Prakash Amte Mahiti
प्रकाश आमटे यांना आपण सगळेच एक समाजसेवक म्हणुन ओळखतो. त्यांनी आपलं संपुर्ण आयुष्य आदिवासींची सेवा करण्यात व्यतीत केलं आहे.
’’रेमन मॅग्सेसे पुरस्कार’’ प्राप्त बाबा आमटेंचे हे चिरंजीव आहेत डॉ. प्रकाश बाबा आमटे ! ! !
आदिवासींच्या जीवनातील अंधार दुर करणारे ’’डॉ. प्रकाश बाबा आमटे’’ – Prakash Amte Information in Marathi
बाबा आमटेंनी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हयात हेमलकसा इथं लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली होती. या शिवाय ते स्थानिक आदिवासींच्या विकासाकरता आणि आरोग्याकरता देखील कार्य करीत होते.
विशेषतः बाबांनी कुष्ठरोग्यांकरता कार्य केलं, त्यांच्याकरता आनंदवनाची स्थापना केली.
बाबांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात आज ही जवाबदारी डॉ. प्रकाश आणि त्यांचे दोन चिरंजीव अनिकेत व दिगंत फार चांगल्या प्रकारे सांभाळतायेत.
प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी आमटे स्वतः डॉ.क्टर आहेत. ते दोघेही बाबा आमटेंच्या परंपरेला जोपासत आणि पुढे नेत आदिवासींच्या सेवार्थ आपले पुर्ण लक्ष केंद्रीत करून आहेत.
पुर्वी जेव्हां डॉ. प्रकाश आणि त्यांच्या पत्नी हेमलकसा (Hemalkasa) येथे वास्तव्याला आल्या त्यावेळी दरवाजा नसलेली एक छोटी झोपडी वजा खोली त्यांनी बांधली आणि तेथे राहु लागले.
तेव्हां तेथे वीज नव्हती, आणि स्वतःचे असे काही खाजगी आयुष्य जगता येईल अशी देखील परीस्थिती नव्हती माडिया गोंड आदिवासी समुदायाकरता या डॉक्टर दांपत्याने आरोग्याची आणि योग्य शिक्षण देण्याची जवाबदारी उचलली.
सुरूवातीला हे सर्व अशक्यप्राय आणि प्रचंड कठीण वाटावे असेच होते.
पण पुढे पुढे त्यांच्यात राहुन त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर, त्यांची सेवा करत करत आदिवासींच्या मनात त्यांनी जागा निर्माण केली.
गडचिरोली जिल्हयातील या हेमलकसा इथं 1975 साली स्वित्झरलॅंड च्या आर्थिक मदतीने एक छोटेसे रूग्णालय स्थापीत करण्यात आले, यात औषधांची चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे डॉ.. प्रकाश आणि डॉ.. मंदाकिनी यांना या ठिकाणी काही शस्त्रक्रिया करणे शक्य होउ लागले.
या ठिकाणी डॉक्टर दांपत्यानी मलेरिया, क्षयरोग, दाह, यांसोबत भाजलेल्या रूग्णांवर यशस्वी उपचार केलेत, याशिवाय साप विंचु यांच्या दंशाने मरणासन्न अवस्थेत पोहोचलेल्या रूग्णांवर देखील उपचार केले.
ते पाहाता या आदिवासींचा विश्वास वाढीस लागला आणि मोठया संख्येने रूग्णं येथे उपचार घेण्याकरता येऊ लागले.
डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी यांनी आदिवासींच्या शिक्षणाकरता देखील मोठं कार्य केलं.
त्यांच्या अधिकारांची जाणीव त्यांना करून दिली. या व्यतिरीक्त लालची आणि भ्रष्ट वन अधिका.यांना या भागातुन हाकललं सुध्दा !
Prakash Amte Mahiti
1976 साली त्यांनी हेमलकसा इथं एका शाळेची स्थापना केली. सुरूवातीला आदिवासी आपल्या पाल्यांना या शाळेत पाठवण्यास तयार होत नव्हते पण पुढे पुढे मुलं शाळेत येऊ लागली.
या ठिकाणी आदिवासी मुलांना शिक्षणासोबतच स्वयंरोजगार करण्याकरता देखील प्रशिक्षीत केल्या जातं.
हेमलकसा येथील या शाळेत आदिवासींना शेतीविषयी, फळं, भाज्यांच्या उत्पादनाविषयी प्रशिक्षण दिल्या जात होतं.
या व्यतिरीक्त आदिवासी बांधवांना वनांच्या संरक्षणा संबंधी जागरूक करण्यात या दांपत्यानी मोलाची भुमिका पार पाडली.
या शाळेतुन शिक्षण घेतलेले विदयार्थी आज डॉ.क्टर, वकील, अधिकारी, शिक्षक झाले असुन आपले आयुष्य चांगल्या त.हेने व्यतीत करतायेत.
या उभयतांच्या मुलांनी देखील याच शाळेतुन शिक्षण घेतले आहे.
डॉ. प्रकाश आमटेंनी वन्य प्राण्यांकरता एक प्राणी संग्रहालय देखील बनविले आहे. या ठिकाणी अनाथ झालेल्या लहान प्राण्यांना ठेवले जाते.
प्राण्यांचे हे निवासस्थान डॉ.. आमटेंच्या घरी अंगणातच तयार करण्यात आले आहे.
येथे अस्वल, बिबटया, मगर यासारखी 60 पेक्षा अधिक जातीची जनावरं अगदी गुण्यागोविंदाने राहातात. डॉ. प्रकाश आमटे या प्राण्यांना स्वतःच्या हाताने जेऊ घालतात.
पुर्वी येथील आदिवासी लोक प्राण्यांची शिकार करीत असत त्या प्राण्यांवर डॉ. आमटे उपचार करीत.
आदिवासींकरता हेमलकसा येथे या आमटे दाम्पत्यांनी रूग्णालयाची स्थापना केली आहे.
आदिवासींवर मोफत उपचार केले जातात. या व्यतिरीक्त येथे मातृत्व सदन देखील उभारण्यात आले आहे, स्वास्थ्यासंबंधी माहिती या सदनात दिली जाते.
2008 साली आमटे दाम्पत्याला त्यांच्या सामाजिक दातृत्वाकरीता ’मॅगसेसे पुरस्काराने ’ सन्मानित करण्यात आले आहे.
1973 पासुन डॉ. प्रकाश महाराष्ट्रातील सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.
त्यांच्या कार्याची जाणीव ठेवत त्यांना 2002 साली पùश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
या व्यतिरीक्त सामाजिक कार्याकरता 2014 साली मदर टेरेसा पुरस्काराने त्यांच्या कार्याला सन्मान देण्यात आला आहे.
डॉ. प्रकाश आमटेंवर चित्रपट – Prakash Amte Movie
डॉ. प्रकाश आमटेंवर आधारीत चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला आहे.
Dr Prakash Baba Amte: The Real Hero या चित्रपटात डॉ. प्रकाश आमटेंची भुमिका नाना पाटेकर या अभिनेत्याने तर डॉ. मंदाकिनी आमटेंची भुमिका सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रीने साकारली आहे.
डॉ. प्रकाश आमटेंनी आपले संपुर्ण आयुष्य आदिवासींची सेवा करण्यात व्यतीत केले आणि करतायेत. या गोष्टीचे कौतुक करावे तेवढे कमीच ! त्यांना पाहाता इतरांनी देखील त्यांच्या कार्याला अंगीकारून बरेच काही शिकण्यासारखे आहे.