Saraswati Vandana
हिंदू धर्मात विद्येची आराध्यदैवत म्हणून संबोधल्या जाणाऱ्या देवी सरस्वती ज्ञान, कला, संगीत, विद्या आणि शिक्षणाच्या देवी आहेत. या ज्ञानाच्या देवीचे पूजन हिंदू धार्मिक पंचागानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या वसंत पंचमीच्या दिवशी आणि अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला विजयादशमीच्या दिवशी केलं जाते.
यापैकी, वसंत पंचमीला उत्तरप्रदेश राज्यात सरस्वती पूजन केलं जाते तर, महाराष्ट्र राज्यात सरस्वती पूजन हे विजयादशमीच्या दिवशी केलं जाते. सरस्वती पूजन निमित्ताने लहान मुले पाटीवर किंवा कागदावर लेखणी किंवा पेन्सिलच्या साह्याने सरस्वतीची प्रतिमा रेखाटून तिचे पूजन करतात.
सरस्वती देवीला विद्येची आराध्यदैवत मानलं जात असल्याने विद्यार्थी आपल्या पुस्तकांची पूजा करतात, तर साहित्यिक, ग्रंथकार आपल्या ग्रंथाची पूजा करीत असतात. ज्या ज्या गोष्टींपासून आपल्याला ज्ञान मिळते त्या सर्व गोष्टींची आपण पूजा करीत असतो. ज्ञानरूपी महासागर असलेल्या देवी सरस्वतीची कृपा आपल्यावर सदैव राहावी याकरिता आपण नियमित देवी सरस्वतीची वंदना केली पाहिजे.
आपल्यावर देखील देवी सरस्वतीची कृपादृष्टी असावी याकरिता आम्ही या लेखात देवी सरस्वती यांची वंदना करण्यासाठी काही श्लोकांचे लिखाण केलं आहे. तरी, आपण या श्लोकांचे नियमित पठन करून देवी सरस्वती यांची आराधना करावी.
देवी सरस्वती वंदना – Saraswati Vandana Marathi
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना।
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता
सामां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
देवी सरस्वती यांच्या उत्पतिविषयी पुराणांत अनेक दत्त कथा देखील प्रसिद्ध आहेत. काही ग्रंथांमध्ये देवी सरस्वतीला ब्रह्मदेवाची कन्या म्हटल आहे. ‘देवी भागवता’ कथेमध्ये सरस्वती देवीची उत्पत्ती राधेच्या जिव्हागापासून झाली आहे असे म्हटल आहे.
तर, दुसऱ्या एका कथेत देवी सरस्वती या भगवान श्रीकृष्ण यांच्या मुखातून प्रकट झाल्या असे सांगण्यात आलं आहे. याचप्रमाणे, देवी सरस्वतीला भगवान शिव आणि देवी पार्वती (दुर्गा) यांची कन्या म्हटल आहे. अश्या प्रकारच्या अनेक दत्तकथा देवी सरस्वती यांच्या उत्पत्तीबद्दल प्रचलित आहेत.
देवी सरस्वती या हिंदू धर्मातील प्रमुख वैदिक आणि पौराणिक ग्रंथ कथांमधील प्रसिद्ध देवी आहेत. त्याचप्रमाणे, देवी सरस्वती यांची मेधासुक्त द्वारा स्तुती करण्यात आली आहे. हिंदू धर्मातील प्रसिद्ध ग्रंथ ‘सरस्वती पुराण’ आणि ‘मत्स्य पुराण’ (यापैकी ‘सरस्वती पुराण’ चा समावेश प्रसिद्ध १८ पुराणांमध्ये करण्यात आला नाही आहे).
पुराणांमध्ये देवी सरस्वती आणि ब्रह्मदेव यांच्या विवाहाचा उल्लेख करण्यात आला आहे. शिवाय, या पृथ्वीवरील पहिला मानव ‘मनु’ यांची उत्पत्ती त्यांच्यामुळे झाली असे म्हटल आहे. तर, मत्स पुराणात देवी सरस्वती यांचा उल्लेख वेगळ्याच प्रकारे करण्यात आला आहे.
देवी सरस्वती यांच्या विविध रूपांचे वर्णन या ठिकाणी केलं गेल असल्याने त्यांची सुमारे एकशे आठ नाव प्रसिद्ध आहेत. या नावांमध्ये त्यांना शिवानुजा म्हणजेच भगवान शंकर यांची छोटी बहिण असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. देवी सरस्वती या नावा प्रमाणे त्यांना वाणी, शारदा, वांगेश्वरी आणि वेदमाता नावाने देखील संबोधलं जाते. याचप्रमाणे, संगीताची उत्पत्ती ही देवी सरस्वती यांनी केली असल्याने त्यांना संगीताची देवी देखील म्हटल जाते.
देवी सरस्वती यांच्या उत्पत्तीबद्दल अनेक दंतकथा प्रचलित असल्या तरी आपण त्यांना ब्रह्म देवाच्या पत्नी म्हणून ओळखतो. ज्ञानरूपी देवी सरस्वती यांचे स्वरूप हे खूपच आकर्षक असून त्याचे वर्णन करावे तितके कमीच आहे.
एक मुख, चार भुजा, दोन्ही हाती वीणा घेऊन , एका हाती माळ आणि एका हाती पुस्तक पकडून देवी पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून स्मित हास्य करीत कमळाच्या फुलावर विराजमान आहेत. तसचं, देवी सरस्वती यांचे वाहन मोर असून त्यांचे निवास्थान वैकुंठ आहे.
मित्रांनो, देवी सरस्वती यांचे वर्णन करावे तितके कमीच कारण, त्यांच्या उत्त्पती बद्दल अनेक कथा प्रसिद्ध आहेत आणि प्रत्येक ग्रंथात त्यांचा उल्लेख भिन्न भिन्न प्रकारे करण्यात आला आहे. असे असले तरी, या देवीला ज्ञानाच्या आराध्य देवतेची उपमा देण्यात आली आहे. म्हणून आपल्यावर या देवीची सदैव कृपा दृष्टी राहावी या करिता आपण नियमित सरस्वती वंदना पठन केली पाहिजे.
देवी सरस्वतीला अनुसरून या मंत्राची रचना करण्यात आली असून, या मंत्राच्या माध्यमातून देवी सरस्वती यांच्या रूपाचे वर्णन करून त्यांची स्तुती करण्यात आली आहे. आश्या आहे की, आपण या लेखाच्या माध्यमातून देवी सरस्वती यांची वंदना करण्याचे महत्व समजून नियमित सरस्वती वंदना कराल. धन्यवाद..