Ramanand Sagar Uttar Ramayan
भारतात १९८८ च्या काळात आलेला एक टीव्ही शो ज्या टीव्ही शो ने आज भारतात एक वेगळा प्रेक्षक गट मिळवला आहे, आणि या लॉकडाऊन च्या काळात लोकांना घरात कंटाळा येऊ नये तसेच लोकांनी घरातच राहावे यासाठी प्रसारण मंत्रालयाने टीव्ही वर रामायण दाखवायला सुरुवात केली आहे, काही जुन्या व्यक्तींकडून असं ऐकायला येत की जेव्हा १९८८ च्या काळात रामायण मालिका टीव्ही वर दाखविल्या जात असे तेव्हा घरातील सर्व लोक एकत्र येऊन या मालिकेचा आनंद घेत असत.
हि मालीका चालू असताना कुठलीही व्यक्ती बाहेर दिसत नव्हती, आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचप्रकारच्या परिस्थितीची आवश्यकता पाहता भारत सरकारच्या दूरसंचार आणि प्रसारण मंत्रालयाने लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेत प्रेक्षकांच्या भेटीला रामायण मालिका पुन्हा दूरदर्शन वर घेऊन आले. आणि त्या मालिकेला लोकांचा चांगला प्रतिसाद सुध्दा लाभला, पण आपल्याला माहीत आहे का की रामायणात रावणाचा वध झाल्यानंतर रामानंद सागर यांनी रामायण मालिकेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता, पण कुठल्या कारणाने त्यांनी उत्तर रामायण लोकांना दाखविण्याचे ठरविले होते. हे आपण आजच्या लेखात पाहणार आहोत तर चला जाणून घेऊया त्यामागे नेमकं कारण काय होत?
या कारणांमुळे रामानंद सागर हे “उत्तर रामायण” बनवायला तयार झाले – Why Ramanand Sagar did not want to create ‘Uttar Ramayan’
रामायण मालिकेत जेव्हा भगवान श्रीराम यांच्या हातून लंकापती रावणाचा वध होतो, तेव्हा भगवान श्रीराम आपल्या पत्नीला घेऊन अयोध्येला येतात, त्यानंतर भगवान श्रीराम यांचा राज्यभिषेक होतो आणि त्यानंतर रामायण मालिकेची समाप्ती होते. रामानंद सागर यांनी येथेच रामायणाची समाप्ती करण्याचे संकेत दिले होते त्यांचे म्हणणे होते की तुलसीदास रामायणात समोरील कथेचे वर्णन आपल्याला आढळून येत नाही म्हणून त्यांनी समोरील रामायण बनविण्यापासून माघार घेतली होती.
परंतु त्याकाळात रामायणाचा लोकांना एवढा लळा लागला होता की लोकांची मागणी समोरील रामायण पाहण्यासाठी वाढली होती, आणि प्रेक्षकांच्या या प्रतिसादाला न नाकारता रामानंद सागर यांनी उत्तर रामायणाची निर्मिती केली आणि रामायणाच्या समोरील घडलेल्या कथांना त्यांनी उत्तर रामायणातुन प्रेक्षकांना दाखविण्याचे प्रयत्न केला. आणि प्रेक्षाकांचा रामायणाला जेवढा प्रतिसाद आला होता तेवढाच प्रतिसाद उत्तर रामायणाला सुध्दा आलेला होता.
तर आपल्याला या लेखातून माहिती झाले असेल की प्रेक्षकांच्या उस्फुर्त प्रतिसादामुळे उत्तर रामायणाची निर्मिती करण्यात आली होती, आशा करतो लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका, आणि सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत,आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And keep Loving Us!