Ram Navami chi Mahiti
मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम प्रभु आपल्या भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ असुन भारतीयांच्या हृदयात कायम विराजमान आहेत.
भगवान श्रीरामाच्या येण्याने आणि त्यांच्या जगण्याने संपुर्ण राष्ट्राला जगण्याचा पथ दाखविलेला आहे.
मर्यादा पुरूषोत्तम श्री राम यांच्या आचरणातुन प्रत्येकाला एक उत्तम उदाहरण मिळालेले आहे.
संसारात राहुन सामाजिक, कौटुंबिक, नैतिक आणि राजकिय मर्यादा पाळत पुरूष सदाचरणी राहु शकतो याचे रामचंद्र प्रभु एक जिवंत उदाहरण आहे.
राम या शब्दाचा अर्थ अतिशय सुंदर असा आहे. राम म्हणजे स्वयंप्रकाश! अंतःप्रकाश! आपल्या आत्म्याचा प्रकाश.. राम
चैत्र शुध्द नवमी तिथीला रणरणत्या उन्हात दुपारी सुर्य माथ्यावर असतांना बारा च्या सुमारास प्रभु श्रीराम जन्माला आले आणि ही भुमी पतित पावन झाली.
चैत्र नवरात्रात नवव्या दिवशी भगवान विष्णुचा सातवा अवतार म्हंटल्या जाणारे प्रभु श्रीराम या भुतलावर जन्माला आले.
जाणून घ्या या लेखाद्वारे रामनवमी विषयीची माहिती – Ram Navami Information in Marathi
रामनवमीचा इतिहास – Ram Navami History
हिंदु बंधुबांधव हा दिवस अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा करतात.
चैत्र नवरात्रात नऊ दिवस ठिकठिकाणी रामायणाचे पारायण, भजन, किर्तन, प्रवचानाचे आयोजन करण्यात येतं.
प्रभु रामचंद्राच्या जिवनावर, कार्यावर प्रकाश टाकला जातो.
नवरात्राच्या नवव्या दिवशी रामचंद्राच्या जन्माचे किर्तन होते आणि घडयाळाच्या काटयावर ठिक बारा वाजता रामाचा जन्म केला जातो.
फटाके फोडुन, रोषणाई करून आनंद साजरा केल्या जातो. रामाच्या मुर्तिला हार आणि गाठी घातल्या जातात.
आरती आणि प्रसाद वितरण केल्या जाते. प्रसाद म्हणुन सुंठवडा वितरीत केला जातो.
प्रभु रामचंद्राच्या मुर्तीला पाळण्यात ठेउन आवर्जुन पाळणा म्हंटल्या जातो. अनेक ठिकाणी झाॅंकी देखील प्रदर्शनात ठेवल्या जातात.
रामचंद्राचे संपुर्ण कुटुंब या झाॅंकीत दाखविले जाते.
Ram Navami chi Mahiti
रामनवमीच्या दिवशी भाविक शक्यतो उपवास करतात. पुर्ण दिवस भजन स्मरण, स्तोत्रपाठ, हवन करून उत्सव साजरा करण्यात येतो. ‘श्री राम जयराम जयजयराम’ या मंत्राचा नित्य जाप केला जातो. प्रभु रामचंद्रात असलेले गुण अंगिकारण्याचा आपण संकल्प करावा.
प्रभु श्रीराम एकवचनी, एकबाणी, एकपत्नी, गुणवान पुत्र, राजधर्मचारी, होते आणि हे सगळे गुण त्यांच्या अंगी असुन देखील या सर्व गोष्टींच्या त्यांना क्वचित देखील अहंकार नव्हता.
संस्कृतिरक्षक श्रीराम होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा.
त्याच्यातील गुण आपल्याला कसे अंगिकारता येतील या साठी श्रीरामाची शिकवण जाणली पाहिजे.
महर्षी वाल्मिकी म्हणतात ‘सदगुणांचा सर्वोच्च बिंदु म्हणजे प्रभु श्रीराम’. राज्याभिषेकाची बातमी कानावर पडली त्याक्षणी तो अत्यानंदीत झाला नाही आणि पुढच्या काही क्षणांत अयोध्या सोडुन चैदा वर्षे वनवासाची बातमी कानावर पडल्यावर तो शोकमग्न देखील झाला नाही… वडिलांची आज्ञा प्रमाण मानुन वनवासाला निघतांना तो किंचीत देखील डगमगला नाही.
एवढया मोठा बलाढय राजा रावण महान शिवभक्त असुन देखील प्रभु श्रीरामचंद्राला अखेरीस शरण आला तो केवळ रामाच्या अंगी असलेल्या गुणांमुळेच.
यावरून सामान्य मनुष्याला ही शिकवण मिळते की उत्तम गुणांसमोर रथीमहारथी देखील अखेरीस शरण येतात…
प्रभु रामचंद्रांना तीन भाऊ होते परंतु त्यांच्यात कधीही वाद झाले नाहीत.
हे सर्व बंधु आपल्या सुखापेक्षा इतर भावाच्या सुखाचा विचार अगोदर करत असत.
माता कैकयी मुळे वनवास लाभला तरी देखील त्या मातेचा प्रभु रामचंद्रांनी कधीही तिरस्कार, व्देष केल्याचे ऐकायला नाही येत.
इतर मातांप्रमाणेच कैकयी देखील त्यांना कायम वंदनियच होती.
प्रभु रामचंद्राची मातृपितृ भक्ती देखील आजच्या तरूणांकरता अनुकरणीय अशीच आहे.
प्रत्येक मनुष्याने आलेल्या प्रसंगाचा धिरोदात्तपणे सामना करण्याची शिकवण आपल्याला प्रभु श्री रामचंद्राच्या जीवनाकडे पाहुन मिळते.
हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.