RBI will take ‘this’ Big Announcement for Fear of Corona
कोरोना मुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तसेच भारत सरकार ने येणाऱ्या १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण देशाला लॉकडाऊन ठेवण्याचे ठरविले आहे, देशातील या २१ दिवसांच्या लॉकडाऊन कडे लक्ष देता आज सकाळी भारतीय रिजर्व बँकेचे गवर्नर शक्तीकांत दास यांनी जनतेच्या समस्यांकडे लक्ष देत, काही निर्णय घेतले, पुढे बोलताना त्यांनी सांगितले…
करोनाच्या भीतीने आरबीआय घेणार ‘हे’ मोठे निर्णय – RBI will take ‘this’ Big Announcement for Fear of Corona
- रेपो दराला ०.७५% ने कमी करत ५.१५ टक्क्यांहून ४.४ टक्क्यांवर करण्यात येईल.
- आणि रिव्हर्स रेपो दराला ०.९०% कमी करत ४.९० टक्क्यांहून ४ टक्क्यांवर करण्यात येईल.
- म्हणजेच याचा फायदा बँकांना होणार आणि बँकेला झालेला फायदा बँक त्यांच्या ग्राहकांना देऊ शकते.
- वाहन कर्ज, गृह कर्ज यांवर आकारल्या जाणारे व्याज रेपो दरामुळे कमी होऊ शकते.
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नागरिकांसाठी ३ महिन्यांचा EMI न लावण्याचा निर्णय सुद्धा आजच घेतला, येणाऱ्या तीन महिन्यात कोणतीही बँक आपल्याकडून EMI ची मागणी करणार नाही. या बातमीमुळे लाखो नागरिकांनी मोकळा श्वास घेतला.
रेपो दर म्हणजे नेमकं काय? ते समजून घेऊ ! – What is Repo Rate?
रेपो दर म्हणजे रिजर्व बँक ऑफ इंडिया देशातील बँकांना अल्पमुदतीचे कर्ज देते आणि त्या कर्जावर जो व्याज दर रिजर्व बँक लावते त्या व्याजदाराला रेपो दर असे म्हणतात. बँकांना जर जास्त प्रमाणात दर लागले तर बँका ग्राहकांना जास्त प्रमाणाच्या दरात कर्ज वाटप करतात आणि याचा फटका ग्राहकांना बसतो.
आता समजुन घेऊ,
रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय? – What is Reverse Repo Rate?
जेव्हा बँकांकडे शिल्लक असलेली रक्कम बँका रिजर्व बँकेकडे ठेवतात, आणि रिजर्व बँक त्या रकमेवर ज्या दराने बँकांना व्याज देते त्या दराला रिव्हर्स रेपो दर म्हणतात.