Save Earth Slogans in Marathi
पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यावर जीवन संभव आहे. या पृथ्वीवर मानवाच्या जगण्याकरीता पर्याप्त संसाधनं उपलब्ध आहेत. या पृथ्वीवर मनुष्याकरीता पशु पक्ष्यांकरीता तसच झाडा वेलींकरीता पाणी मिळतं. श्वास घेण्याकरीता प्राणवायु प्राप्त होतो या सोबतच पृथ्वीवर आपल्या जगण्यासाठी चांगले वातावरण देखील उपलब्ध आहे.
या धरतीला आईचा दर्जा देण्यात आला आहे. म्हणुनच आपण सर्वांनी या धरतीचे रक्षण करावयास हवे. परंतु आज मनुष्य या पृथ्वीचे संरक्षण करण्या ऐवेजी तिच्या अस्तित्वालाच नष्ट करावयास निघाला आहे.
माणुस आज स्वतःच्या स्वार्थाकरीता आणि भौतिक सुखाच्या हव्यासापायी नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश करायला निघाला आहे यामुळे ग्लोबल वार्मिंग सारख्या समस्या उग्र रूप धारण करतायेत व पर्यावरणाचे प्रदुषण सतत वाढत आहे. यामुळे केवळ पृथ्वीचे जीवन नष्ट होण्याचा धोका वाढला आहे असे नव्हें तर संपुर्ण मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसते आहे.
आज पृथ्वीला संरक्षित करण्याकरीता लोकांना जागरूक करण्याची आवश्यकता आहे. आज या ठिकाणी पृथ्वीला सुरक्षित करण्यासाठी धरतीला संरक्षण देणारे काही स्लोगन्स् देत आहोत. याला वाचुन आपल्याला धरतीला संरक्षित करण्याकरीता नक्की प्रेरणा मिळेल सोबतच आपण जर या स्लोगनस् ला सोशल मिडीया साईट्वर शेयर कराल तर अन्य वाचकांना देखील आपल्या पृथ्वीला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रेरणा मिळेल.
धरतीला वाचवण्याकरीता आणि लोकांना जागरूक करण्याकरीता प्रत्येक वर्षी 22 एप्रील ला “वसुंधरा दिन” साजरा करण्यात येतो. या निमीत्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात येतं.
पृथ्वीला वाचवण्याकरता या स्लोगन्स् च्या माध्यमातुन लोकांच्या मनात धरतीचे संरक्षण करण्याची भावना विकसीत केली जाते.
पृथ्वी वाचवा घोषवाक्य – Save Earth Slogans in Marathi
थोडी तरी लाज बाळगुया पृथ्वीचा होणारा विनाश थांबवुया.
Save Earth Images
वसुंधरेला वाचवा जीवन आनंदी बनवा.
Save Earth Slogans in Marathi
वृक्षाचे महत्व पटवून देण्यासाठी आता शाळेमध्ये सुद्धा वृक्ष रोपण करण्यात येत आहे. सरकारने सुद्धा वृक्षारोपण करण्यात आपला सहभाग दर्शवला आहे. दर वर्षाला कमीत कमी एक लाख वृक्ष लावण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. असे झाले तर आपण पृथ्वीला वाचवू शकू. तसचं येणाऱ्या पिढीला शुद्ध हवा आणि चंगला निसर्ग देवू शकू. येणाऱ्या पिढीचा विचार करून सर्वांनी आपल्या दारी एक तरी वृक्ष लावला पाहिजे.
वृक्षांची संख्या अशीच कमी होत गेली तर पृथ्वीवर प्रदुषणाचे ढग जमा होतील. परिणामी ओझनच्या पातळीला धोका पोहचेल त्यातून अनेक आजाराच्या समस्या तयार होतीलं. वसुंधरेच्या स्वरक्षणार्थ आपण सर्वांनी जागृत असलं पाहिजे. त्यासाठी शक्य होईल तितकी झाडे लावा. प्लास्टिकचा वापर टाळावा. आपलं वातावरण हे स्वच्छता मुक्त झाले पाहिजे याची आपण काळजी घातली पाहिजे.
येणाऱ्या पिढीच्या डोळयात आपण केवळ अश्रुच ठेवुन जाणार आहोत का? नाही नां! चला तर मग आपण झाडे लावुया…. पृथ्वीला सजवुया.
आपण सर्व मिळुन पृथ्वीवरील प्राकृतिक सौंदर्याला जपुया… झाडे लावुया.
पर्यावरणाला हानी पोहचविण्याचे काम मानवा द्वारे दिवसांदिवस वाढतचं असल्याने जमिनीची योग्य प्रकारे झीज होत नाही. त्यामुळे ऋतुंच्या चक्र्मानात खूप बद्ल झाला आहे. शिवाय, वातावरणातील प्रदूषणाचे प्रमाण देखील बऱ्याचं प्रमाणात वाढल्याचे आपल्याला जाणवते. विकासाच्या आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली होणारी मोठ्या प्रमाणातील वृक्ष तोड हे त्यामागील प्रमुख कारण होय. त्याचप्रमाणे प्लास्टिक सुद्धा वसुंधरेची हानी करण्यास तितकेच कारणीभूत आहे.
पृथ्वीचे सौंदर्य तीला पुन्हा प्राप्त करून देऊया ही धरती हिरवीगार करूया.
निसर्गाचे आपण करत असलेले क्रुर शोषण वेळीच थांबविले नाही, तर येणारी पिढी आपल्याला जाब विचारल्या शिवाय राहाणार नाही.
मानवाच्या हव्यासापोटी आज हवा, पाणी आणि जमीन प्रदूषित करून टाकलं आहे. वृक्ष तोडीमुळे दिवसांदिवस तापमानाची वाढ होत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी खूप खोलवर गेली आहे. त्यातच ऋतू चक्र बदलं असल्याने पावसाळा देखील वेळेवर होत नाही. पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावं लागत असते. शहरीकरणाच्या संख्येत होणारी वाढ त्याकरता होणारी जंगलाची मोठया प्रमाणात कत्तल हे वसुंधरेची हानी करण्यास कारणीभूत ठरत आहेत.
आजची पिढी ही सुशिक्षित आहे त्यांनी वसुंधरेचे महत्व समजून तिच्या स्वरक्षणार्थ अनेक ठिकाणी स्वच्छतेच्या मोहिमा राबवण्यास सुरवात केली आहे. नवयुवक हे उद्याचे उज्वल भविष्य आहेत. त्यांनी जर यात मोठया संख्येने सहभाग घेतला तर आपण पुन्हा एकदा तिचे सौदर्य फुलवू शकू.
वर्तमानातील समस्या भविष्यात आणखीन उग्ररूप धारण, करण्या अगोदर आपण धरतीला तीचा भुतकाळ पुन्हा परत द्यायला हवा.
या वसुंधरेचा ठेवा जतन करायचा असेल, पुढच्या पिढीला आनंदात ठेवायचे असेल, तर चला! आधुनिकीकरणाच्यानावावर होणारी झाडांची कत्तल आपण लगेच थांबवुया.
आपण ज्या वसुंधरेवर राहतो तीला हानी पोहोचविण्यास आपणच कारणीभूत ठरत आहोत यांची आपणाला जाणीव व्हावी या अनुषंगाने या लेखाचे आणि त्यासबंधित काही घोषवाक्यांचे लिखाण केलं आहे. आपण एक जबाबदार नागरिक म्हणून वसुंधरेच्या सुरक्षेकरिता जागृत होऊन शक्य होईल तितकी वृक्ष लावावी व ती जगवण्याचा प्रयत्न करा. पृथ्वीचा समतोल हा निसर्गावर अवलंबून असल्याने आपण सर्वांसाठी आता फक्त एकचं नारा… झाडे लावा झाडे जगवा!
अनर्थ होण्याआधी जागे व्हां पृथ्वीचे हुंदके ऐका, ही धरती हिरवीगार करण्याकरीता पुढे या.
पुढील पानावर आणखी…