Jijabai Quotes
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई सर्वात आधी स्वराज्याचे स्वप्न पाहणारी स्त्री आणि आपल्या सपुताला त्या स्वराज्याकरिता लढण्यासाठी तयार करणारी वाघीण म्हणजे माँ जिजाऊ, ज्या प्रमाणे वाघिणीच्या पोटी छावा जन्माला येतो त्या प्रमाणे जिजाऊ माँ साहेबांच्या पोटी छत्रपती शिवाजी नावाचा छावा जन्माला आला,
बाळंतपणात असतांना माँ साहेबांनी रामायण महाभारत यांचे वाचन आणि चिंतन केले त्यांनंतर त्यांनी ठरवले की होणाऱ्या मुलाने स्वराज्य स्थापन करून रयतेला सुखी ठेवावे, माँ साहेब जिजाऊ यांचे गुणगान केले तेवढे कमीच कारण ज्या स्त्री ने स्वराज्य स्थापन करणाऱ्या राजाला जन्म दिला ती माता धन्यच, तर आजच्या लेखात आपण माता जिजाऊ यांच्या येणाऱ्या जयंती निमित्त काही Quotes पाहणार आहोत तर आशा करतो आपल्याला आवडतील, तर चला पाहूया..
राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांचे कोट्स आणि डायलॉग – Rajmata Jijau Quotes in Marathi

“थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी ना फिटणार चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे न मिटणार.”
“तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय नि शंभूछावा, तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा, तुम्ही नसता तर नसते लढले जिद्दीने मावळे तुम्ही नसता तर नसते दिसले स्वराज्याचे सोहळे.”

“स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य ती स्वराज्याची जननी जिजामाता.”
Jijabai Thoughts
आजच्या काळातील प्रत्येक स्त्री ने माँ साहेबांसारखं असण आवश्यक आहे, जेणेकरून प्रत्येक स्त्रीच्या उदरात शिवाजी राजासारखे वीर पराक्रमी जन्माला येतील आणि समाजाला योग्य दिशेने घेऊन जातील, माँ साहेबांकडून शिकण्या सारख्या बऱ्याच गोष्टी होत्या, राजांना ज्यांनी लहानपणीच एक योग्य राजा कसा असतो आणि राजाने आपल्या रयतेसाठी काय करणे गरजेचे असते हे शिकवल होतं. प्रत्येकाची माता ही माँ जिजाऊ साहेबांसारखी असो आणि पुत्र हा राजांसारखा असो, माँ जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त पुढेही काही Quotes लिहिले आहेत चला पाहूया.

“छावा तू जिजाऊचा स्वराज्याचा घेतला ध्यास मूठभर मावळ्या सोबतीने रचला नवा इतिहास.”
Jijamata Status

“एक उडाली ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली स्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाट ही झाली.”
Jijabai Dialogue in Marathi

“तुम्ही नसते तर शिवराय नसते शिवराय नसते तर स्वराज्य नसते, माँ जिजाऊ साहेब जयंती निमित्त त्यास मानाचा मुजरा.”
“एका स्त्रीची जबरदस्त इच्छाशक्ती जगातल्या ५-५ महाकाय साम्राज्य उद्वस्थ करू शकते हे आई जिजाऊंनी अख्या जगाला दाखवले.”
Rajmata Jijau Marathi Quotes

“असंभव पेलतो वादळ तुझ्या आशीर्वादाचे पाठबळ लाभले ज्याच्या नशिबी उद्धारले ज्याचे कूळ तुची पायधूळ लागली तिच्या पायी.”
“महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माउलीने गुलामगिरिंच्या छाताडावर प्रहार केला त्या विश्वामता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांना मानाचा मुजरा.”
छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या प्रराक्रमी योध्याची आई माँ जिजाऊ साहेबांना माझी मराठीच्या संपूर्ण टीमचा मानाचा मुजरा आणि प्रत्येक आई ही माँ साहेबांसारखी घडावी अशी प्रार्थना,आशा करतो लिहिलेल्या Quotes आपल्याला आवडतील, आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना आणि पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला शेयर करायला विसरू नका, आणि अश्याच नवनवीन लेखांसाठी आणि Quotes साठी जुळून रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!