Kapoor Information in Marathi
विनोदी व्यक्तिमत्व शक्ति कपूर यांची माहिती – Shakti Kapoor Biography in Marathi
त्यांच्या कारकीर्दीची सुरूवात खुप वर्षांपुर्वी आलेला चित्रपट ‘अलीबाबा मरजीना’ ने झाली होती.
त्या वेळी कादरखान या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते.
या चित्रपटानंतर त्यांना बऱ्याच चित्रपटांची ऑफर मिळायला लागली, या सर्व चित्रपटांमध्ये त्यांनी इतका सुंदर अभिनय केला की नंतर त्यांना मागे वळुन पाहण्याकरता वेळच मिळाला नाही.
शक्ती कपुर हिंदी चित्रपटसृष्टीत चे खुप प्रसिध्द अभिनेत, कॉमेडीयन आणि खलनायक म्हणुन खुप ओळखले जातात.
एका माहितीच्या आधारे सर्वात जास्त चित्रपटांमधे काम करण्याचा रेकॉर्ड हा शक्ती कपुर यांच्या नावावरच आहे.
आपल्या करीयर ची सुरूवात त्यांनी १९७७ ला प्रदर्शित झालेला चित्रपट ‘अलिबाबा मरजीना’ ने केली होती त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते कादर खान.
व्यक्तिगत जीवन – Personal life
शक्ती कपुर यांचा विवाह शिवांगी (पद्मिनी कोल्हापुरेंची मोठी बहीण) सोबत झाला व त्यांना सिध्दांत कपुर नावाचा मुलगा आणि श्रध्दा कपुर नावाची मुलगी सुध्दा आहे.
शक्ती कपुर मुंबईतल्या जुहु परिसरात राहातात.
शक्ति कपूर यांची कारकीर्द – Shakti Kapoor Career
शक्ती कपुर यांचा सुरूवातीचा प्रवास संघर्षाने भरलेला होता.
सुरूवातीला त्यांनी चित्रपटात छोटे मोठे रोल्स निभावले.
मात्र १९८०-१९८१ मध्ये आलेले कुर्बानी आणि रॉकी या चित्रपटांनी त्यांना बॉलीवूड मध्ये एक अभिनेता म्हणुन ओळख मिळवुन दिली.
१९८३ साली आलेल्या ‘हिम्मतवाला’ आणि सुभाष घईंनी दिग्दर्शीत केलेला ‘हिरो’ या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता, या दोनही चित्रपटांमध्ये खलनायकाची भुमिका त्यांनी अतिशय ताकदीने उभी केली होती.
१९९० च्या दशकात आलेल्या चित्रपटांमध्ये शक्ती कपुर ने विनोदी व्यक्तीरेखा साकारायला सुरूवात केली.
सर्वश्रेष्ठ कॉमेडीयन करता फिल्मफेयर च नामांकन त्यांना मिळाल होतं, आणि डेव्हिड धवनच्या ‘राजाबाबु’ मधल्या नंदु चे पात्र निभावण्याकरता त्यांना फिल्मफेयर चा पुरस्कार मिळाला.
या व्यतिरीक्त देखील त्यांनी विनोदी पात्र रंगवले आहे जसे इंन्साफ मध्ये इन्स्पेक्टर भिंडे, बाप नंबरी बेटा दस नंबरी मध्ये प्रसाद च्या भुमीकेत, अंदाज अपना अपना मध्ये क्राईम मास्टर गोगो, तोहफा, चालबाज मधला बटुकनाथ, आणि बोल राधा बोल मधला गुंगा.
आता आलेले नवीन कलाकार शक्ती कपुर च्या डायलाॅग ची मिमिक्री करतांना दिसतात.
त्यातले लक्षात राहणारे काही डायलॉग म्हणजे तोहफा मधला ‘आउ लोलिता’, चालबाज चित्रपटातला ‘मै एक नन्हासा छोटासा बच्चा हु’, आणि राजाबाबु चित्रपटातील ‘नंदु सबका बंधु’, ‘समझता नही यार ‘..
Shakti Kapoor Film
सन २००० सालापासुन शक्ती कपुर प्रियदर्शन च्या चित्रपटात अभिनय करतांना दिसतायेत जसे हंगामा, हलचल, चुप चुप के, मालामाल विकली, आणि मल्याळम चित्रपटाचा रिमेक भागम भाग.
त्यांनी कलकत्ता मधल्या बऱ्याच बंगाली चित्रपटांतही अभिनय केला आहे त्या सोबतच ओडिया आणि आसामी चित्रपटात ही अभिनेता म्हणुन ते काम करतांना आपल्याला दिसले आहेत.
२०११ साली बिग बॉस ५ या रियालीटी शो मध्ये शक्ती कपुर यांनी प्रतिस्पर्धी म्हणुन भाग घेतला होता.
त्यांनी त्यांची साली पद्मिनी कोल्हापुरें सोबत काॅमेडी शो ‘आसमान से गिरे खजुर पे अटके’ मध्ये काम केले होते. त्यांनी पंजाबी फिल्म ‘मॅरेज दा गॅरेज’ मध्ये देखील काम केले आहे.
शक्ती कपुर ला ‘कुर्बानी’ आणि ‘रॉकी’ चित्रपटांपासुन एका अभिनेत्याच्या रूपात पाहील्या जाउ लागलं.
यानंतर मात्र त्यांनी हिम्मतवाला आणि हिरो चित्रपटांमध्ये खलनायकाची दमदार भुमीका निभावली आणि हाच त्यांच्या फिल्मी करीयर चा टर्निंग होता.
शक्ती कपुर जेवढे प्रसिध्द खलनायक आहेत त्यापेक्षाही जास्त ते विनोदी अभिनेते म्हणुन ओळखल्या जातात.
त्यांना कॉमेडी अभिनयाकरता फिल्मफेयर चा पुरस्कार मिळालेला आहे.
त्यांनी राजाबाबु चित्रपटात नंदु चे जे पात्र रंगवले होते त्या अभिनयाला कोणीही विसरू शकणार नाही.
त्या चित्रपटातला त्यांचा प्रसिध्द डायलॉग ‘नंदू सबका बंधु’ सदैव स्मरणात राहाणार आहे.
तर ही होती शक्ती कपूर यांच्या जीवनावर आधारित माहिती अश्याच प्रकारच्या लेखांसाठी जुळलेले रहा आपल्या माझी मराठी सोबत.
धन्यवाद!