Sant Kabir Information in Marathi
संत कबीरदास यांचे जीवनकार्य – Sant Kabir Information in Marathi
नाव (Name) | संत कबीरदास (Kabir Das) |
जन्म (Birthday) | 1398, लहरतारा ताल, काशी |
मृत्यु (Death) | 1518,मगहर, उत्तर प्रदेश |
आई (Mother Name) | नीमा |
वडिल (Father Name) | नीरू |
पत्नी (Wife Name) | लोई |
मुल (Children) | कमाल,कमाली |
भाषा (Language) | अवधी, सधुक्कडी, पंचमेल खिचडी |
शिक्षा (Education) | निरक्षर |
प्रमुख रचना (Books) | साखी, सबद, रमैनी |
Kabir Das – कबीरदास भारतातील एक महान कवी आणि समाजसुधारक होते. हिंदी साहित्याचे ते विव्दान होते. कबीर दास या नावाचा अर्थ महानतेशी जोडला गेला आहे ते अर्थातच भारतातील महान कवींपैकी एक होते. जेव्हां कधी भारतातील धर्म, भाषा, संस्कृतीची चर्चा होते त्यावेळी कबीरदासजींचे नाव सर्वात वर घेतले जाते कारण कबीरदासजीं नी आपल्या दोहयांच्या माध्यमातुन भारतिय संस्कृतीचा प्रसार प्रचार केला आहे या व्यतीरीक्त त्यांनी जीवनाशी निगडीत जे उपदेश केले आहेत त्यांना आत्मसात करून आपण आपले जीवन आदर्श बनवु शकतो. संत कबीरांनी आपल्या दोहयांच्या माध्यमातुन समाजात पसरलेल्या अंधश्रध्दा, चालिरीतींना, भेदभावाला दुर करण्याचा प्रयत्न केला आहे. संत कबीरांच्या मार्गावर चालणाऱ्या धार्मिक समुदायाला कबिरांचे सिध्दांत आणि उपदेश जीवनाचा आधार वाटतो.
संत कबीरांचे दोहे – Sant Kabir Dohe
“जिन खोजा तिन पाइया गहरे पानी पैठ मैं बपुरा बूडन डरा रहा किनारे बैठ”
संत कबीर म्हणतात… प्रयत्न करणाऱ्याच्या हाती काही न काही येतेच त्याचे प्रयत्न वाया जात नाहीत एखादा गोताखोर पाण्यात खोल गेल्यानंतर काही नं काही घेऊन वर येतोच…परंतु काही माणसं अशीही असतात जी बुडण्याच्या भितीने पाण्यात उतरतच नाहीत किनाऱ्यावर बसुन राहातात. त्यांच्या हाती काहीही येत नाही. संत कबीरांचे उपदेश वाचणाऱ्याच्या मनात सकारात्मक भाव निर्माण होतात आणि तो यशाच्या मार्गावर अगे्रसर होतो. संत कबीर असेही म्हणतात मोठ मोठया पोथ्या पुस्तके वाचुन कित्येक लोक मृत्युच्या आधीन गेलेत परंतु सगळेच विव्दान कुठे झाले? प्रेमाचे अडीच अक्षर जरी वाचलेत अर्थात वास्तवात प्रेम काय आहे हे ओळखणारा खऱ्या अर्थाने ज्ञानी आहे यावर कबीरांचा विश्वास होता.
“पोथी पढ़ी पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय ढाई आखर प्रेम का पढे़ सो पंडित होय”
Kabir ke Updesh कबीरदास जींचे उपदेश हे कोणत्याही काळाकरता प्रेरणादायक असे आहेत या उपदेशातुन त्यांनी समस्त मानवजातीला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली आहे या सोबतच समाजात पसरलेल्या वाईट चालिरीतींवर आपल्या उपदेशांमधुन कडाडुन विरोध देखील केला आणि आदर्श समाज निर्माण होण्यावर जोर दिला. या सोबतच संत कबीरांचे उपदेश प्रत्येकाच्या मनात नव्या उर्जेचा संचार करतात. चला तर या लेखामधुन ओळख करून घेऊया हिंदी साहित्यातील महान कवी आणि समाज सुधारक कबीर दास यांच्या जिवनकार्याची
संत कबीरदास यांचा जीवन परिचय – Sant Kabir Life Story
हिंदी साहित्यातील महान व्यक्तिमत्व कबीरदास यांच्या जन्माबद्दल ठोस अशी माहिती उपलब्ध नाही. कबीरांच्या आई वडिलांबद्दल अनेक मत मतांतरं सापडतात तरी देखील त्यांचा जन्म 1398 ला काशीत झाल्याचे मानले जाते. काही जणांच्या म्हणण्यानुसार त्यांचा जन्म एका विधवा ब्राम्हण स्त्रीच्या पोटी झाला जीला चुकुन स्वामी रामानंद यांनी पुत्रवती होण्याचा आशिर्वाद दिला होता. त्या विधवा ब्राम्हणीने पुत्र जन्मानंतर त्या लहान शिशु ला काशी जवळ लहरतारा गावाजवळ फेकुन दिले पुढे त्या बाळाचे संगोपन “नीमा” आणि “नीरू” यांनी केले पुढे या बाळाने संत कबीर होऊन भारताच्या या जन्मभुमीला पवित्र केले. संत कबीरांनी स्वतःला जुलाह रूपात व्यक्त केले आहे.
“जाती जुलाहा नाम कबीरा बनी बनी फिरो उदासी”
कबीरपंथीय लोकांच्या मते कबीर काशीतील लहरतारा तलावामधल्या कमळातुन निर्माण झाले होते. कबीरांच्या जन्मासंबंधी या ओळी कबीरपंथीयांमध्ये फार प्रसीध्द आहेत.
“चैदह सौ पचपन साल गए चन्द्रवार एक ठाठ ठऐ। जेठ सुदी बरसायत को पूरनमासी तिथी प्रगट भए।। घन गरजें दामिनी दमके बुँदे बरसें झर लाग गए। लहर तलाब में कमल खिले तहँ कबीर भानु प्रगट भऐ।।”
संत कबीरदास यांचे शिक्षण – Kabirdas Education
संत कबीर हे निरक्षर असल्याचे बोलले जाते अर्थात त्यांना जरी लिहीता वाचता येत नव्हते तरी देखील ते इतर मुलांपेक्षा अत्यंत वेगळे होते. गरीबीमुळे त्यांचे आई वडील त्यांना शिक्षण घेण्याकरता पाठवु शकले नाही त्यामुळे पुस्तकी शिक्षण त्यांना ग्रहण करता आले नाही. मसि कागद छूवो नहीं, कलम गही नहिं हाथ। संत कबीरांनी स्वतः ग्रंथ लिहीलेले नाहीत त्यांच्या मुखातुन निघालेले उपदेश आणि दोहे ते म्हणायचे त्यावेळी त्यांच्या शिष्यांनी ते लिहुन घेतले आहेत.
संत कबीरांवर स्वामी रामानंद यांचा प्रभाव – Kabir Das Life History
कबीर यांच्या धर्मा संबंधी देखील कोणतीही माहिती उपलब्ध नाही. असं म्हणतात की कबीर जन्मतः मुस्लिम होते ज्यावेळी ते स्वामी रामानंद यांच्या संपर्कात आले त्यावेळी त्यांना हिंदु धर्माचे ज्ञान प्राप्त झाले. पुढे स्वामी रामानंदांना त्यांनी आपला गुरू बनविले. एकदा संत कबीर पंचगंगेच्या घाटावर पायऱ्या उतरतांना पडले त्याच वेळी स्वामी रामानंद स्नानाकरता नदीच्या पायऱ्या उतरत होते त्यावेळी स्वामी रामानंद यांचा पाय कबीरांवर पडला, कबीरांच्या तोंडुन त्यावेळी राम राम निघाले. त्या राम शब्दाला कबीरांनी आपला दिक्षा मंत्र मानला आणि रामानंदांना आपला गुरू मानले. कबीर म्हणतात…
‘हम कासी में प्रकट भये हैं रामानंद चेतायें।’
संत कबीर कोणत्याही धर्माला मानत नव्हते किंबहुना सर्व धर्मातील चांगल्या विचारांना ते आत्मसात करीत असत. यामुळेच कबीरांनी हिंदु मुस्लिम भेदभाव दुर सारून हिंदु भक्त आणि मुस्लिम फकिर यांसोबत सत्संग केला आणि दोन्ही धर्मातील चांगल्या विचारांना ग्रहण केले.
कबीरदास यांचा विवाह आणि मुलं – Kabir Das Life History
कबीरदास यांचा विवाह वनखेड़ी बैरागींची कन्या “लोई” हिच्या समवेत झाला. विवाहा पश्चात त्यांना दोन अपत्यांची प्राप्ती झाली कबीरांच्या मुलाचे नाव कमाल आणि मुलीचे नाव कमाली होते. आपल्या कुटूंबाचे संगोपन करण्याकरता कबीरांना आपल्या चरख्यावर फार काम करावं लागत असे आणि सततच्या कामामुळे साधु संतांचे देखील घरी येणे जाणे सुरू राहात असे. त्यांच्या ग्रंथातील एका दोहयावरून असा अनुमान लावता येतो की त्यांचा मुलगा कमाल वडिलांच्या मतांशी सहमत नव्हता, तो दोहा असा…
“बूड़ा बंस कबीर का, उपजा पूत कमाल। हरी का सिमरन छोडि के, घर ले आया माल।”
कबीरांनी आपल्या दोहयांमधे आपल्या मुलीचा कमालीचा उल्लेख कुठेही केलेला नाही. साधु संतांचे सतत घरी येणे जाणे असल्यामुळे घरात मुलांना दोन वेळेला जेवण मिळणे देखील कठीण झाले होते यामुळे कबीरांच्या पत्नीला फार राग यायचा त्यावर कबीर तीला समजवतांना म्हणायचे…
“सुनि अंघली लोई बंपीर। इन मुड़ियन भजि सरन कबीर।।”
कबीर पंथीय अनुयायी कबीरांना बाल ब्रम्हचारी आणि विरक्त मानतात. अनुयायांच्या मते कमाल त्यांचा शिष्य होता आणि कमाली व लोई त्यांच्या शिष्या होत्या. लोई शब्दाचा एकाठिकाणी पांघरूण म्हणुन देखील कबीरांनी उल्लेख केलेला आढळतो तसच एके ठिकाणी लोई ला आवाज देत कबीर म्हणतात…
“कहत कबीर सुनहु रे लोई। हरी बिन राखन हार न कोई।।”
एक मान्यता अशी देखील आहे की लोई ही अगोदर कबीरांची पत्नी असेल आणि त्यानंतर कबीरांनी तिला आपली शिष्या केले असेल. कबीर आपल्या दोहयामधे म्हणतात…
“नारी तो हम भी करी, पाया नहीं विचार। जब जानी तब परिहरी, नारी महा विकार।।”
संत कबीरांची वैशिष्टये – Sant Kabir Information
संत कबीरांना अनेक भाषांचे ज्ञान होते. साधु संतांसमवेत ते कित्येक ठिकाणी भ्रमण करीत असत त्यामुळे त्यांना अनेक भाषांचे ज्ञान अवगत झाले होते. या शिवाय कबीर आपल्या विचारांना आणि अनुभवांना व्यक्त करण्याकरता स्थानिक भाषेमधील शब्दांचा वापर करत असत. त्यांच्या भाषेला ’सधुक्कड़ी’ देखील म्हंटल्या जातं. संत कबीर आपल्या स्थानिक भाषांमधुन लोकांना समजावीत आणि उपदेश करत या शिवाय ते जागो जागी उदाहरणं देत आपल्या विचारांना लोकांच्या अंतरमनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत. कबीरवाणी ला साखी, सबद आणि रमैनी या तीनही रूपात लिहील्या गेले आहे. ’बीजक’ नावाने ते प्रसीध्द आहे. कबीर ग्रन्थावलीत देखील त्यांच्या रचनांचा संग्रह आपल्याला पहावयास मिळतो. संत कबीरांनी परमेश्वरापेक्षा गुरूला उच्च दर्जा दिला आहे. कबीरांनी गुरू ला कुंभाराचे उदाहरण देत सांगीतले आहे की ज्याप्रमाणे कुंभार अतिशय सुबकतेने एखादे मातीचे भांडे आकार देऊन घडवतो त्याप्रमाणे गुरू आपल्या शिष्याला उपदेशांनी आणि विचारांनी उत्तम घडवण्याचा प्रयत्न करतो. संत कबीर हे नेहमी सत्य बोलणारे निर्भय आणि निर्भीड व्यक्ती होते. कटु सत्य सांगतांना देखील ते मोठया धाडसाने सांगत असत. संत कबीरांचे आणखीन एक वैशिष्टय म्हणजे ते आपल्या निंदकांना स्वतःचा हितचिंतक मानायचे. कबीरांना सज्जनांची, साधुसंतांची संगत आवडत असे. कबीर म्हणतात…
“निंदक नियरे राखिये, आँगन कुटी छवाय। बिन पानी साबुन बिना, निर्मल करे सुभाय।।”
आपल्या उपदेशांनी ते समाजात बदल घडवु ईच्छित होते. समस्त मानवजातीला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देत होते. कर्मकांडाचे प्रखर विरोधी संतकबीर संत कबीर खोटे प्रदर्शन, कर्मकांड आणि पाखंड याच्या प्रखर विरोधात होते त्यांना मौलवी आणि पंडीतांनी केलेली कर्मकांड आवडत नसत तसच कबीर अवतार, मूर्तीपुजा, रोज़ा, ईद, मस्जिद, मंदिर यावर त्यांचा विश्वास नव्हता. Sant Kabir Das कबीर दास यांना मस्जिीदीत नमाज पढणे, मंदिरात जप करणे, कपाळाला गंध लावणे, मुर्तिपुजा करणे, रोजा किंवा उपवास करणे अजिबात आवडत नसे. कबीरांना साधे राहाणे आवडत असे ते नेहमी साधे जेवण ग्रहण करत असत. बेगडी आणि नाटकी राहाणे त्यांना रूचत नसे आपल्या आसपासच्या समाजाला अवडंबर मुक्त बनविण्याची त्यांची ईच्छा होती.
संत कबीर यांचे ग्रंथ – Kabir Granthavali
संत कबीरांच्या नावाने जी गं्रथसंपदा आढळुन आली आहे त्यात वेगवेगळया लेखांप्रमाणे ती भिन्न आहे. एच.एच विल्सन यांच्या मते कबीरांचे एकुण 8 ग्रंथ आहेत तर विशप जी.एच. वेस्टकाॅट यांनी कबीरांच्या 84 गं्रथांची यादी प्रकाशित केली आहे दुसरीकडे रामदास गौड यांनी ‘हिंदुत्व’ मधे कबीरांची 71 पुस्तके असल्याचे नमुद केले आहे.
संत कबीरदास यांची साहित्यातील देणगी – Kabir Book
कबीरांच्या वाणीचा संग्रह ’बीजक’ Bijak नावाने प्रसिध्द आहे याचेही तिन भाग आहेत रमैनी, सबद आणि सारवी, यात पंजाबी, राजस्थानी, खड़ी बोली, अवधी, परबी, ब्रजभाषा सहित अनेक भाषांची खिचडी आढळुन येते. कबीरांच्या मते मनुष्याजवळ त्याचे आई वडिल, मित्र, असतात म्हणुनच ते परमेश्वराला देखील याच दृष्टीकोनातुन पाहातात आणि म्हणतात ’हरिमोर पिउ, मैं राम की बहुरिया तो कभी कहते हैं, हरि जननी मै बालक तोरा’
कबीरदास यांचे निधन – Sant Kabir Death
संत कबीरदास यांचे संपुर्ण जीवन काशी येथे व्यतीत झाले परंतु मृत्यु आधी ते मगहर येथे निघुन गेले त्यावेळच्या लोकांमधे अशी धारणा होती की काशीत मृत्यु आल्यास स्वर्गप्राप्ती होते तर मगहर येथे मृत्यु आल्यास नरकात जावे लागते. कबीरांना स्वतःच्या मृत्युची चाहुल लागली होती त्यामुळे लोकांची ही धारणा चुकीची असल्याचे सिध्द करण्याकरता ते मगहर येथे निघुन गेले असे देखील म्हंटल्या जाते की त्यांच्या शत्रुंनी त्यांना काशी सोडण्यास भाग पाडले. त्यांना वाटायचे की कबीरांना मुक्ती मिळायला नको परंतु कबीर काशीत मृत्यु यावा म्हणुन नव्हें तर रामाच्या भक्तितुन मुक्ती मिळविण्यासाठी धडपडत होते.
“जौ काशी तन तजै कबीरा तो रामै कौन निहोटा।”
संत कबीर हे एक महान कवि आणि समाज सुधारक होते. आपल्या साहित्याव्दारे त्यांनी लोकांना योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली या शिवाय समाजात पसरलेल्या कुप्रथांचा कडाडुन विरोध केला. साध्या राहाणीमानावर त्यांचा विश्वास होता ते अहिंसा, सत्य आणि सदाचारासारख्या गुणांचे पुरस्कर्ते होते. कबीरदासां सारख्या कविने भारतात जन्माला येणे ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.
संत कबीरदास यांचे योगदान – Kabir Works
कबीरदास यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातुन समाजात पसरेल्या कुप्रथांना चुकीच्या चालिरितींना दुर केले या शिवाय सामाजिक भेदभाव आणि आर्थिक शोषणाचा विरोध केला.
लक्ष्य दया: तुमच्या जवळ संत कबीरदासबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्