पर्यावरणाची करा रक्षा तरीच होईल वसुंधरेची सुरक्षा.
पर्यावरण वाचवा प्राण वाचवा.
वृक्षच आहेत हरित वसुंधरेचे प्राण करून त्यांचे संवर्धन राखू पर्यावरणाची शान.
समतोल राखू पर्यावरण आणि हवामानाचा संकल्प करू वसुंधरेच्या स्वरक्षणाचा.
पर्यावरणाचा राखू समतोल करू कार्य बहुमोल.
पृथ्वीचे संरक्षण आपण तेव्हांच करू शकु ज्यावेळी झाडांची मोठया प्रमाणात होत असलेली कत्तल थांबवण्याचा आपण प्रयत्नं करूं. पर्यावरणाला वाचवण्याकरता, हिरवेगार करण्याकरता मोठया प्रमाणात झाडे लावुया.
पाण्याच्या नैसर्गिक जलस्त्रोतांचे रक्षण करूया, वन्यप्राण्यांच्या संरक्षणाकरता पुढे या. पेट्रोल डिझेल वरील वाहनांचा वापर कमी करून प्रदुषणाला रोखुया. सोबतच आपल्याला कोळसा, खनिज साधन संपत्ती, तेल याचे देखील रक्षण करावयास हवे. जनतेला धरतीचे महत्व त्यावरील संकट आणि तिच्या संरक्षणाकरता जागरूक करायला हवे.
या करीता पृथ्वी वर लिहीलेले स्लोगन्स् उपयोगात येऊ शकतात. या स्लोगन्स् मुळे पृथ्वीला वाचविण्याकरीता समाजाला नक्की प्रेरणा मिळेल.
लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी Save Earth Slogans in Marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्