Savitribai Phule Speech in Marathi
सावित्रीबाई फुले जयंती भाषण – Savitribai Phule Speech in Marathi
दरवर्षी दिनाकं ३ जानेवारी ला शाळेत व कनिष्ठ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी मिळून मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
माझ्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो मी आज तुमचा जास्त वेळ घेणार नाही.
कारण बरेच विद्यार्थी सावित्रीबाईच्या जीवनावर बोलणार आहेत तर मी काही त्यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग सांगत आहे कृपया लक्षपूर्वक ऐकावेत.
आपला भारत देश जेव्हा इंग्रजाच्या गुलामगिरीत होता. तेव्हा स्त्रियांना व मुर्लीना शिक्षणाची कसलीही सोय उपलब्ध नव्हती.
मुलींना शाळेत कुणीही पाठवत नव्हते.
अशा काळात ह्या महान आईनं ३ जानेवरी १८३१ ला एका गरीब घरी जन्म घेतला.
त्यांच्या काळात मुलगी म्हणजे उपभोगाची वस्तू समजायचे. चूल आणि मूल हेच तिच्या नशिबी होते.
परंतू महान क्रांतीकारी महात्मा ज्योतीबा फुले यांनी सावित्रीबाई सोबत सन १८४० ला लग्न केले.
त्यावेळी सावित्रीबाई अवघ्या ९ वर्षाच्या होत्या. सावित्रीबाईंना काहीच लिहिता वाचता येत नव्हते.
ज्योतिबानी सावित्रीबाईना शिकवलं त्या गणित शिकल्या लिहायला वाचायला शिकल्या.
Savitribai Phule Bhashan in Marathi
मित्रांनो जेव्हा ज्योतिबा सावित्रीला धडे शिकवत होते त्यावेळी समाजातील अशिक्षित लोक टोमणा मारायचे, त्यांची थट्टा करायचे.
पण त्यांची मनापासून शिक्षण घेण्यासाठी तयारी होती त्यांनी आपली जिद्द कायम ठेवली व त्या बरेच काही शिकल्या आणि सुशिक्षित झाल्या.
विद्यार्थी मित्रांनो ज्योतिबांच्या मनात स्त्रियांना शिक्षण द्यावे, त्यांना समाजात मानाचे स्थान मिळावे म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला.
पुण्यामध्ये सन १८४८ ला मुलींची पहिली शाळा उघडली. त्या शाळेत पहिली महिला शिक्षक म्हणून सावित्रीबाईंची निवड झाली.
मित्रानो त्या काळी लोक अडाणी, अज्ञानी होते. जेव्हा सावित्रीबाई शाळेत जाण्यास घरून निघायच्या तेव्हा गावचे लोक त्याच्या अंगावर शेण-दगड मारून फेकायचे. बरेचदा बाईचे कपडे खराब व्हायचे.
परंतू मनात तीव्र जिद्द असताना त्या काही घाबरल्या नाही. कारण मान-अपमान यांच्याकडे त्यांनी लक्षच दिले नाही. अपमानाच्या दिशेकडे पाठ फिरविली व शिक्षण सुरूच ठेवले.
मित्रांनो आज जर कुठल्या व्यक्तीने शिक्षकांवर शेणे, दगड मारलं तर काय होणार? याची जाणीव तुम्हा आम्हाला आहे. शेतकऱ्याच्या मुलींना व मुलांना दिवसा वेळ मिळत नव्हता म्हणून सावित्रीबाईंनी रात्रीची शाळा उघडली.
१८६४ ला त्यांनी अनाथ बाल आश्रम सुरू केले. त्यांच्या या कार्यक्रमाचे इंग्रजांनी सुध्दा स्वागत केले. एवढे महान कार्य एका स्त्रीने संपूर्ण भारतीय स्त्रियांकरीता केले. त्यांचे ऋण भारतीय स्त्री कधीही फेडू शकणार नाही.
पुण्यामध्ये २८ नोव्हेंबर १८९० ला प्लेगच्या साथीने ज्योतिबा दगावले व सात वर्षांनंतर १० मार्च १८१७ ला भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी शेवटचा श्वास घेतला.
“जे देशासाठी लढले,
ते अमर हुतात्मे झाले.
सोडीले सर्व संसार,
सोडीले सर्व घरदार”
एवढेच आज बोलून मी माझे दोन शब्द संपवितो
जय हिंद जय भारत…