Rajmachi Killa Mahiti
मुंबई – पुणे मार्गावर महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले दोन हिल स्टेशन ते म्हणजे लोणावळा आणि खंडाळा आणि येथेच आहे सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये असलेला राजमाची हा किल्ला.
राजमाची किल्ला माहिती – Shrivardhan Rajmachi Fort Information in Marathi
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या राजमाची किल्ल्याचे वैशिष्टय म्हणजे या किल्ल्याचे दोन बालेकिल्ले आहेत ते श्रीवर्धन आणि मनरंजन. राजमाची हे महाराष्ट्रातील कोकण विभागातील सहयाद्री पर्वत रांगेत वसलेले एक छोटेसे गाव आहे.
मुंबई पुणे लोहमार्गावर लोणावळ्याच्या वायव्येस 15 कि.मी.अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे. राजमाची किल्ल्याची उंची 833 मीटर आहे. गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला असून ट्रेकर्स च्या दृष्टीने हा किल्ला मध्यम समजला जातो.
पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि खंडाळा या दोन प्रसिद्ध टेकड्यांजवळ असलेले श्रीवर्धन आणि मनरंजन किल्ले. दोन तटबंदी शिखरे असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यासाठी राजमाची प्रसिद्ध आहे.
राजमाची किल्ला इतिहास – Rajmachi fort History
सातवाहनांच्या साम्राज्यात हा किल्ला बांधला होता. साधारण इ.स.पू. 200 ते 100 मध्ये हा किल्ला बांधला असावा असे काही पुरावे सापडतात.
शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची किल्ल्यासह लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर हे किल्ले विजापूरच्या आदिलशाही शासकाकडून आपल्या ताब्यात घेतले.
औरंगजेबाने 1704 मध्ये पुन्हा मराठ्यांकडून राजमाची किल्ला आपल्या ताब्यात घेतला. पुढच्याच वर्षी मराठ्यांनी तो आपल्या ताब्यात घेतला. नंतर शाहू महाराजांनी 1713 मध्ये राजमाची किल्ला हा कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात दिला.
व्यापार मार्गाच्या दृष्टीने हा किल्ला फार महत्वाचा राहिला आहे. कल्याण आणि नालासोपारा हि प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे होती. या बंदरापासून बोरघाटमार्गे पुण्याकडे जाणारा हा पुरातन व्यापारी मार्ग.
त्यामुळे या व्यापारी मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जकात वसुलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे. राजमाची किल्ला हा या पैकी सर्वात प्रमुख किल्ला होता.
1818 मध्ये मराठ्यांचा पाडाव झाल्यावर, इंग्रजांनी मराठा प्रदेश व राजमाची किल्लाही आपल्या ताब्यात घेतला.
राजमाची किल्ल्याची रचना – Rajmachi Fort Architecture
या किल्ल्यात आपल्याला विविध शैलीतील बांधकाम दिसून येतं.
विविध शैलीतील स्थापत्यकलेचे कारण म्हणजे त्यावर विविध कालखंडात विविध साम्राज्यांनी त्यावर राज्य केले आहे.
त्यामुळे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या शैलीचा प्रभाव आपल्याला या वास्तूत दिसून येतो.
आतमध्ये प्रवेश केल्यानंतर गुप्त प्रवेशद्वार आहे, भक्कम बांधलेल्या भिंती, पाण्याचे साठे, निवासी ठिकाणे, आणि भारतीय शैलीत बांधलेले दोन गड आपल्याला दिसून येतात ते म्हणजे मनरंजन किल्ला आणि श्रीवर्धन किल्ला.
किल्ल्याच्या आवारात पाहण्यासारखी काही मंदिरे आहेत.
मनरंजन आणि श्रीवर्धन किल्ल्यांमधील घाटावर हेमाडपंथी शैलीतील शिव मंदिर आणि कालभैरव मंदिर आहे.
किल्ल्यापासून जवळच कोंडाणा लेणी आहे. ज्यामध्ये 16 बुद्ध लेण्यांचा समूह आहे. यामध्ये भक्कम खांब, गुंतागुंतीचे कोरीवकाम आहे. सुमारे इ.स.पू. 1ल्या शतकातील ह्या लेण्या आहेत.
विस्तीर्ण पठाराने वेढलेल्या या राजमाची किल्ल्यातून बोर घाट दिसतो जो पूर्वी प्रमुख व्यापारी मार्ग होता जो मुबई आणि पुण्याला जोडत असे.
तसेच शिरोटा धरण आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा आपल्याला दिसतात.
पावसाळ्याच्यावेळी तर हिरवेगार डोंगर, पांढरे शुभ्र धबधबे इथल्या निसर्ग सौंदर्यात आणखीनच भर घालतात.
राजमाची किल्ल्यावर कसे पोहोचाल? – How to reach Rajmachi fort?
जर तुम्ही रेल्वे मार्गाने जात असाल तर लोणावळा रेल्वे स्थानकावर तुम्हाला पोहोचावे लागेल आणि तेथून किल्ल्यावर जाण्यासाठी खाजगी प्रवासी वाहने उपलब्ध आहेत.
मुंबई आणि पुण्याहून तुम्हाला रस्त्यानेही सहज जाता येते.
किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या उधेवाडी गावातूनही तुम्ही जाऊ शकता पण हा ट्रेक आहे.
अशाच पद्धतीचा दुसरा मार्ग हा कर्जतमार्गे जातो. हा मार्ग जरा खडकाळ आहे.
तर एकदा नक्की या ऐतिहासिक राजमाची किल्ल्याला भेट द्या. आमचा लेख तुम्हाला कसा वाटला हेही आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा.
आणखी अशाच काही माहितींसाठी जुळून रहा ‘माझी मराठी’ सोबत!
राजमाची किल्ल्या विषयी विचारले जाणारे प्रश्न – FAQ about Rajmachi Fort
उत्तर: पुणे जिल्हा.
उत्तर: सह्याद्रीच्या पर्वतरांगा.
उत्तर: सातवाहनांनी.
उत्तर: कोंडाणा बुद्ध लेणी आहे.
उत्तर: आदिलशाही शासकाकडून.