Road Markings Meaning माहित नाही, तर चला जाणून घेऊया या मागचे काही कारणे, भारतामध्ये या विषयी बऱ्याच लोकांना महिती नाही कि रोडवर ह्या प्रकारच्या पट्ट्या का असतात, आजच्या लेखात आपण तेच पाहणार आहोत,
ह्या पट्ट्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बनवल्या गेलेल्या असतात. ज्याप्रमाणे ट्राफिक च्या सिग्नल मध्ये लाल,पिवळा, आणि हिरवा रंग असतो त्याच प्रमाणे रोड वर वाहनांची सुरक्षितता लक्ष्यात घेता, ह्या पट्ट्या आखलेल्या असतात.
ज्यामुळे आपण आपली वाहने व्यवस्थित चालवण्यास मदत होईल आणि होणाऱ्या अपघातांना टाळा बसू शकेल.
आणि बरेच वेळा वाहने चालविताना आपल्या निदर्शनास आले आहे कि रोड वर ह्या लाईन कश्या साठी असू शकतात बर!
काही रस्त्यांवर पांढरे तर काहींवर पिवळे पट्टे का असतात? – Road Markings and What they Mean
एक पांढरी अखंड पट्टी – White Lines on The Road Mean
बरेचदा आपल्याला प्रवास करताना काही रस्त्यांवर लांब पांढरी रेख आखलेली दिसून येते आणि ती लाईन रोड वर या साठी आखलेली असते कि तुम्ही ज्या बाजूला तुमचे वाहन चालवत असाल तर त्याच बाजूला आपण आपला प्रवास सुरु ठेवावा.
तुटलेली पांढरी पट्टी – Broken White Lines
तुटलेली पांढरी रेख आपल्याला खूप वेळा रस्त्याच्या मधोमध आखलेली दिसते, ज्यामध्ये असे दिसून येते कि एक अखंड रेषेला मधोमध कापत नेले आहे कि काय.
आपण प्रवास करत असताना हि लाईन आपल्याला दर्शवत असते कि तुम्ही तुमच्या प्रवासाची बाजू गरजेनुसार बदलू शकता.
फक्त तुम्ही तुमच्या वाहनाची बाजू बदलते वेळी आपला आरसा आणि समोरून येणारे वाहने चेक करून तुम्ही वाहनाची बाजू बदलू शकता.
एक पिवळी अखंड पट्टी – Yellow Lines on The Road Mean
एखाद्या वाहनाला आपण ओवरटेक करू शकता परंतु तुम्ही त्या पिवळ्या रेषेला ओलांडून तुम्ही तुमचे वाहन नाही चालू शकत. ह्या पिवळ्या लाईन चे हे महत्व आहे, आणि हा नियम आता प्रत्येक राज्यात लागू होण्याच्या मार्गावर आहे, (उदा. तेलंगाना मध्ये रस्त्यावर पिवळ्या लाईन ओढल्या गेल्यात. कारण दुसरे वाहन आपल्या लाईन मध्ये न यावे यासाठी)
दोन अखंड पिवळ्या पट्ट्या – Double Yellow Lines on the Road Mean
दोन अखंड पिवळ्या रेषा ह्या रेषा तुम्हाला सूचित करत असतात कि तुम्ही तुमची बाजू सोडून दुसर्या बाजूला नाही जाऊ शकत.
तुम्ही चालत असलेल्या बाजूला च तुम्हाला चालावे लागेल आणि तुम्ही कोणत्याही वाहनाला मागे टाकून पुढे नाही जाऊ शकत,असे दर्शवत असता.
तुटलेली पिवळी पट्टी – Broken Yellow Lines
बहुतेक वेळा रस्त्याने ह्या लाईन प्रत्येकाला दिसतच असतील ज्यामध्ये पिवळी तुटलेली रेष दिसून येते,
ह्या लाईन आपल्याला दाखवत असतात कि जर तुम्हाला रस्त्याच्या कडेला वाहन चालवतांना त्रास होत असेल तर तुम्ही तुमचे वाहन पुढे काढून घेऊ शकता.
अखंड पिवळी पट्टी आणि तुटलेली पिवळी पट्टी – Yellow Lines on Road
बरेचदा ह्या दोन लाईन जवळ जवळ असतात. जर तुम्ही अखंड पिवळ्या लाईन च्या बाजूला वाहन चालवत असाल तर तुम्हाला वाहन पुढे काढता येणार नाही.
तेच तुम्ही तुटलेल्या पिवळ्या लाईन च्या बाजूला वाहन चालवत असाल तर तुम्ही तुमचे वाहन दुसर्या वाहनाच्या पुढे काढू शकता.
ह्या सर्व लाईन्स आपल्या सुरक्षितेसाठीच बनविलेल्या आहेत तर या सर्व नियमांचे आपण पालन केले पाहिजे.
आणि आशा करतो कि आज या लेखाच्या माध्यमातून आपल्याला काही नवीन शिकायला मिळाले असेल.
आम्ही अश्याच नवीन नवीन लेख आपल्यासाठी घेऊन येत राहू.
आपल्याला ह्या लेखातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर आपल्या मित्रांसोबत शेयर करून त्यांना आश्यर्यचकीत करायला विसरू नका.
Thank You!