Science Day Information in Marathi
आपल्यापैकी बऱ्याच जणांना विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो या बद्दल माहिती असेल. परंतु आपण हा दिन का साजरा करतो हे माहिती आहे का? चला तर मग आज जाणून घेऊयात विज्ञान दिवस साजरा करण्यामागील खरे कारण काय आहे :
विज्ञान दिवस साजरा करण्यामागील कारण काय? – Science Day Information in Marathi
काय आहे विज्ञान दिवस? – What is a Science Day?
विज्ञान म्हणजे असे शास्त्र जे मनुष्याचे कष्ट, वेळ वाचवते आणि जीवनाला गती देते. विज्ञानाने आपले जीवन अतिशय सुखमय आणि सोयीस्कर बनविले आहे. आज आपण कुठलीही गोष्ट चुटकीसरशी करू शकतो कारण प्रत्येक गोष्टीसाठी विविध यंत्र आणि उपकरणे उपलब्ध आहेत.
पण विज्ञान हे केवळ यंत्र आणि उपकरणे यांवरच मर्यादित नाही तर विविध आरोग्य समस्यांच्या निवारनामागे देखील विज्ञानच आहे.
विज्ञानाच्या अशा अनमोल शोधांना आणि ते शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांना आदरांजली वाहण्याचा दिवस म्हणजे विज्ञान दिवस.
आपण विज्ञान दिवस का साजरा करतो? – Why we celebrate Science Day?
२८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतातील महान वैज्ञानिक चंद्रशेखर व्यंकट रमण (सी.व्ही. रमण) यांनी ‘रमण प्रभाव’ (Raman Effect) चा शोध लावला होता. हा शोध भौतिकशास्त्रामधील एक महत्वाचा घटक आहे.
या शोधासाठी डॉ. रमण यांना १९३० साली जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिक मिळाले होते. भारताला विज्ञान विभागात मिळालेले हे पहिले नोबेल होते. म्हणून दर वर्षी २८ फेब्रुवारीला संपूर्ण देशभर विज्ञान दिवस साजरा केला जातो.
विज्ञान दिवस कसा साजरा करावा? – How to celebrate Science Day?
- या दिवशी शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांचे भाषणे, वादविवाद स्पर्धा, वकृत्व स्पर्धा किंवा प्रश्नोत्तरांचे कार्यक्रम आयोजित करावे.
- शैक्षणिक संस्थांमध्ये विज्ञान प्रदर्शन आणि विज्ञान जत्रा असे कार्यक्रम साजरे करावे.
- विद्यार्थ्यांकडून विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित आकर्षक प्रकल्प आणि शोधनिबंध तयार करून आणायला सांगावे.
- सर्वात आधुनिक आणि समाजोपयोगी प्रकल्पांना बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करावा.
- या दिवशी आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये आपले योगदान देत असलेल्या शास्त्रज्ञांचे आभार मानले पाहिजे.
- लहान मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करावे.
- समाजाला विज्ञानाची गरज समजून सांगितली पाहिजे.
- वैज्ञानिक शोध हे मानवाच्या कल्याणासाठी आहेत त्यांचा उपयोग कुणाला हानी पोहचवणार नाही याची दक्षाता घेतली पाहिजे.
जागतिक विज्ञान दिवस – World Science Day
दरवर्षी १० नोव्हेंबर हा दिन “जागतिक विज्ञान दिन” म्हणून साजरा केला जातो. दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्व आणि विज्ञान क्षेत्रात होणाऱ्या नवनवीन शोधांबद्दल समाज घटकांना माहिती करून देणे हा या दिवसामागचा मुख्य हेतू होय.
विज्ञान दिवसा बद्दल नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न – Quiz on National Science Day
१. राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो ? (When is National Science Day?)
उत्तर: २८ फेब्रुवारी रोजी.
२. जागतिक विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? (When is World Science Day?)
उत्तर: १० नोव्हेंबर रोजी.
३. पहिला राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केल्या गेला होता ?
उत्तर: २८ फेब्रुवारी १९८७ साली पहिला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केल्या गेला होता.
४. शास्त्रज्ञ सी.व्ही. रमण यांचा जन्म कधी व कोठे झाला होता ?
उत्तर: शास्त्रज्ञ सी.व्ही. रमण यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ साली तामिळनाडू मधील तिरुचिरापल्ली येथे झाला होता.
५. शास्त्रज्ञ सी.व्ही. रमण यांना जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिक कधी देण्यात आले होते ?
उत्तर: १९३० साली.