Sant Tulsidas Information in Marathi
जसे सूर्यमालेत सूर्याला महत्वाचे स्थान प्राप्त आहे तेच स्थान तुलसीदास यांना भारतीय कवींमध्ये मिळालेले आहे. तुलसीदास एक हिंदू संत कवी होते. ते आपल्या रामभक्ती मुळे प्रसिद्ध होते. त्यांना रामायणाची रचना करणाऱ्या महर्षी वाल्मिकी यांचा कलयुगी अवतार सुद्धा म्हटले जाते. तसेच भयनाशक हनुमान चालीसाचे रचनाकार देखील तुलसीदास आहेत. प्रभू श्रीरामचे ज्यांना साक्षात दर्शन घडले असे महान कवी म्हणजे तुलसीदास.
संत तुलसीदास यांचे जीवन चरित्र – Sant Tulsidas Information in Marathi
नाव (Name) | तुलसीदास (Tulsidas) |
जन्म (Birth) | १५३२ (संवत १५८९) |
जन्मस्थान (Birth Place) | राजापूर, उत्तर प्रदेश (Rajapur, Uttar Pradesh) |
आईचे नाव (Mother Name) | हुलसीदेवी (Hulsi Devi) |
वडिलांचे नाव (Father Name) | आत्माराम दुबे (Aatmaram Dubey) |
पत्नीचे नाव (Wife Name) | रत्नावली (Ratnavali) |
गुरु (Guru) | नरहरीदास (Narharidas) |
प्रसिद्ध लेखन कार्य (Books) | रामचरितमानस, विनयपत्रिका, हनुमान चालीसा, जानकी मंगल, पार्वती मंगल इ. |
मृत्यु (Death) | १६२३ (संवत १६८०) |
संत तुलसीदास यांच्या बद्दल माहिती – About Sant Tulsidas in Marathi
तुलसीदास यांचा जन्म श्रावण महिन्यात शुक्ल पक्षात सप्तमीला झाला. परंतु त्यांच्या जन्म तिथी वरून वेगवेगळे मतभेद पहायला मिळतात. जाणकार इतिहासकारांनुसार त्यांचा जन्म १४९७/ १५११/ किंवा १५३२ (संवत १५८९) मध्ये झाला आहे असे म्हटल्या जाते. तथापि त्यांच्या जन्माबद्दल खालील दोहा प्रसिद्ध आहे:
“पन्द्रह सौ चौवन विसे कालिन्दी के तीर, श्रावण शुक्ला सप्तमी, तुलसी धरयो शरीर”
त्यांचे जन्म ठिकाण म्हणून उत्तर प्रदेश मधील राजापूर (चित्रकूट) या ठिकाणाचा उल्लेख करण्यात येतो. त्यांच्या आईचे नाव हुलसीदेवी तर वडिलांचे नाव आत्माराम दुबे असे होते.
तुलसीदास यांचे नाव रामबोला : Sant Tulsidas Story
तुलसीदास यांचे नाव रामबोला असे होते. या नावामागे एक कथा आहे. असे म्हटल्या जाते कि तुलसीदास यांचा जन्म हा इतर मुलांसारखा झाला नसून फार अद्वितीय स्वरूपाने झाला होता. तुलसीदास हे आपल्या आईच्या गर्भात जवळपास १२ महिने राहिल्या नंतर जन्माला आले. विशेष म्हणजे जन्मतःच त्यांना पूर्ण दात देखील होते. जन्माला आल्या आल्या त्यांच्या मुखातून प्रथम शब्द हा ‘राम’ निघाला होता. व याच कारणामुळे त्यांचे नाव रामबोला असे ठेवण्यात आले होते.
रामबोला चे तुलसीदास कसे झाले – How Rambola becomes Tulsidas
रामबोला चे तुलसीदास कसे झाले यामागे सुद्धा खूप रोचक कथा आहे. तुलसीदास यांच्या पत्नीचे नाव रत्नावली होते. तिच्या प्रेमात ते इतके बुडाले होते कि, ते एक क्षण सुद्धा तिच्याशिवाय राहू शकत नव्हते. एके दिवशी पत्नी माहेरी गेली असे कळल्यावर तुलसीदास खूप व्यथित झाले. तिला भेटण्याकरिता व्याकूळ झालेले तुलसीदास रात्रीच्या घनदाट काळोखात नदी पार करून गेले. हि गोष्ट त्यांच्या पत्नीला आवडली नाही व दोघांमध्ये वाद निर्माण झाला. रात्नावलीने त्यांना खालील दोह्यामधून फटकारले.
“अस्थि चर्म मय देह यह, ता सों ऐसी प्रिती,
नेकु जो होती राम से, तो काहे भव-भीत”
या दोह्यामुळे रामबोलाचे मतपरिवर्तन झाले व यातूनच जन्म झाला तुलसीदास यांचा.
तुलसीदास यांचे गुरु नरहरिदास : Guru of Tulsidas Naraharidas
अगदी लहानपणीच आई आणि वडिलांचे निधन झाल्याने तुलसीदास पोरके झाले होते. अशा या अनाथ मुलाला नरहरिदास यांनी सांभाळले. त्यांनी तुलसीदास यांना आपल्या आश्रमात राहायला जागा दिली. लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले तुलसीदास यांनी वेदांचे ज्ञान वाराणसी येथून प्राप्त केले. त्यांना हिंदी साहित्य आणि दर्शनशास्त्राचे धडे प्रसिद्ध गुरु शेषा यांच्याकडून मिळाले होते. नंतर ते आपल्या मूळगावी परतले.
गुरुकडून मिळालेली शिक्षा ते लोकांना लघुकथा आणि दोहे यांद्वारे सांगत होते. सोप्या भाषेत मिळणाऱ्या ज्ञानाद्वारे लोकांना त्यांचे उपदेश समजत होते. तुलसीदास यांनी संपूर्ण भारतभर यात्रा केली. परंतु त्यांनी जास्तीत जास्त वेळ हा काशी, अयोध्या आणि चित्रकुट येथेच व्यतीत केला. येथूनच सुरुवात झाली त्यांच्या रामभक्तीची.
तुलसीदासांची रामभक्ती : Tulsidas devotee of Rama
रामभक्ती मध्ये तुलसीदास इतके तल्लीन झाले होते कि त्यांना राम नामाशिवाय काहीच सुचत नव्हते, आपल्या याच भक्ती मधून त्यांनी प्रसिद्ध ‘ रामचरीतमानस ‘ या भक्ती काव्याची रचना केली. ज्यामध्ये असे म्हटले गेले आहे कि या महान काव्याची रचना करण्यासाठी त्यांना स्वयम रामभक्त हनुमान यांनी सांगितले होते.
भगवान श्रीराम प्रती असलेल्या आपल्या या निस्सीम भक्तीमुळे त्यांना श्रीरामांनी चित्रकुट मधील अस्सी घाट येथे प्रकट होऊन दर्शन सुद्धा दिले होते. या प्रसंगी भगवान रामांनी तुलसीदास यांना चंदन टीळा लावल्याचाही उल्लेख त्यांनी खालील दोह्यामध्ये केलेला आहे.
“चित्रकुट के घाट पै, भई संतन के भीर तुलसीदास चंदन घीसै, तिलक देत रघुबीर”
तुलसीदास यांचे लेखन साहित्य – Tulsidas Books
तुलसीदास हे महान कवी तर होतेच परंतु ते प्रख्यात लेखक सुद्धा होते. त्यांच्याद्वारे मुख्यत्वे अवधी आणि ब्रज भाषेमध्ये लिखाण काम केले गेले.
- ब्रज भाषेतील
- वैराग्य सांदिपनी
- गीतावली
- साहित्य रत्न
- कृष्ण गीतावली
- दोहावली
- विनय पत्रिका इ. प्रमुख रचना आहेत.
तर अवधी भाषेमधील त्यांचे
- रामचरितमानस
- बरवाई रामायण
- पार्वती मंगल
- जानकी मंगल
इ. रचना प्रसिद्ध आहेत. यांपैकी ‘रामचरितमानस’ हे भक्तीकाव्य फार प्रसिद्ध आहे. हे काव्य म्हणजे एक प्रकारचे रामायणच आहे. या काव्यामध्ये सात कांड आहेत. हे सात कांड खालील प्रमाणे आहेत.
- बालकांड
- अयोध्याकांड
- अरण्यकांड
- किष्किंधाकांड
- सुंदरकांड
- लंकाकांड
- उत्तरकांड
यामधील सुंदरकांड हे वर्णन फार प्रभावी आहे. तुलसीदासांनी हे काव्य सव्वीस दिवसांत लिहून पूर्ण केले आहे असे म्हटले जाते. यांशिवाय हनुमान चालीसा, हनुमान बहुक, तुलसी सतसाई आणि हनुमान अष्टक हे सुद्धा सर्वज्ञात आहेत. रामचरितमानस या ग्रंथाची प्रस्थावना तुलसीदासांनी सुरुवातीला मांडली आहे. यामध्ये भगवान राम तसेच रावण यांच्या पुर्वजन्मांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे.
रामलीला या उत्सवाचा प्रारंभ हा रामचरितमानस मधूनच झाला असे मानले जाते. विनय – पत्रिका हे तुलसीदास यांची शेवटची कृती होय, ज्यावर प्रभू श्रीरामाचे हस्ताक्षर होते.
तुलसीदास यांचा मृत्यु : Tulsidas Death
आयुष्याच्या शेवटी त्यांना आजारपणाने ग्रासले होते. शेवटी १६२३ (संवत १६८०) मध्ये गंगा नदीच्या किनारी अस्सी घाट येथे त्यांचा मृत्यु झाला. याचा उल्लेख पुढील दोह्यात पाहायला मिळतो :
“संवत सोलह सौ असी, असी गंग के तीर, श्रावण शुक्ला सप्तमी, तुलसी तज्यो शरीर”
अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या मुखात राम नाम होते.
नेहमी विचारल्या जाणारी प्रश्ने (FAQs) – Information about Sant Tulsidas
१. प्रसिद्ध हनुमान चालीसा कोणी लिहिली आहे?
उत्तर: संत तुलसीदास.
२. तुलसीदास यांचा जन्म कोणत्या शतकात झाला होता?
उत्तर: तुलसीदास यांच्या जन्माबद्दल मतभेद आहेत परंतु १६ व्या शतकात त्यांचा जन्म झाला असावा असे जाणकार इतिहासकारांचे मत आहे. तसे दोहे सुद्धा उपलब्ध आहेत.
३. तुलसीदास यांना कोणाचा कलयुगी अवतार म्हटल्या जाते?
उत्तर: रामायण रचयिता, महर्षी वाल्मिकी.
४. तुलसीदास यांचा सर्वात प्रसिद्ध काव्यग्रंथ कोणता?
उत्तर: रामचरीतमानस.
५. रामायण आणि रामचरितमानस मध्ये की अंतर आहे?
उत्तर: रामायण आणि रामचरितमानस दोन्ही प्रभू श्रीरामाच्या जीवनावर आधारित आहेत. रामायणाची रचना ‘श्लोकां’मधून केलेली आहे तर रामचरितमानस ची रचना ‘चौपाई’ च्या स्वरुपात केलेली आहे.
६. तुलसीदास हे कोणत्या मुघल शासकाचे समकालीन होते?
उत्तर: जलालुद्दीन अकबर.
७. तुलसीदास यांचे रामचरितमानस हे काव्य कोणत्या भाषेत लिहलेले आहे?
उत्तर: रामचरित मानस हे मुख्यत्वे अवधी भाषेत लिखित आहे. परंतु यामध्ये संकृत भाषेतील श्लोक बघायला मिळतात.
८. तुलसीदा व्यतिरिक्त कोणाचे दोहे प्रसिद्ध आहेत?
उत्तर: संत कबीरदास.
९. तुलसीदास यांचा मृत्यु कुठे झाला?
उत्तर: अस्सी घाट, गंगा नदी किनारी संत तुलसीदास यांचा मृत्यु झाला.