Information Marathi Mhani
आपल्या दैनंदिन जीवनात आपण मराठी भाषेचा वापर करतो, आणि ज्या प्रमाणे आपल्या मराठी भाषेत खूप साऱ्या म्हणींचा समावेश आहे. आणि म्हणींचा समावेष असल्यामुळे आपली मराठी भाषा आणखी सुंदर बनते. आणि म्हणी हा भाषेचाच एक आविष्कार म्हटले तरी चालेल. कारण परिस्थिती ला व्यवस्थित रित्या बसणारे शब्द तयार करायला एक प्रकारे मेहनत च लागते आणि ही मेहनत करणारे आपले पूर्वज खूप हुशार होते.
म्हणींचा आविष्कार काही हवेत झालेला नाही, तर म्हणी बुद्धीला जोर देऊन बनविल्या गेल्या आहेत, तेही त्यामागे काही तरी लॉजिक लावून. आणि म्हणी सुद्धा आपल्या आयुष्यात या प्रकारे मिसळून गेलेल्या आहेत की त्यांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात सहजरित्या होऊन जातो. आणि आपल्याला कळत सुध्दा नाही, तर आजच्या लेखात एक अशीच हिंदी भाषेतील एक म्हण पाहणार आहोत ज्या म्हणीला आपण दररोज च्या जीवनात वापरात आणतो, आणि या म्हणीची सुरुवात कशी झाली ते आपण पाहणार आहोत, आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडणार.
असच का म्हणतात ‘नाम लिया शैतान का और शैतान हाजिर’ – Shaitan ka Naam Liya Shaitan Hazir
एखाद्या वेळी आपली मित्रमंडळी आरामात बसलेली आहे, मस्त मजा करत आहोत आणि गप्पा गोष्टी करत आहोत, तेव्हा अचानक आपल्यामध्ये उपस्थित नसलेल्या मित्राच्या बाबतीत आपण बोलतो किंवा त्या मित्राची आठवण काढतो, आणि तेवढयात तो मित्र तेथे येतो आणि सर्वांच्या तोंडातून एकच सूर निघतो, ‘नाम लिया और शैतान हाजीर’ म्हणजेच नाव घेतलं आणि शैतान प्रकट झाला असे.
पण कोणी असं का नाही म्हणत की ‘नाम लिया और भगवान हाजिर‘ नाही असे शब्द कोणाच्याही तोंडातून बाहेर येत नाहीत. का कारण अशी कोणती म्हण आहेच नाही पण यामध्ये शैतान म्हणजेच राक्षसाची च उपमा का दिल्या गेलेली आहे. आणि म्हण अश्या प्रकारे का प्रचलित झाली.
तर मागील काळात म्हणजेच पुरातन काळात राक्षसांचा लोकांमध्ये खूप दरारा होता, म्हणजेच रक्षासांच्या नावाने लोकांमध्ये भीती निर्माण व्हायची. आणि त्यांचे नाव घेण्यापासून सुध्दा बरेच लोक वाचत असत. तेव्हा अशी मान्यता होती की राक्षसांचे नाव घेणे म्हणजे त्यांना निमंत्रण देण्या सारखे होते.
त्याचे नाव जर घेतले तर तो कोणत्याही रुपात समोर येईल किंवा कोणते तरी संकट आपल्यावर ओढवून आणील म्हणून त्याचे नाव घेण्यापासून बरेच लोक आपला बचाव करत असत. म्हणून त्या काळात शैतानाचे नाव घेण्यासाठी प्रत्येकाला रोखले जायचे. एवढी राक्षसाविषयी भीती निर्माण झालेली होती म्हणून कोणीही त्यांचं नावसुध्दा घेत नसे.
नाव घेताबरोबर येण्याची ताकद फक्त शैतानामध्ये होती असे जुन्या काळातील लोक मानत असतं. म्हणून जो नाव घेतल्यावर उपस्थित होत असे त्याला सर्व शैतानाची उपमा देत असत, आणि असे करता करता जो नाव घेतल्याबरोबर हजर होत असे त्याला शैतान म्हटल्या जाऊ लागले.
तेव्हापासून तर आतापर्यंत कोणाचे ही नाव घेताबरोबर जर एखादी व्यक्ती हजर होते तर तेव्हा या म्हणीचा वापर केल्या जातो, ‘नाम लिया और शैतान हाजिर’.परंतु या बाबतीत माझी एक आवडतीची म्हण आहे आणि ती आपल्या मातृभाषेतील आहे, आपण या म्हणीला कोणी नाव घेताबरोबर हजार झाल्यास म्हणतो ‘ शंभर वर्षे आयुष्य आहे तुला’.
तर वरील लेखाच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारे कळले असेल की या म्हणीचा अर्थ आपल्या दैनंदिन जीवनात कश्या प्रकारे लागू झाला. तर अशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनविन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!