Sanchi Stupa – सांचीचा विहार महान स्तूपासाठी प्रसिध्द मानल्या जाते. भारताच्या मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात साची शहरात हे महान स्तूप अस्तित्वात आहे. भोपाळपासून उत्तर-पूर्व मध्ये ४६ किलोमीटर अंतरावर आहे.
सांची स्तुपाचा निर्माण महान सम्राट अशोक यांच्या पत्नी देवीने पूर्ण करून घेतला होता. देवी हि विदिशा येथील एका व्यापाऱ्याची कन्या होती. सांची तिचे जन्मस्थान मानले जाते. व अशोकाशी तिचा विवाह येथेच झाला होता.
देवी अशोकाच्या सर्वात चाहत्या पत्नींपैकी एक होती. ह्या स्तुपाखेरीज मोठे परिसर बनविले होते. त्यावर विविध कलाकुसरीची व रत्नांचे जळत केले होते. हि वास्तू मौर्य काळातील त्यांच्या विद्वत्तेच्या आणि विकासाचे प्रतिक बनले.
महान साची स्तूप चा इतिहास – Sanchi Stupa Information in Marathi
मौर्यांचा काळ
साची चा महान स्तूप भारतातील प्राचीन इतिहासातील सुप्रसिद्ध संरचनापैकी एक मानली जाते.
3 ऱ्या शतकात अशोकाने ह्याच्या निर्माणाची कल्पना आपल्या पत्नी देवीस सांगितली. तिने आपल्या पतीच्या इच्छेचा सन्मान करीत याचे निर्माण करून घेतले. हि नाभिक अर्धगोल संरचना बौद्ध धर्मीय अवशेष ध्यानात ठेवून बनविल्या गेली.
महान मौर्य साम्राज्याच्या छत्राच्या रुपास दर्शवते. व भगवान बुद्धाप्रती आत्मीय भाव व आदर व्यक्त करण्यासाठी याचा निर्माण केला गेला. येथे स्तंभांवर रत्नांनी सजवले गेले आहे.
हा स्तंभ आपल्याला आता चांदवा येथे पहावयास मिळतो. हा स्तंभ सम्राट अशोकाने लिहलेला एक शिलालेख मानल्या जाते. शंख शिंपल्या पासून बनविलेले विविध आभूषण रचना यावर दिसतात.
श्रुन्गांचा काळ
वास्तविक विटांच्या स्तूपास नंतर श्रुन्गांच्या काळात दगडांनी झाकले होते. अशोक वादनाच्या आधारावर असे मानले जाते कि स्तूप दुसऱ्या शतकात श्रुन्गानी मौर्यांवर हल्ला करून स्तुपाची तोडफोड केली होती.
नंतर त्याच्या अग्निमित्र या पुत्राने या स्तूपास पुनर्बांधणी करून यास दगडांनी झाकले व त्यावेळी हे स्तूप फारच विशाल झाले होते.
स्तूपाच्या मध्याभागी एक चक्र सुद्धा लागले आहे. त्यास स्थानिक लोक धर्मचक्र असे म्हणतात. पुर्ननिर्मानाच्या वेळी येथे चार प्रवेश द्वार बनविले गेले होते.
सातवाहन काळ
सातवाहन साम्राज्याच्या वेळी ह्या स्तुपावर आणखी काही चित्र व कलाकुसरीचे आकार व रत्न चढविल्या गेले होते. असे म्हटले जाते कि सांची स्तूप द्वारावरील उंच कटघरा सातवाहन कालीन मानल्या जाते. दगडावर रत्न व चित्रांचे रेखाटन केले गेले होते.
बुद्धांच्या जीवनासंबंधी काही महत्वाच्या घटनांचे चित्रीकरण ह्या दगडावर कोरल्या गेले होते. तेथे आपण बुद्धांच्या जीवनास विविध चित्रांद्वारे समजू शकतो. यामध्ये बुद्धांचे चरणचिन्ह व बोधिवृक्ष रेखाटले आहे. बौद्ध धर्मीय या स्तूपाशी फारच जुळलेले आहेत.
काही लोकांनुसार विदेशी पर्यटक बुद्धांच्या जीवनपटास पाहून त्यांचे भक्त बनतात.व त्यांना पूजनीय मानतात.
शिलालेख
विशेषतः सांची स्तूप मध्ये बाहेरून बरेच शिलालेख आहेत. हे शिलालेख आपल्या सर्वांची ऐतिहासिक धरोहर आहे.
१८३७ मध्ये जेम्स प्रिन्सेस ने ह्यास भारतातील अमुल्य वास्तुकलेचा नमुना मानले होते.शिलालेखामध्ये मौर्य कालीन श्रुंग कालीन व सातवाहन कालीन (इ.स.पूर्व १५००-२५००) कुशाण (इ.स.पूर्व ७००-१०००) गुप्त (इ.स.पूर्व ६००-८००) घराण्यांच्या साम्राज्याकालीन शिलालेखांचा समावेश आहे.
सोबतच साची मधील शांतता व प्रसन्न वातावरण खऱ्या अर्थाने आपणास बुद्धांच्या सान्निध्यात नेते. बुद्धांच्या काळातील असल्यामुळे हि एक प्राचीन वास्तू आहे. बौद्ध धर्मीय येथे येवून आपल्या धर्मदेवताशी एकरूप होण्याचा विलक्षण अनुभव घेतात.
साची चा स्तूप शांती, पवित्र,धर्म आणि साहस यांचा प्रतिक मानल्या जातो.
सम्राट अशोक याने याचे निर्माण बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्या हेतू केला होता.
आजही येथे मुख्य आकर्षण बौद्ध धर्म आणि भगवान गौतम बुद्ध यांच्याशी सबंधी वस्तूंना व वास्तुस पाहण्याला मानल्या जाते. जगभरातून बौद्ध धर्मीय येथे शांतीच्या शोधात येतात. आपण सर्व भारतीयांना या स्तूपाचा अभिमान वाटतो.
नक्की वाचा –
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी साची स्तूप बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Please :- आम्हाला आशा आहे की हा महान साची स्तूप चा इतिहास – Sanchi Stupa Information in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुध्दा.
नोट : Sanchi Stupa History – साची स्तूप या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.