आपल्या देशांतील हिंदू धार्मिक पौराणिक धर्म ग्रंथांत पूजा विधी करण्यास विशेष महत्व दिल गेलं आहे. त्यामुळे आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिक दरोरोज सकाळी आंघोळ केल्यानंतर प्रथम पूजा करत असतांना दिसतात. आपण लहान असल्यापासून पाहत आलो आहे की, आपले आजी आजोबा रोज पहाटे उठून स्नान केल्यानंतर प्रथम देवाची पूजा करीत असतात. असे केल्याने मनाला शांती लाभते शिवाय, घरांत सकारात्मक उर्जा राहते असे त्यांचे म्हणने असते.
मित्रांनो, आज आपण देखील या लेखाच्या माध्यमातून अखंड हिंदू धर्माचे दैवत असलेले प्रभू रामचंद्र यांच्या राम रक्षा मंत्राचे लिखाण करणार आहोत. राम रक्षा स्तोत्रांचे पठन करण्याबाबत लोकांची अशी धारणा आहे की, या राम रक्षा स्तोत्राचे दरोरोज नित्य नियमाने पठन केल्यास आपले सर्व दु:ख नाहीसे होतात. तसचं, आपणास दीर्घ आयुष्य लाभून आपल्या जीवनांत सुख शांती नांदते.
राम रक्षा स्तोत्र – Ram Raksha Stotra in Marathi
॥ श्रीरामरक्षास्तोत्रम् ॥
श्रीगणेशायनम: ।
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य ।
बुधकौशिक ऋषि: ।
श्रीसीतारामचंद्रोदेवता ।
अनुष्टुप् छन्द: ।
सीता शक्ति: ।
श्रीमद्हनुमान् कीलकम् ।
श्रीसीतारामचंद्रप्रीत्यर्थे जपे विनियोग: ॥
॥ अथ ध्यानम् ॥
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्दद्पद्मासनस्थं ।
पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ॥
वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं ।
नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचंद्रम् ॥
॥ इति ध्यानम् ॥
चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥१॥
ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् ।
जानकीलक्ष्मणॊपेतं जटामुकुटमण्डितम् ॥२॥
सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तं चरान्तकम् ।
स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥३॥
रामरक्षां पठॆत्प्राज्ञ: पापघ्नीं सर्वकामदाम् ।
शिरो मे राघव: पातु भालं दशरथात्मज: ॥४॥
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रिय: श्रुती ।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सल: ॥५॥
जिव्हां विद्दानिधि: पातु कण्ठं भरतवंदित: ।
स्कन्धौ दिव्यायुध: पातु भुजौ भग्नेशकार्मुक: ॥६॥
करौ सीतापति: पातु हृदयं जामदग्न्यजित् ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रय: ॥७॥
सुग्रीवेश: कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभु: ।
ऊरू रघुत्तम: पातु रक्ष:कुलविनाशकृत् ॥८॥
जानुनी सेतुकृत्पातु जङ्घे दशमुखान्तक: ।
पादौ बिभीषणश्रीद: पातु रामोSखिलं वपु: ॥९॥
एतां रामबलोपेतां रक्षां य: सुकृती पठॆत् ।
स चिरायु: सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥१०॥
पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिण: ।
न द्र्ष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि: ॥११॥
रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् ।
नरो न लिप्यते पापै भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥१२॥
जगज्जेत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् ।
य: कण्ठे धारयेत्तस्य करस्था: सर्वसिद्द्दय: ॥१३॥
वज्रपंजरनामेदं यो रामकवचं स्मरेत् ।
अव्याहताज्ञ: सर्वत्र लभते जयमंगलम् ॥१४॥
आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हर: ।
तथा लिखितवान् प्रात: प्रबुद्धो बुधकौशिक: ॥१५॥
आराम: कल्पवृक्षाणां विराम: सकलापदाम् ।
अभिरामस्त्रिलोकानां राम: श्रीमान् स न: प्रभु: ॥१६॥
तसचं, आपण ज्या देवाची उपासना करतो त्या परमेश्वराचा आशीर्वाद कायम आपल्या सोबत राहतो. याचप्रमाणे, घरांत पोथी पुराण देखील वाचले जाते, ज्यामुळे आपल्या व आपल्या घरातील सदस्यांवर असलेल्या वाईट शक्तींचा प्रभाव नष्ट होतो. शिवाय, आपल्या मनावर सुद्धा चांगले संस्कार होतात. त्यामुळे घरात पोथी पुराण वाचण्याची ही परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आली असून, आज देखील ती मोठ्या प्रमाणात जोपासली जाते.
एखाद्या वाईट शक्तीने आपणास ग्रासले असल्यास किंवा आपले कोणतेही काम पूर्ण होत नसल्यास आपण ब्राह्मण पंडितांकडे जातो किंवा जोतिष्यांना या समस्यांविषयी उपाय विचारतो. तेव्हा ते आपणास उपाय म्हणून मंदिरात किंवा आपल्या घरी देवतांच्या स्तोत्रांचे उच्चारण करण्यास सांगतात. आपण मंदिरात गेल्यास आपल्या दृष्टीस पडत असेल की अनेक लोक मंदिरात स्तोत्रांचे पठन करीत असतात. स्तोत्र म्हणजे काय तर देवाची आराधना करण्यासाठी देवांची केलेली स्तुती होय. स्तोत्र पठन करण्याबाबत लोकांची अशी धारणा आहे की, आपल्या इष्ट देवतेच्या स्तोत्राचे नियमित पठन केल्याने आपली इष्ट देवता आपल्यावर प्रसन्न होते. तसचं, त्या इष्ट देवतेची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते.
राम रक्षा स्तोत्रा बाबत एक दंत कथा देखील प्रचलित आहे. भगवान शंकराने बधुकौशिक नामक ऋषीला स्वप्नांत दर्शन देऊन रामरक्षा स्तोत्र सांगितला होता. दुसऱ्या दिवशी प्रात: काली उठल्यानंतर बधुकौशिक ऋषींनी भगवान शंकर यांनी सांगितल्या प्रमाणे रामरक्षा स्तोत्राची रचना केली.
तसचं या स्तोत्राचे नियमित पठन केल्याने मिळणाऱ्या लाभाचे वर्णन देखील केलं आहे. तरी मित्रांनो, आपण या राम रक्षा स्तोत्राचे महत्व समजून घेऊन या स्तोत्राचे नियमित पठन करावे. धन्यवाद..