पर्यावरणावर आधारित घोषवाक्य – Slogans On Environment
निसर्गात अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत, ज्या आपल्याकरिता खूप आवश्यक आहेत. परंतु, जंगलात होत असलेली वृक्ष तोडीमुळे त्यांच्या प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत. घनदाट जंगल हे तर निसर्गाचे सौदर्य आहे. जंगलात अनेक प्राण्यांचे वास्तव्य असते, पण ते सुद्धा आता गावाकडे धाव घेत आहेत.
वृक्ष तोडीमुळे तापमानात दिवसांदिवस वाढ होत आहे, त्यामुळे जलाचे बाष्पीभवन होऊन त्याची पातळी खूप खोलावली आहे. जर तापमानात असेच वाढत गेले तर आपणास पाण्याकरिता वणवण भटकावं लागेल. घनदाट जंगलामुळे हवेतील बाष्प शोषून घेतले जातात परिणामी वातावरणात गारवा राखला जातो.
पावसाळ्यात पाऊस हा जंगल भागात जास्त प्रमाणत पडत असतो. कारण, त्या ठिकाणी वृक्षांची संख्या मोठया प्रमाणात असते. झाडाच्या मुळा जमिनीत खोलवर रुजलेल्या असल्याने झाडे आपल्या मुळाच्या साह्याने जमिनीत पाणी साठवतात. परिणामी जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होते.
वृक्ष वाली आमची सोयरे मग का करता त्यांचे वैर.
नसतील वृक्ष तर पृथ्वी होईल रुक्ष.
Vriksh Slogan
वृक्ष बोलती मानवाला नका तोडू आम्हांला.
जेथे असती वृक्ष घनदाट तेथे बरसती सरी घनदाट.
Zade Lava Zade Jagva Slogans in Marathi
पर्यावरणाचे ठेवा भान तेव्हाचं बनेल देश महान.
यावरून आपल्याला जाणीव झालीच असेल की, वृक्ष आपल्यासाठी की महत्वाचे आहेत. वृक्षरोपणाचे कार्य हे देशपातळीवर करण्यात येत आहे. कारण, तसं करणे आज काळाची गरज झाली आहे. या लेखाच्या माध्यमातून आम्ही आपणास वृक्ष संवर्धन संबंधी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तरी याचे महत्व जाणून आपण सुद्धा आपलं योगदान द्यावं हीच विनंती..