Sachin Tendulkar Information in Marathi
शतकातील अखेरच्या दशकात आपल्या उच्चकोटीच्या कामगिरीने जो भारतात सकारात्मकतेचा प्रतिक ठरला असा क्रिकेटपटु सचिन तेंडुलकर. “क्रिकेटचा देव” (God Of Cricket) या नावाने ओळखल्या जाणा.या सचिन ने आपल्या फलंदाजीने असामान्य शक्ती आणि कठोर परिश्रमाच्या बळावर कसोटी व एकदिवसीय सामन्यांमधे अनेक जागतिक विक्रम स्थापीत केले.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ची जीवनी – Sachin Tendulkar Information in Marathi
पुर्ण नाव: | सचिन रमेश तेंडुलकर |
जन्म: | 24 एप्रील 1973 |
जन्मस्थान: | मुंबई |
वडिल: | रमेश तेंडुलकर |
आई: | रजनी तेंडुलकर |
विवाह (Wife) : | अंजली समवेत |
सामान्य कुटुंबात लहानाचा मोठ्या झालेल्या सचिनने आपले शिक्षण मुंबईतील शारदाश्रमात पुर्ण केले. अजित या मोठया भावाने लहानपणीच सचिन मधील क्रिकेटची आवड पाहाता त्याला योग्य मार्गदर्शन दिले. क्रिकेट मधील ’द्रोणाचार्य’ रमाकांत आचरेकर सरांनी सचिन ला क्रिकेट मधे सक्षम बनविले. हॅरिस पदकाकरीता झालेल्या स्पर्धेत 326 धावा काढत विनोद कांबळी समवेत 664 धावांची विक्रमी भागिदारी करण्याचा पराक्रम केला आणि वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी सचिन भारतिय संघात सहभागी झाला.
1990 साली इंग्लंड दो.या दरम्यान सचिन ने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक (नाबाद 119) झळकविले. त्यानंतर आॅस्टेलिया, दक्षिण अफ्रिकेतील दौ.या दरम्यान शतकांची ही श्रृंखला सुरू राहिली. सचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 21 सामने विदेशात खेळले. 1992 – 93 या वर्षी इंग्लंड विरूध्द खेळल्या गेलेला सामना भारतातील सचिनचा पहिला सामना होता.
महत्वपुर्ण घटना सांगायची झाल्यास शारजा येथे कोका कोला विश्वचषक एकदिवसीय सामन्याच्या उपांत्य फेरीत व शेवटच्या सामन्यात सचिन ने सदैव स्मरणात राहील अशी ’कामगिरी’ केली आणि संपुर्ण जग त्याच्याकडे ’चमत्काराच्या’ दृष्टीने पाहु लागले. त्याची ही कामगिरी ’डेझर्ट स्टाॅर्म’ (वाळवंटातील वादळ) म्हणुन प्रसिध्द झाली. त्याच्या दोन दिवसानंतर आॅस्ट्रेलिया विरूध्द अखेरच्या सामन्यात सचिनने पुन्हा एकदा 131 चेंडुत 134 धावा काढुन भारताच्या गळयात विजयाची माळ घातली.
या सामन्यानंतर ‘Cricket international’ या पत्रिकेने देखील ’दुसरा ब्रॅडमन’ म्हणुन सचिनचा गौरव केला. इतकेच नव्हे तर खुद्द ब्रॅडमन ने देखील या गोष्टीला दुजोरा दिला.
2005 – 06 दरम्यान ’टेनिस एल्बो’ आणि खांद्याच्या दुखापतीमुळे सचिन चिंतीत होता. तरी देखील आपल्या खेळात थोडा बदल करून त्याने प्रदर्शनात सातत्य राखले. क्रिकेट इतिहासात जागतिक पातळीवर सचिनचे सर्वाधिक 39 शतकं, 4 दुहेरी शतकं यांचा समावेश आणि नाबाद 248 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. एकदिवसीय सामन्यांमधे सचिनने सर्वाधिक म्हणजे 42 शतकं झळकविले असुन एकुण 89 अर्धशतकांची त्याच्या नावावर नोंद आहे.
सचिनच्या या निरंतर प्रदर्शनामुळे त्याच्या हाती कर्णधार पदाची सुत्रं दिली गेली पण त्यात त्याला यश मिळालं नाही. परंतु आपल्या खेळातील प्रदर्शनामुळे आणि व्यक्तिमत्वामुळे जगभरातुन प्रेम आणि आदर मिळविण्यात मात्र यश प्राप्त केलं. महान कर्तुत्व असुन देखील कधीही वागण्यात अहंकार न आणता कायम संवेदनशील राहाणारा सचिन सर्व जगासमोर एक आदर्श ठरला.
आज संपुर्ण जगात लहानांपासुन तर मोठयांपर्यंत प्रत्येकाच्या ओठांवर क्रिकेटचा दुसरा अर्थ सचिन तेंडुलकर हाच आहे.
सचिन तेंडुलकर चे विक्रम – Sachin Tendulkar Record
1. मीरपुर इथं बांग्लादेश विरूध्द 100 वे शतक पुर्ण केले.
2. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट च्या इतिहासात दुहेरी शतक करणारा पहिला खेळाडु ठरला.
3. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे सर्वात जास्त (18000 पेक्षा अधिक) धावा काढल्या.
4. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे सर्वात जास्त 49 शतक बनविले.
5. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा.
6. सचिन तेंडुलकर ने कसोटी क्रिकेट मधे सर्वात जास्त (51) शतक बनविले आहेत.
7. आॅस्ट्रेलिया विरूध्द 5 नोव्हेंबर 2009 ला 175 धावा काढत एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधे 17000 धावा पुर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला.
8. कसोटी क्रिकेट मधे सर्वाधिक धावा काढणारा खेळाडु.
9. कसोटी क्रिकेट मध्ये 13000 धावा काढणारा जगातील पहिला फलंदाज.
10. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक वेळा मालिकावीर.
11. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक वेळा मॅन आॅफ द मॅच.
12. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक 30000 धावा काढण्याचा किर्तीमान सचिनच्या नावे आहे.
राष्ट्रीय सन्मान – Sachin Tendulkar Awards
1994 – अर्जुन पुरस्कार: खेळातील उत्कृष्ट कामगिरी करीता भारत सरकारव्दारे
1997 – 98 – राजीव गांधी खेल रत्न: क्रिकेट मधील कामगिरी करीता भारताव्दारे मिळालेला सर्वोच्च सन्मान
1999 – पद्मश्री : भारताचा चैथा सर्वोच्च नागरीक पुरस्कार
2001 – महाराष्ट्र भुषण पुरस्कार: महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरीक पुरस्कार
2008 – पद्मविभुषण: भारताचा दुसरा सर्वोच्च नागरीक पुरस्कार
2014 – भारतरत्न: भारताचा सर्वोच्च नागरीक पुरस्कार (भारतरत्न मिळालेला सर्वात कमी वयाचा व्यक्ती)
Sachin Tendulkar Quotes –
“क्रिकेट माझे प्रेम आहे आणि हरणं मला कदापी मान्य होत नाही, मैदानात पाऊल ठेवल्यानंतर दृष्टीकोन बदलतो आणि जिंकण्याची भुक कायम राहाते”
Read More:
लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी सचिन तेंडुलकर बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Please: आम्हाला आशा आहे की हा सचिन तेंडुलकर यांचे जीवन चरित्र – Sachin Tendulkar Biography in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे facebook page लाइक करायला सुधा.
नोट: Sachin Tendulkar Biography – सचिन तेंडुलकर यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.