Most Expensive Spice in the World
केशर जागातील सर्वात महाग मसाल्यांमध्ये सुध्दा येते हे आपल्याला या लेखातून कळणार आहे, आज पर्यंत बरेचशे मसाले आपण पाहिले असणार, भारतात तर मोठ्या प्रमाणात मसाल्यांचा वापर केल्या जातो, तसेच मसाल्याचे निर्माण सुध्दा आपल्या देशात बऱ्याच प्रमाणात पाहायला मिळते. मग तो महाराजा मसाला असो की एमडीएच च्या आजोबांचा मसाला असो, अश्या वेगवेगळ्या प्रकारचे मसाले बाजारात उपलब्ध असतात आणि मोठ्या प्रमाणात लोक त्या मसाल्याना पसंती सुध्दा देतात.
मसाल्यांमध्ये बरेचशा वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचा समावेश आपल्याला दिसून येतो, आपण आजपर्यंत मसाल्यांचा येणाऱ्या किती अश्या पदार्थांना ओळखता की ज्याची किमंत लाख रुपये किलो आहे? नाही माहिती काळजी नका करू आजच्या लेखात आपण त्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत, की या पदार्थाचे उत्पादन जगात कुठं कुठं होतं,आणि त्याची किंमत किती आहे? तर चला पाहूया जगातील सर्वात महाग असणाऱ्या मसाल्याच्या पदार्थाविषयी.
“केशर” आहे जगातील सर्वात महाग मसाल्याचा पदार्थ – “Saffron” Most Expensive Spice in the World
आपल्याला जाणून आश्चर्य होणार की संपूर्ण जगात मसाल्यांचा पदार्थात केशर सर्वात महाग पदार्थ आहे. आपण केशर ला खूप वेगवेगळ्या प्रकारात ओळखत असणार कारण आज काल केशर चा वापर बरेचश्या प्रोडकट्स मध्ये होताना आपल्याला दिसत आहे.
जसे गुटखा बनविणाऱ्या कंपनी गुटख्या मध्ये सुध्दा याचा वापर करताना दिसून येत, सोबतच पान मसाला मध्ये सुध्दा केशर चा उपयोग केल्या जातो. वास्तविक पाहता केशर ही उष्णतेसाठी योग्य मानली जाते. जेव्हा एखादी स्त्री गर्भवती असते तेव्हा तिला दुधात केशर दिल्या जाते. तसेच केशर चा उपयोग छातीत निर्माण झालेल्या कफ ला कमी करण्यासाठी सुध्दा केल्या जातो. आयुर्वेदात सुध्दा केसर चे महत्व सांगितल्या गेले आहे. तसेच मसाल्यांचा एक पदार्थ म्हणून केशर चा वापर केल्या जातो.
केशर ची सुरुवात दक्षिणी युरोप च्या स्पेन या देशात झालेली आहे. आजही स्पेन जगातून सर्वात जास्त केशर चे उत्पादन करतो. मोठ्या प्रमाणात केशर ला स्पेन मध्ये विकल्या सुध्दा जातं, सर्वात पहिले केशर ची शेती २३०० – २३५० वर्षांपूर्वी सिकंदर च्या काही सैनिकांनी केली होती.
आपण पाहिलेच की स्पेन मध्ये केशर मोठ्या प्रमाणात उत्पादित होते, सोबतच जगात बरेचशे असे देश आहेत की जे केशर चे उत्पादन करतात. मग त्यामध्ये आपला देश भारत सुध्दा येतो, सोबतच चीन, ऑस्ट्रिया, ईरान, जर्मनी, जापान, पाकिस्तान, तुर्किस्तान, ग्रीस, आणि फ्रांस या देशातही केशर ची शेती केली जाते. भारतात जम्मू कश्मीर च्या बरेचश्या भागात केशर चे उत्पादन केल्या जाते. जम्मू कश्मीर मध्ये केशर च्या फुलांना उगविण्यासाठी पोषक वातावरण सुध्दा उपलब्ध आहे.
आता पाहूया केशर चे उत्पादन आणि त्याच्या किमती विषयी – How to Grow Saffron and Price Information
तसे पाहिले असता केशर ला “रेड गोल्ड” हे नाव सुध्दा पडलेले आहे यामागे कारण असे आहे की केशर सुध्दा जवळजवळ सोन्याच्या दरात मिळायला लागली आहे. आपण जर एक किलो केशर चा भाव पाहिला तर आपण थक्क होऊन जाणार, कारण केशर चे भाव खूप महाग आहेत.
जर कोणालाही एक किलो केशर विकत घ्यायची असेल तर त्याला दोन ते तीन लाख रुपये मोजावे लागतील. मग यावरून आपण विचार करू शकता की केशर किती महाग आहे. आणि केशर एवढी जास्त महाग असण्यामागे हे कारण आहे की केशर ज्या फुलांपासून मिळते. त्या एका फुलातून आपल्याला केशर चे फक्त तीन तुकडे मिळतात, म्हणजेच एक किलो केशर मिळविण्यासाठी लाखो फुलांची आवश्यकता असते. म्हणून केशर एवढी जास्त महाग असते.
आपल्याला जर एक किलो केशर मिळण्यासाठी फुलांचा निश्चित आकडा हवा असेल तर तो कमीत कमी अडीच लाखां पर्यंत असेल, यावरून आपण समजू शकता कि केशर यामुळे खूप जास्त महाग असते. केशर च्या फुलांविषयी सांगायचे झाले तर ह्या फुलांचा सुगंध आजूबाजुला असणाऱ्या संपूर्ण वातावरणात खूप जास्त प्रमाणात पसरतो.
केशर चे जास्त प्रमाणात केलेलं सेवन आरोग्यासाठी चांगले नसते, कारण केशर मध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता आढळते. तर आपण आजच्या लेखात केशर विषयी थोडक्यात माहिती पाहिली आशा करतो आपल्याला लिहिलेली माहिती आवडली असेल आपल्याला लिहिलेली माहिती आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!