Sasa chi Mahiti
ससा हा पाळीव प्राणी आहे. हा प्राणी आपल्याला अनेक गोष्टीतून भेटतो. ससा हा प्राणी लहानमुलांना फार आवडतो. अश्या मऊमऊ पांढर्याशुभ्र सश्याची माहिती (Rabbit Information in Marathi) आपण पुढे पाहू…
ससा प्राणी माहिती – Rabbit Information in Marathi
हिंदी नाव : | खरगोश |
इंग्रजी नाव : | Rabbit |
सशाला चार छोटे पाय ,दोन डोळे, दोन मोठे कान आणि एक छोटी शेपटी असते. सशाचे अंग मऊ लुसलुशीत असते. ससा हा भित्रा प्राणी आहे तसेच दिसायला गोंडस व लाजरा आहे.
सशाचे अन्न – Rabbit Food
सशाचे अन्न प्रामुख्याने कोवळे गवत, हिरव्या भाज्या, हरभरा हे आहे. ससा हा पूर्णपणे शाकाहारी प्राणी आहे.
रंग : ससे हे फक्त पांढऱ्या व चॉकलेटी रंगाचे आढळतात.
उपयोग : सशाचा उपयोग सर्कशीत केला जातो. सशाचे मास विकले जाते. तसेच ससेपालन हा व्यवसाय अनेक जण करतात.
ससा हा टुणटुण् उड्या मारतो. त्याचे पुढचे दोन पाय आखूड असतात. तर मागचे पाय जरा लांब असतात; ससा नेहमी जंगलात बिळात राहतो. हा प्राणी प्रामुख्याने इंग्लंड, जर्मनी, अमेरिका येथे जास्त प्रमाणात आढळतो. सशाची मादी एकाच वेळी दोन पिलांना जन्म देते. ती आपल्या पिलांना बिळात, खळग्यात लपवते.
पांढरा ससा हा आपल्याकडे विलायती देशातून आला. सशाचे शत्रू म्हणजेच कुत्रा, लांडगा, कोल्हा. या प्राण्यांची चाहूल लागली की, तो लगेच कुठेतरी लपून बसतो व आपला बचाव करतो. चांगल्या धष्टपुष्ट सशांना परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यामुळे ससेपालन करणाऱ्यांचा फायदा होतो.
सशाचा उपयोग सर्कशीत केला जातो. सशाचे मांस विकले जाते त्यामुळे शेतकऱ्यांना याचा जोडधंदा म्हणून उपयोग होतो.
खेडेगावामध्ये ससे मोठ्या प्रमाणात आढळतात परंतु शहरामध्ये फक्त बागेत किंवा सर्कशीमध्ये ससे आढळतात.
लहान मुलांना सशांबद्दल खूप आकर्षण वाटते म्हणून शहरामध्ये ससे पाळले जाऊ लागले आहेत.