Satyanarayan Aarti
हिंदू धार्मिक व्रत कथांमध्ये सर्वश्रेष्ठ गणल्या जाणाऱ्या व्रतांमध्ये सत्यनारायण व्रताला विशेष महत्व दिले असून, या कथेमध्ये भगवान विष्णू यांच्या सत्यनारायण अवताराचे महत्व सांगण्यात आलं आहे. तसचं, सत्यनारायण व्रत कथेची दोन भागात विभागणी केली असून एका भागात सत्यनारायण पूजेविषयी माहिती देण्यात आली आहे तर दुसऱ्या भागात सत्यनारायण कथेचे लिखान करण्यात आलं आहे.
सत्यनारायण आरती – Satyanarayan Aarti Marathi
जय लक्ष्मी रमणा, स्वामी जय लक्ष्मी रमणा।
सत्यनारायण स्वामी, जन-पातक-हरणा ॥ जय लक्ष्मी… ॥रत्न जड़ित सिंहासन, अद्भुत छवि राजे ।
नारद करत नीराजन, घंटा वन बाजे ॥ जय लक्ष्मी… ॥प्रकट भए कलि कारण, द्विज को दरस दियो ।
बूढ़ो ब्राह्मण बनकर, कंचन महल कियो ॥ जय लक्ष्मी… ॥दुर्बल भील कठारो, जिन पर कृपा करी ।
चंद्रचूड़ एक राजा, तिनकी बिपति हरी ॥ जय लक्ष्मी… ॥वैश्य मनोरथ पायो, श्रद्धा तज दीन्हीं ।
सो फल भोग्यो प्रभुजी, फिर स्तुति किन्हीं ॥ जय लक्ष्मी… ॥भाव-भक्ति के कारण, छिन-छिन रूप धर्यो ।
श्रद्धा धारण किन्ही, तिनको काज सरो ॥ जय लक्ष्मी… ॥ग्वाल-बाल संग राजा, बन में भक्ति करी ।
मनवांछित फल दीन्हों, दीन दयालु हरि ॥ जय लक्ष्मी… ॥चढ़त प्रसाद सवायो, कदली फल मेवा ।
धूप-दीप-तुलसी से, राजी सत्यदेवा ॥ जय लक्ष्मी… ॥सत्यनारायणजी की आरती जो कोई नर गावे ।
तन-मन-सुख-संपति मनवांछित फल पावै॥ जय लक्ष्मी… ॥
हिंदू धर्मात या व्रताचे विशेष महत्व असून कोणत्याही शुभ कार्याला सुरवात करण्याआधी सत्यनारायण भगवंतांची पूजा केली जाते. यानिमित्त विशेषतः सत्यनारायण व्रत कथेचे पठन केले जाते आणि त्यानंतर सत्यनारायण भागवनतांची आरती म्हटली जाते. स्कंद पुराणातील रेवा खंडामध्ये या सत्यनारायण कथेचे महत्व सांगितले असून, भगवान विष्णू यांनी स्वत: त्यांच्या सत्यनारायण व्रत कथेची माहिती नारदमुनी यांना कथित केली आहे.
सत्यनारायण पूजेला कलयुगात विशेष महत्व असून या व्रताचे पूजन केल्याने आपले सर्व कर्म नष्ट होतात. तसचं, ज्या ठिकाणी सत्यनारायण पूजा करण्यात येत असते त्या ठिकाणचे वातावरण शुद्ध होवून ज्या निमित्ताने या पूजेचे आयोजन करण्यात आलं आहे त्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
अश्या प्रकारे या सत्यनारायण व्रताबद्दल लोकांची धारणा आहे. सत्यनारायण ग्रंथांत एकूण १७० संस्कुत श्लोकांचे लिखाण केलं असून, त्यांची पाच अध्यायांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सत्यनारायण कथेत ‘केलेला संकल्प विसरणे’ आणि ‘प्रसादाचा अपमान करणे’ या प्रमुख दोन विषयांचे महत्व सांगितले आहे.
सर्वसामान्य व्यक्तींना कळेल अश्या प्रकारे छोट्या छोट्या कथांच्या आधारे सत्याचे पालन न केल्याने जीवनांत येणाऱ्या समस्यांचा उल्लेख यात करण्यात आला आहे. त्यामुळे सत्याचे पालन आपण आपल्या जीवनांत एकनिष्ठेने केले पाहिजे.
सत्यनारायण पूजा करण्याची लागणारी सामुग्री – Satyanarayan Pooja Vidhi
याव्यतिरिक्त, सत्यनारायण पूजा करण्याची विधी आणि त्यासाठी लागणाऱ्या सामुग्रीची माहिती देखील सांगितली आहे. भगवान सत्यनारायण यांच्या पूजा विधीमध्ये केळीची पान आणि फळ तसचं, विविध रंगांची फुले, पंचामृत, पंचगव्य, सुपारी, विळ्याची पाने, अक्षित, कुंकू, हळद, दुर्वा आदी समुग्रीच्या साह्याने त्यांची पूजा केली जाते.
भगवान सत्यनारायण यांना आवडत असलेल्या दूध, मध, केळी, गंगाजल, तुळशीची पाने, आणि सुखा मेवा यांचे मिश्रण करून पंचामृत तयार केले जाते. प्रसाद म्हणून फळे, मिठाई, पेढे, चिरंजी, शिरा इत्यादी वस्तूंचा भोग चढवला जातो. सत्यनारायण पूजा केल्यानंतर सत्यनारायण कथेला सुरुवात होते. सत्यनारायण व्रताचा मूळ उद्देश असा सांगण्यात येतो की, या व्रताचे पालन केल्याने मनुष्य सर्व प्रकारच्या दुखापासून मुक्त होतो.
कलयुगात या व्रताचे विशेष महत्व असून, आपण नियमित या व्रताचे पालन केलं पाहिजे. सत्यनारायण व्रताप्रमाणे सत्यनारायण आरतीचे देखील विशेष महत्व असून, या आरतीचे पठन केल्याने भगवान विष्णू यांची स्तुती केल्याचा लाभ आपणास मिळतो. वरील लेखातील संपूर्ण माहिती आम्ही इंटरनेटच्या माध्यमातून मिळवली असून खास आपणासाठी या लेखाचे लिखाण केलं आहे.