Ramacha Palna
नमस्कार मित्र/ मैत्रिणींनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून प्रभू रामचंद्र यांच्या जन्मोत्सवा निमित्त गायल्या जाणाऱ्या पाळणा गीताचे तसचं, त्या पाळणागीता संबंधी थोडक्यात माहितीचे वर्णन करणार आहोत. आपण सर्वांनी प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्या वेळी या पाळणा गीताचे वाचन करावे.
प्रभू श्रीरामचंद्रांचा पाळणा संग्रह – Ramacha Palna
अयोध्या नगरीत आनंद झाला।
मातेची पुण्याई आली फळाला।
पुत्ररत्नाचा लाभ जाहला।
रामचंद्र नांव शोभे बाळाला।
जो बाळा जो जो रे जो ।।१।।
रघुवंशाचा कुलदीपक।
दीनअनाथांचा असे पालक।
गाई अणि ब्राह्मणांचा सेवक।
राजा दशरथाचा जिव प्राण एक।
जो बाळा जो जो रे जो ।।२।।
चंद्र सूर्यापरी तेजायमान।
पाळण्यांत बाळ खेळे थाटानं। नाचती नरनारी विसरून भान।
अवतार घेऊन आले भगवान।
जो बाळा जो जो रे जो।।३।।
पाळणे व डोहाळे बारशाचा किती वर्ण सोहळा।
ऋषी मुनी सारे जाहले गोळा।
रत्नजडित हार घालूनी गळा।
जोजविती नरनारी लडिवाळा।
जो बाळा जो जो रे जो।।४।।
वाढू लागे बाळ दिव्याच्या ज्योती।
धनुर्विद्या गुरदेव शिकविती।
धर्मरक्षा तशी न्याय आणि निती।
दीनदर्बलांची अंतरी प्रिती।
जो बाळा जो जो रे जो।।५।।
लागली चिंता राजा दशरथा।
साजेशी सुनबाई शोधावी आतां।
क्षणोक्षणी सांगे कौसल्या माता।
जो बाळा जो जो रे जो।।६।।
जनकपुरीच्या जनक राजानें।
गाजावाजा करून थाटामाटाने।
सीता स्वयंवर योजिले त्यानें।
तेथे गेले राम योगायोगानें।
जो बाळा जो जो रे जो ।।७।।
शिव – धनुष वांकडा केला।
गळां जानकी घाली वरमाला।
लंकापति रावण लज्जित झाला।
दशरथ नंदन चतुर्भुज झाला।
जो बाळा जो जो रे जो।।८।।
भाग्यचक्र परी फिरले ऐशांत।
सावत्र आई कैकयीच्या मनात।
सावत्रता कशी झाली जागृत।
राजा दशरथ होते वचनांत।
जो बाळा जो जो रे जा ।।९।।
राज्य म्हणे माझ्या भरतास द्यावें।
आणि रामाला वनीं धाडावें।
दिधलें वचन आज पूर्ण करावें।
रामायणामध्ये मिळती पुरावें।
जो बाळा जो जो रे जो ।।१०।।
लक्ष्मण आणि सीतेची साथ।
घोर अरण्यांत गेले रघुनाथ।।
कंद मुळे फळे खात दिनरात।
दुःख साहिलें वनवासात।
जो बाळा जो जो रे जो।।११।।
दशमुखी तो वधिला रावण।
आणि क्रूर दैत्य तो कुंभकर्ण।
राक्षस सारे आले शरण।
मुनिजनांचे केलें रक्षण।
जो बाळा जो जो रे जो।।१२।।
सति अहिल्येचा उद्धार केला।
चौदा वर्षे वनवास कंठिला।
परतुन अयोध्या धामाला।
आनंदी आनंद सर्वत्र झाला।
जो बाळा जो जो रे जो।।१३।।
जन्म देऊनी श्री रघुनाथा।
धन्य जाहले माता नि पिता।
धन्य झाली अयोध्येची जनता।
दास कोकाटे नमवितो माथा।
जो बाळा जो जो रे जा।।१४।।
Ramacha Palna Marathi
जो जो जो जो रे रघुराया। निद्रा करी सखया।।
जोगी आलासे भेटाया। शशिसम देखुनि काया।।
बाळा जोगी दिसतो सुंदर। मस्तकी जटाभार।।
गळा रुंडमाळाचे हार। शोभे व्याघ्रांबर।। बाळा जो.
भस्म चर्चुनी सर्वांगी। वेष्टिली भुजंगी।।
भूते घेऊनि स्वअंगी। आला प्रेमरंगी।। बाळा जो.
नाका जटेमधुनियां जळ वाहे। मुद्रा लावुनि पाहे।।
मान धरूनियां तो राहे। न कळे कोण आहे।। बाळा जो. ॥३॥
इतुकें ऐकुनियां वचन। हांसले रघुनंदन।।
भावें पदकमळी तल्लीन। गोसावीनंदन।। बाळा जो. ॥४॥
Ramacha Palna
बाळा जो जो रे कुलभूषणा । दशरथनंदना ॥
निद्रा करी बाळा मनमोहना । रामा लक्ष्मणा ।।धृ।।
पाळणा लांबविला अयोध्येसी । दशरथाचे वंशी ।।
पुत्र जन्मला हृषीकेशी । कौशल्येचे कुशी ।।१।।
रत्नजडित पालख । झळके अलौकिक ॥
वरती पहुडले कुलदीपक । त्रिभुवननायक ।।२।।
हालवी कौसल्या सुंदरी । धरूनी ज्ञानदोरी ।।
पुष्ये वर्षिली सुरवरी । गर्जती जयजयकार ।।३।।
विश्वव्यापका रघुराया । निद्रा करी बा सखया ।।
तुजवर कुरवंडी करूनियां । सांडिन अपुली काया ।।४।।
येऊनि वसिष्ठ सत्वर । सांगे जन्मांतर ।।
राम परब्रह्म साचार | सातवा अवतार । याग रक्षनिया अवधारा ।
मारूनि रजनीचरा जाईल सीतेच्या स्वयंवरा । उद्धरी गौतमदारा ।
पणिली जानकी सरूपा। भंगनियां शिवचापा
रावण लज्जित महाकोपा नव्हे पण हा सोपा।।७।।
सिंधजलडोही अवलीळा। नामे तरतिल शिळा।।।
त्यांवरी उतरूनियां दयाळा। नेईल वानरमेळा 10 समळ मर्दुनि रावण।
स्थापिल विभीषण। देव सोडविल संपूर्ण । आनंदेल त्रिभुवन ॥९॥
राम भावाचा भुकेला। भक्ताधीन झाला।।
दास विट्ठले ऐकिला। पाळणा गाईला ।।१०।।
हिंदू धार्मिक ग्रंथानुसार भगवान विष्णू यांचा सातवा अवतार असणाऱ्या प्रभू रामचंद्र यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला दुपारी १२ वाजता झाला. भारत वंशातील सर्व हिंदू धार्मिक लोकांचे आराध्यदैवत असलेल्या भगवान श्रीरामचंद्र यांचा जन्मदिन रामनवमीच्या रूपाने भारतभर साजरा करण्यात येतो.
यानिमित्ताने देशांतील सर्व राममंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात येते. शंख आणि घंटानादाच्या सुरावर महाआरती म्हटल्यानंतर प्रसादाचे आयोजन करण्यात येते. या दिवशी भाविकांची मंदिरात दर्शनाकरिता मोठ्या संख्येने गर्दी असते. तसचं, अनेक ठिकाणी प्रभू राम यांच्या विविध भूमिका साकारून मिरवणूक काढण्यात येते. प्रभू रामचंद्र यांच्या जन्मोत्सवात सर्वसमुदाय बेभान होवून नाचत असतो. घोडे, फटाके, ढोल ताशे यांचे आवाज तसचं प्रभू रामचंद्र यांचे विविध देखाव्यांनी संपूर्ण वातावरण गुंजून जाते.
त्याचप्रमाणे, आपल्या घरी देखील राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. राम जन्मोत्सव निमित्त महिला उपवास करतात. तसचं, दुपारी बारा वाजता राम जन्माच्या वेळी पाळणा गीतांचे गायन करून प्रभू रामचंद्र यांचा जन्मदिन साजरा करतात. यानंतर रामफळाचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात येतो.
राम जन्मोत्सव निमित्त म्हटल्या जाणाऱ्या पाळणा गीताला विशेष असे महत्व आहे. जन्माच्या वेळी म्हटल्या जाणाऱ्या पाळणा गीताच्या माध्यमातून प्रभू रामचंद्र यांचे संपूर्ण वर्णन करण्यात येते. प्रभू रामचंद्र यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून संबोधण्यात येते. प्रभू रामचंद्र हे आबालवृद्धांपासून सर्वांनाच प्रिय असल्याने सर्वच मंडळी त्याच्या जन्मोत्सवात सहभागी होतात.
भगवान रामचंद्र यांना हिंदू धर्माचे प्रतिक मानले जाते. पाळणा गीत म्हणण्यामागे भाविकांची विशेष अशी श्रद्धा आहे. भगवान राम यांच्या जन्माच्या वेळी पाळणा गीताचे गायन केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. म्हणून महिला प्रभू रामचंद्र यांच्या जन्माच्या वेळी पाळणा गीत गात असतात.