Raja Ram Mohan Roy Mahiti
आपल्या देशात अश्या महान विभुती जन्माला आल्या की ज्यांच्यामुळे जन माणसाला विचाराची नवी दिशा मिळाली.
या महान व्यक्तींपैकी एका थोर समाज सुधारकाविषयी आपण जाणुन घेऊया.
आधुनिक भारताचे रचियता म्हणुन राजा राममोहन रॉय यांच्याकडे बघीतलं जातं ब्राम्हो समाजाचे ते संस्थापक होते.
जे भारताचे समाजवादी आंदोलन देखील होते सतीप्रथा बंद करण्यात त्यांची मोलाची भुमिका होती राजा राम मोहन रॉय हे एक महान विव्दान आणि स्वतंत्र विचाराचे होते.
त्यांनी इंग्लिश, विज्ञान, विदेशी औषधी आणि तंत्रज्ञानाची शिक्षा प्राप्त केली होती मुगल शासकांनी त्यांना राजा ची उपमा दिली होती.
भारतातील एक महान समाजसुधारक “राजा राजमोहन रॉय” यांचा जीवनपरिचय – Raja Ram Mohan Roy in Marathi
आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय – Raja Ram Mohan Roy History
राजा राममोहन रॉय एक महान ऐतिहासीक विद्वान म्हणुन ओळखले जातात ज्यांनी भारताला आधुनिक भारतात बदलण्याकरता बराच संघर्ष केला आणि पिढयान पिढयापासुन चालत आलेल्या कुप्रथांना बंद केलं.
समाजात परिवर्तन घडवण्याकरता त्यांनी बरेच समाज उपयोगी कार्य केले आपल्या देशात महीलांची स्थिती मजबुत बनवण्यात त्यांचे योगदान महत्वपुर्ण आहे.
रॉय यांनी सती प्रथे विरूध्द उघड उघड विरोध केला, ते एक महान विव्दान होते ज्यांनी ब-याच पुस्तकांचे भाषांतर केले होते.
ब्राम्हो समाजाची स्थापना त्यांनी १८२८ मधे केली राजनैतिक, सामाजिक, आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं अमुल्य योगदान आहे.
राजा राममोहन रॉय हे विशेषता हिन्दुंच्या सती प्रथे विरोधात सगळयांना परिचीत आहेत.
त्या वेळी बंगाल मधे पती च्या निधनानंतर पत्नी ला सती संबोधले जाई आणि तीला सती जावे लागे.
रॉय यांनी या विरोधानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा देखील विरोध केला आणि भारतात इंग्लिीश ऐवेजी संस्कृत आणि पार्शियन भाषा शिकवण्यावर जोर दिला.
१८१६ मध्ये त्यांनीच इंग्रजीत हिन्दुइस्म शब्दाचा शोध लावला इतिहासात त्यांचे योगदान बघता भारतातील महत्वपुर्ण महापुरूषांमध्ये त्यांची गणना होते.
ते नेहमी भारताला आणि हिंदुत्वाला वाचवण्याकरता ईस्ट इंडीया कंपनीविरोधात लढा देत राहीले ब्रिटीश सरकारने तर त्यांना भारतीय नवजागरणाचे जनक ही पदवी दिली होती.
ब्रिटिश सरकार ने त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एका रस्त्याचे नाव बदलुन राजा राममोहन वे असे ठेवले.
राजा राममोहन रॉय यांचे प्रारंभिक जीवन आणि शिक्षा – Raja Ram Mohan Roy Life Story And Education
राजा राममोहन रॉय यांचा जन्म १७७२ मध्ये ब्राम्हण समाजात बंगाल राज्यातील हुगली जिल्हयात अरंभग तालुक्यातील राधानगर इथं झाला त्यांच्या परिवारात आपल्याला जातीय विभीन्नता बघायला मिळते.
त्यांचे वडील रमाकांत वैष्णव धर्माचे होते तर आई तारिणीदेवी शिवैत परिवाराच्या होत्या.
राममोहन रॉय यांचे एकुण तीन विवाह झाले त्यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यु बालपणातच झाला.
त्यांच्या दुस-या पत्नीपासुन त्यांना दोन मुलं झाली.
१८०० मध्ये राधाप्रसाद आणि १८१२ मध्ये रामप्रसाद त्यांच्या दुस-या पत्नीचा मृत्यु १८२४ मध्ये झाला त्यांची तिसरी पत्नी देखील जास्त काळापर्यंत जिवीत राहीली नाही.
इतिहासकारांच्या सांगण्यानुसार राम मोहन यांचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले.
तिथे त्यांनी बंगाली, संस्कृत, आणि पार्शियन भाषेचे ज्ञान अर्जित केले, त्यानंतर मदरसा येथे त्यांनी पार्शियन आणि अरेबिक भाषेचे ज्ञान प्राप्त केले तत्पश्चात हिन्दु साहित्य आणि संस्कृत चा अभ्यास करण्यासाठी ते बनारसला गेले.
तेथे गेल्यानंतर त्यांनी वेदउपनिषदांचा देखील अभ्यास केला.
वयाच्या ९ व्या वर्षी त्यांना पटना इथं पाठवण्यात आलं आणि २ वर्षानंतर त्यांना बनारसला पाठवलं.
राजा राममोहन रॉय यांचे इंग्लंड येथील वास्तव्य – Ram Mohan Roy Lived in England
राजा राममोहन रॉय यांनी सार्वजनिक स्तरावर घोषीत केले होते की जर ब्रिटिश पार्लमेंट ने रीफोर्म बिल पास केले नाही तर ते ब्रिटिश साम्राज्यातुन निघुन जातील
१८३० मध्ये राममोहन रॉय यांनी मोगल साम्राज्याचे दुत म्हणुन युनायटेड किंगडम ची यात्रा केली होती
ते हे पाहु ईच्छीत होते की लॉर्ड बेंटिक यांनी आपल्या साम्राज्यात सती प्रथा बंद केली की नाही त्याचवेळी त्यांनी फ्रांस ची यात्रा सुध्दा केली.
विश्वातील महत्वपुर्ण धर्मग्रंथ मुळ रूपात वाचण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते यामुळे सगळया महत्वपुर्ण धर्मग्रंथाची ते तुलना करू शकले.
विश्वधर्माची त्यांची धारणा कोणत्याही सिध्दांतावर आधारीत नव्हती तर विभिन्न धर्माच्या गंभीर ज्ञानावर आधारीत होती त्यांनी वेदाचे आणि उपनिषदाचे बंगाली भाषांतर सुध्दा केले.
वेदांतावर इंग्रजीत लिखाण केल्याने युरोपात आणि अमेरिकेत त्यांचे बरेच नाव झाले आणि कौतुकही.
सती प्रथेचा विरोध – Sati Pratha
सतीप्रथा बंद करणे ही राजा राममोहन रॉय यांच्या जीवनाची सर्वात मोठी उपलब्धी होती अविरत परिश्रम करत त्यांनी ही कुप्रथा सरकार व्दारा बंद करून याला दंडनीय अपराध घोषीत केले.
या अमानवीय प्रथेचे त्यांनी जोरदार खंडन केले वृत्तपत्रातुन आणि सभांमधुन या आंदोलनाने त्याकाळी जोर धरला.
याला समाजाकडुन इतका विरोध होता की काही काळापर्यंत राजा राममोहन रॉय यांच्या जीवाला देखील धोका होता.
शत्रु आणि विरोधकांना त्यांनी कधीच जुमानले नाही आणि त्यांच्या हल्ल्यांना देखील भीक घातली नाही.
त्यांच्या सातत्यपुर्ण परिश्रमाचे हे फलित होते की लॉर्ड विलियम बेंटिक यांनी १८२९ मध्ये सती प्रथा बंद केली.
कट्ठरपंथीयांनी जेव्हां इंग्लंड मध्ये प्रिवी काउन्सिल ला सतीप्रथेच्या समर्थनार्थ विनंती पत्र दिले
तेव्हां राममोहन रॉय यांनी देखील प्रगतीशील मित्रांच्या सहाय्याने आणि कार्यकर्त्यांच्या ब्रिटिश संसद समोर आपले सतीप्रथेविरूध्द विनंतीपत्र दिले.
प्रीवी काउन्सिल ने जेव्हा सतीप्रथे च्या समर्थनार्थ आलले विनंतीपत्र फेटाळले तेव्हा राममोहन रॉय यांना समाधान वाटले.
सती प्रथा संपल्यामुळे राजा राममोहन रॉय मानवतावादी सुधारकांच्या रांगेत आले २७ सप्टेंबर १८३३ ला इंग्लंड मधे राजा राममोहन रॉय यांचा मृत्यु झाला
आधुनिक भारताच्या इतिहासात राजा राममोहन रॉय यांनी प्रभावशाली कार्य केलं आहे वेदांत स्कुल ऑफ फिलोसोफित त्यांनी उपनिषदांचे अध्ययन केले.
वैदिक साहित्याला इंग्रजीत भाषांतरीत केले तसच ब्राम्हो समाजाची देखील त्यांनी स्थापना केली.
आधुनिक भारतीय समाजाच्या निर्माणात ब्राम्हो समाजाची मुख्य भुमिका राहीली आहे.
सती प्रथे विरोधात त्यांनी यशस्वी मोर्चा देखील काढला होता भारतातुन पश्चिमी संस्कृति हद्दपार करून भारतीय संस्कृतीचा विकास करण्याचा त्यांचा मानस होता.
आधुनिक समाजाच्या निर्माणाकरता त्यांनी ब-याच शाळा काढल्या होत्या ज्यामुळे जास्तीत जास्त लोक शिक्षीत व्हावेत ते आधुनिक सक्रीय महामानवच होते.
नव्या भारताचे महान व्यक्तीमत्व होते.
पुर्व आणि पश्चिमी विचारधारेचा समन्वय साधत १०० वर्षांपासुन सुस्त असलेल्या भारताला जागृत करण्याचे कार्य त्यांनी केले.
पुर्नजागृतीचे आणि सुधारवादाचे प्रथम जनक म्हणुन त्यांच्याकडे पाहीले जाते.
अश्या महान समाज सुधारकाला माझी मराठीचा मनाचा मुजरा, तसेच या लेखाला आपल्या मित्रांपर्यंत शेयर करा.
धन्यवाद!