Swarajya Rakshak Sambhaji Raje Marathi
आज अवघा महाराष्ट्र आणि तद्वतच अखिल विश्व संभाजी महाराजांना त्यांच्या अदम्य साहस, वीरता, बलिदान, समर्पणाकरता ओळखतं… मराठा साम्राज्य आणि हिंदुत्वाच्या रक्षणार्थ त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आपल्या पित्याप्रमाणेच (छत्रपती शिवाजी महाराज) संभाजी महाराज देखील आपल्या संकल्पाप्रती निश्चयी होते.
औरंगजेब या इतिहासातील सर्वात क्रूर शासकाने केलेल्या अपमानित अमानवीय अत्याचारांना सहन केले परंतु अखेरपर्यंत आत्मसमर्पण केले नाही. त्यांच्यातील अलौकिक शौर्य आणि विरतेच्या गाथांनी इतिहासाची पानं सुवर्णाक्षरांनी कोरली गेली आहेत. चला तर या लेखातून छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाशी निगडीत काही महत्वपूर्ण घटनांवर दृष्टीक्षेप टाकुया…
छत्रपती संभाजी महाराज – Swarajya Rakshak Sambhaji Maharaj History in Marathi
संभाजी महाराजांविषयी महत्वपूर्ण माहिती – Swarajya Rakshak Sambhaji Maharaj Information in Marathi
नाव (Name) | छत्रपती संभाजी महाराज भोसले (Sambhaji Raje Bhosale) |
जन्म (Birthday) | 14 मे 1657, पुरंदर किल्ला |
वडील (Father Name) | छत्रपती शिवाजी महाराज |
आई (Mother Name) | सईबाई |
पत्नी (Wife Name) | येसूबाई |
मृत्यू (Death) | 11 मार्च 1689 |
संभाजी महाराजांचा जन्म आणि परिवार – Swarajya Rakshak Sambhaji Maharaj Biography in Marathi
14 मे 1657 साली छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाईंच्या सर्वात मोठ्या मुलाच्या रुपात झाला होता. वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी त्यांच्या शिरावरून मातृछत्र हरविले. पुढे त्याचं संगोपन, पालन-पोषण, त्यांच्या आजी जीजाबाईंनी केलं… संभाजी महाराज लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान आणि शूर व धाडसी होते.
बालपणी त्यांना ‘छावा’ (वाघाचा बछडा) असं म्हंटलं जायचं. सईबाईं व्यतिरिक्त संभाजी महाराजांच्या आणखीन दोन आया होत्या सोयराबाई आणि पुतळाबाई. संभाजी महाराजांचे बंधू राजाराम महाराज व राणूबाई, कमलाबाई पालकर, दिपाबाई, अंबिकाबाई, शकुबाई जाधव या बहिणी होत्या.
बालवयातच संभाजी महाराजांचा विवाह राजकारणातील तडजोडीनंमुळे पिलाजीराव शिर्के यांच्या कन्या येसूबाई (जीवाजीबाई) यांच्याशी झाला. पुढे उभयतांना ‘शाहू’ (महाराज) या पुत्राची प्राप्ती झाली. पुढे त्यांचा हाच पुत्र हिंदवी स्वराज्याचा चौथा शासक झाला. बालवयात संभाजी महाराजांना अनेक संघर्षांचा आणि अडचणींचा सामना करावा लागला. राजकारणातील षडयंत्रामुळे त्यांना मोगलांच्या दरबारातील दरबारी देखील व्हावे लागले होते.
सोयराबाई या संभाजी महाराजांच्या सावत्र आईने शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यात मतभेद पसरविले होते. सोयराबाईंना आपला मुलगा राजाराम महाराजांना उत्तराधिकारी बनविण्याची इच्छा होती आणि म्हणून त्या सतत महाराजांच्या मनात संभाजी महाराजांविषयी विष कालवीत असत. त्यामुळे संभाजी महाराजांना आपल्या कुटुंबियांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागले.
इतकेच नव्हे तर संभाजी महाराजांनी आपल्यातील शौर्य आणि पराक्रम सिद्ध करण्याचा वारंवार प्रयत्न केला परंतु त्यांच्या कायम निराशाच पदरी पडली. एकदा तर शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना दंडित देखील केले होते, त्यामुळे संभाजी महाराज रागाने घर सोडून निघून गेले आणि मोगलांशी सलगी केली आणि हाच काळ संभाजी महाराजांकरता अत्यंत कठीण काळ होता.
परंतु जेंव्हा त्यांनी मोगलांचा हिंदूंशी होत असलेला दुर्व्यवहार बघितला तेंव्हा त्यांनी मोगलांशी केलेली मैत्री तोडली आणि शिवाजी महाराजांची माफी मागून पुन्हा स्वराज्यात परत आले.
संभाजी महाराजांचे शिक्षण – Sambhaji Maharaj Education
संभाजी महाराज बालपणापासूनच प्रचंड बुद्धिमान आणि कुशाग्र बुद्धीचे धनी होते. त्यांना संस्कृत भाषेव्यतिरिक्त अनेक भाषांचे उत्तम ज्ञान अवगत होते. इतकेच नव्हे तर शास्त्राव्यतिरिक्त तलवार चालवण्यात, घोडेस्वारी करणे, यात ते पारंगत होते व ते उत्तम धनुर्धर देखील होते.
संभाजी महाराजांनी लिहिलेल्या रचना – Swarajya Rakshak Sambhaji Maharaj Book
संभाजी महाराज कुशल आणि पराक्रमी शासक होते तद्वतच साहित्य आणि संस्कृत भाषेचे ते उत्तम जाणकार देखील होते. कवी कलश यांच्याशी झालेल्या भेटीनंतर साहित्यातली त्यांची रुची अधिकच वाढली होती.
एवढेच नव्हे तर आपले वडील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ त्यांनी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ देखील लिहिला. याशिवाय संभाजी महाराजांनी नखशीकांत, नायिकाभेद, बुधभूषण, श्रृंगारिका, सातशातक सह अनेक संस्कृत ग्रंथांचे लेखन केले होते.
संभाजी महाराजांचा राज्याभिषेक – Swarajya Rakshak Sambhaji
सोयराबाईंनी षड्यंत्र रचत आपल्या 10 वर्षांच्या राजारामाला सिंहासनावर बसविले. ज्यावेळी संभाजी महाराजांना हि गोष्ट समजली त्यावेळी त्यांनी आपली सावत्र आई सोयराबाईंचे बंधू हंबीरराव मोहितेंशी हातमिळवणी केली आणि त्यांच्या मदतीने रायगडावर विजय मिळविला आणि त्यानंतर सोयराबाईंना कैद केले.
पुढे 16 जानेवारी 1681 रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले…त्यांनी मराठा साम्राज्याची जवाबदारी सांभाळली. त्यानंतर संभाजी महाराजांच्या विरोधात शिवाजी महाराजांच्या काही मंत्र्यांनी पुन्हा कटकारस्थान रचले आणि राजाराम महाराजांना सिंहासनावर बसविण्याची योजना आखली.
परंतु संभाजी महाराजांनी राजकारणातील आपल्याला अवगत असलेल्या डावपेचांनी व अनुभवाने आपले प्रिय मित्र आणि संस्कृत चे प्रकांड पंडित कवी कलश यांना आपला सल्लागार नियुक्त केले आणि सगळ्यांचे मनसुबे, कटकारस्थान हाणून पाडले. कवी कलश हे गैर मराठी असल्याकारणाने मराठा अधिकाऱ्यांनी त्यांचा फार विरोध केला.
संभाजी महाराजांच्या शासन काळातील कठीण संघर्ष आणि लढाया :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूपश्चात संभाजी महाराजांनी ज्या वेळी मराठा साम्राज्याची सूत्र आपल्या हाती घेतली त्या काळात मोगल सम्राट औरंगजेबाचे सामर्थ्य दक्षिणेकडील राज्यांमध्ये फार वाढले होते. मराठ्यांकरता हा काळ परीक्षा घेणारा होता. औरंगजेब मराठा साम्राज्य देखील कवेत घेऊ पाहत होता.
औरंगजेबाच्या विशाल सेनेसमोर संभाजी महाराजांचे सैन्य फार तोकडे होते. तरी देखील संभाजी महाराजांच्या सैन्याने मोठ्या बहादुरीने मोगलांचा सामना केला. या दरम्यान मुगलसैन्य रामशेज किल्ल्यावर आपला ताबा मिळविण्यात अपयशी ठरले परंतु 1687 ला वाईच्या युद्धात मराठा सैन्य मोगलांच्या शक्तीपुढे कमकुवत ठरले, शिवाय या युद्धात संभाजी महाराजांचे सगळ्यात निकटवर्तीय आणि वीर सेनापती हंबीरराव मोहिते देखील मृत्यूमुखी पडले. त्यानंतर 1689 ला झालेल्या विश्वासघातामुळे संभाजी महाराज मोगलांच्या ताब्यात सापडले.
संभाजी महाराजांच्या शासनकाळातील महत्वपूर्ण योगदान :
संभाजी महाराज, मराठा साम्राज्याची धुरा सांभाळताना आपले वडील छत्रपती शिवरायांचे स्वराज्य स्थापनेचे स्वप्नं जरी पूर्ण करू शकले नाहीत तरीदेखील या दरम्यान त्यांनी मोगलांना मराठ्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली होती. संभाजी महाराजांनी केवळ मोगलांच्या 8 लक्ष विशाल सेनेचा सामना केला असे नव्हे तर अनेक युद्धांमध्ये मोगलांना पराजित देखील केले.
महाराष्ट्रात औरंगजेबाला त्यांनी अनेक युद्धांमध्ये व्यस्त ठेवले त्यामुळे उत्तर भारतासह अनेक राज्यातील हिंदू शासकांना आपले साम्राज्य पुनःस्थापित करण्याची संधी मिळाली. इतकेच नाही तर औरंगजेबाने दिलेल्या असह्य मरणप्राय यातना सहन करून देखील संभाजी महाराजांनी त्यापुढे आत्मसमर्पण केले नाही आणि गुडघेदेखील टेकवले नाहीत.
याचा फायदा तमाम हिंदू राजांना झाला, कारण जर संभाजी महाराजांनी कुठल्याही प्रकारचा सामंजस्य करार औरंगजेबाशी केला असता तर उत्तर भारतासह अनेक राज्यांवर कब्जा करण्यात औरंगजेबाला यश मिळालं असतं. त्या दरम्यान औरंगजेब संभाजी महाराजांव्यतिरिक्त दक्षिणेकडील इतर शासकांसमवेत युद्ध करण्यात व्यस्त राहिला त्यामुळे उत्तर भारतातील हिंदुत्व सुरक्षित राहू शकले.
याशिवाय संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत हिंदू बांधवांनी पुन्हा आपल्या धर्मात परत येण्याकरता अनेक सकारात्मक पाऊलं उचलली. मोगलांच्या दहशतीखाली ज्या हिंदुनी मुस्लीम धर्म स्वीकारला होता त्यांना पुनः आपल्या धर्मात येण्याकरता संभाजी महाराजांनी वेगवेगळे विभाग बनविले त्यामुळे असंख्य लोक पुन्हा हिंदू धर्मात परतू शकले.
क्रूर औरंगजेबाचे संभाजी महाराजांवर अमानवीय अत्याचार आणि संभाजी महाराजांचा मृत्यू – Sambhaji Maharaj Death
संभाजी महाराजांवर मुकर्रब खानाने अचानक धोक्याने आक्रमण केले आणि त्यांना व त्यांचे प्रमुख सल्लागार कवी कलश यांना बंदी बनविले. त्यानंतर त्यांना इतिहासातील सर्वात क्रूर आणि अत्याचारी औरंगजेबासमोर पेश करण्यात आले. औरंगजेबाने संभाजी महाराजांपुढे इस्लामधर्म स्वीकारण्याचा, आपली सगळी संपत्ती, सैन्य, किल्ले, मोगलांच्या हवाली करण्याचा प्रस्ताव ठेवला.
परंतु संभाजी महाराजांनी त्याचा प्रस्ताव सपशेल धुडकावून लावला त्यामुळे क्रोधाने पेटलेल्या औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांना बंदिवासात टाकून त्यांच्यावर अमानुष आणि अमानवीय अत्याचार करण्यास सुरुवात केली. संभाजी महाराजांना उंटाला बांधून घासत-घासत पूर्ण नगरात फिरविण्यात आले.
मुसलमानांकरवी त्यांच्यावर थुंकण्यात आले, एवढेच नव्हे तर हिंदू धर्माचे गुणगान केल्यावर औरंगजेबाने त्यांची जीभ काढून कुत्र्यांसमोर फेकली.
त्याची हैवानियत इथेच थांबली नाही, त्याने संभाजी महाराजांचे डोळे काढण्याचे आदेश दिले. हळूहळू महाराजांचे एक-एक करून अनेक अंग कापले आणि त्यांना भयावह आणि वेदनादायी मृत्यू येण्याकरता सोडून दिले…इतक्या यातना सहन करून देखील संभाजी महाराज औरंगजेबापुढे कधीही नमले नाहीत आणि मोठ्या धैर्याने औरंगजेबाचे अत्याचार सहन करत भगवान शिवाचे स्मरण करत राहीले.
काही दिवसांनी औरंगजेबाने निर्दयतेने संभाजी महाराजांचा शिरच्छेद करून शीर आपल्या किल्ल्यावर टांगले.
त्यानंतर मराठ्यांनी महाराजांच्या एक-एक अंगाला शिवून त्यांच्यावर अंतिम संस्कार केले. संभाजी महाराजांच्या या यातनांनी भरलेल्या मृत्यूमुळे मराठ्यांमध्ये मोगलांविरोधात आक्रोश…संताप अधिक तीव्र झाला आणि सर्व मराठ्यांनी एकत्र येऊन मोगलांविरोधात लढण्याचा निश्चय केला.
आणि अश्या तऱ्हेने वीर पराक्रमी शासक संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे मराठ्यांच्या एकीला बळ मिळाले, मराठ्यांची शक्ती मजबूत झाली आणि भारतावर दीर्घकाळ राज्य करणाऱ्या मुगलांचा अंत झाला व भारतात हिंदू साम्राज्याची स्थापना झाली. संभाजी महाराज त्यांच्यातील वीरता…पराक्रम…त्याग…बलिदान… हिंदुत्वाची धग या करता सदैव स्मरणात राहतील…
पोवाडा संभाजी महाराजांचा – Sambhaji Maharaj Powada
देश धरम पर मिटने वाला। शेर शिवा का छावा था।।
महापराक्रमी परम प्रतापी। एक ही शंभू राजा था।।
तेज:पुंज तेजस्वी आंखे। निकलगयी पर झुकी नही।।
दृष्टी गयी पर राष्ट्रोन्नती का। दिव्य स्वप्नं तो मिटा नही।।
दोनो पैर कटे शंभू के। ध्येय मार्ग से हटा नही ।।
हाथ कटे तो क्या हुआ?। सत्कर्म कभी छुटा नही।।
जिव्हा कटी, खून बहाया। धरम का सौदा किया नही।।
शिवाजी का बेटा था वह। गलत राह पर चला नही।।
वर्ष तीन सौ बीत गये। अब शंभू के बलिदान को।।
कौन जीता, कौन हारा। पूछ लो संसार को।।
कोटी कोटी कंठो मे तेरा। आज जयजयकार है।।
अमर शंभू तू अमर हो गया। तेरी जयजयकार है।।
मातृभूमी के चरण कमलपर। जीवन पुष्प चढाया था।।
है दुजा दुनिया में कोई। जैसा शंभू राजा था?।।
शाहीर योगेश
“छत्रपती संभाजी महाराज की जय”
लक्ष्य दया: तुमच्या जवळ छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्