Pulse Candy Success Story
आपण एखाद्या दुकानावर गेले आहात का? सामान विकत घेतल्यानंतर आपल्यालाही दुकानदाराने सुट्टे पैसे नसल्याने हातावर एखादी कँडी ठेवली आहे का? काही विषयच नाही, ठेवलीच असणार पण तीच जर पल्स ची कँडी असेल तर मोठ्या आवडीने आपण तिला घेऊन खाऊन टाकतो. आपणही कधी ना कधी पल्स च्या कँडीची चव घेतली असेल.
जी फक्त एक रुपयाला कोणत्याही दुकानात सहज मिळून जाते. आपण आजच्या लेखात याच पल्स च्या कँडी विषयी माहिती पाहणार आहोत की कश्या प्रकारे या कँडी ने बाजारात आपले वर्चस्व निर्माण केले आणि १ रुपया च्या कँडी ने कश्या प्रकारे ३०० करोड रुपयांच्या कंपनीचे निर्माण केले. तर चला पाहूया या कँडी ची कशी सुरुवात झाली.
पल्स कँडी ची स्टार्टअप स्टोरी – Pulse Candy Success Story in Marathi
देशात अधिकांश लोक आंब्याच्या फ्लेवर चे कँडी खाणे पसंत करतात, आणि या गोष्टीला पाहता देशातील कंपन्यांनी आंब्याच्या फ्लेवरच्या कँडी चे निर्माण केले आपल्याला पाहायला मिळते. देशात कच्चा मँगो म्हणून सुध्दा एकेकाळी एक कँडी फेमस झाली होती. लोकांच्या तोंडावर फक्त एकच नाव होते की “कच्चा आम” आणि या कँडी ला बाजारात पारले ने लाँच केले होते, आणि बाजारात मँगो फ्लेवरचे बरेचशे टॉफी आणि कँडी तेव्हा मिळत होते. पण बाजाराच्या एवढ्या स्पर्धेमध्ये २०१५ च्या सुमारास डी.एस. ग्रुप ने स्वतःच्या कंपनीची एक कँडी बाजारात आणली ज्या कँडी चे नाव होते पल्स. खूप कमी वेळात ह्या १ रुपयांच्या कँडी ने बाजारात कंपनीला ३०० कोटींचा फायदा कमवून दिला.
कशी निर्माण झाली पल्स ची कँडी? – How Pulse Candy was Created
डी.एस.ग्रुप या कँडी विषयी माहिती देताना सांगतात, की त्यांच्या टीम ने देशात एक सर्वे केला की त्यामध्ये हे समोर आले की देशातील जास्तीत जास्त लोकांना कैरी सोबत मीठ आणि मसाला खायला खूप आवडते. मग काय त्यांच्या कंपनीने ठरवले की लोकांना कैरीचा स्वाद मसालेदार कँडी ला बनून द्यायचा, आणि यावर डी.एस. ग्रुप कंपनीने काम करण्यास सुरुवात केली. आणि बाजारात एका नवीन चटकदार कँडी ला घेऊन आले.
आणि लोकांना ही कँडी खूप जास्त प्रमाणात आवडायला लागली या कँडी ला खाल्यानंतर बाहेरून कच्च्या कैरीची चव लागेल आणि या कँडी च्या आतच्या भागात काही स्पेशल मसाल्यांचा स्वाद येतो. आणि हे कॉम्बिनेशन लोकांना एवढं आवडले की काही लोक तर या कँडी चा पूर्ण एक डब्बा घरी घेऊन जात होते.
तसे पाहिले असता या कँडी ला २०१५ च्या फेब्रुवारी मध्ये सुरुवातीला गुजरात या शहरात सुरू केल्या गेलं होतं. लोकांना ही कँडी एवढी आवडायला लागली की या कँडची उत्पादन क्षमता कमी पडायला लागली, आणि यादरम्यान बरेचश्या डुप्लिकेट कंपन्यांनी या कँडी ला बनवून बाजारात आणले पण ओरिजनल कँडी पुढे ह्या कंपन्या जास्त वेळ टिकू शकल्या नाही.
पण कंपनीची उत्पादन क्षमता कमी झाली होती बाजाराच्या मागणी पेक्षा, पण यावर उपाय काढत डी.एस. ग्रुप कंपनी ने कँडी चे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवले. या कँडी ला संपूर्ण देशात डिस्ट्रिब्युट करण्यासाठी कंपनीला खूप कमी प्रयत्न करावे लागले होते कारण अगोदरच डी.एस. ग्रुप कंपनी चे वेगवेगळे प्रोडकट्स बाजारात उपलब्ध होते आणि त्यामुळे या कँडी ला देशात वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्या साठी त्यांना मदत मिळाली.
२०१६ च्या सुरुवातीलाच या कँडी चे एका महिन्याचे उत्पादन जवळजवळ १५६० टन पर्यंत होते, यावरून आपण विचार करू शकता की या कँडी ची लोकांमध्ये किती लोकप्रियता निर्माण झाली होती. आणि या १ रुपयाच्या कँडी ने ३०० कोटींचा नफा कंपनीला करून दिला होता. यावरून आपण समजू शकतो की पल्स च्या कँडीने बाजारात मोठी यश मिळवून दिले होते.
तर आजच्या लेखात आपण पाहिले की एका कँडी ची सुरुवात कशी झाली आणि आज त्या कँडी ने बाजारात कशी कमाई केली. तर आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!