Batata chi Mahiti
आज जगात सर्वत्रच बटाटा पिकवला जात असला, तरी त्याचं मूळ स्थान हे दक्षिण अमेरिकेतील पेरुव्हियन आणि बोलीव्हियन हा परिसर आहे. या परिसरात इसवी सनाच्या ५ हजार वर्षांपूर्वीपासून बटाट्याचा वापर केला जायचा. मात्र तेव्हा बटाट्याकडे एक साधारण कंद म्हणूनच पाहिलं जायचं.
बटाट्याची माहिती आणि फायदे – Potato Information in Marathi
हिंदी नाव | आलू |
इंग्रजी नाव | Potato |
बटाट्याचा वापर दक्षिण अमेरिकेत अनेक शतकं होत होता. त्यानंतर काही काळाने उत्तर अमेरिकतेही त्याचा वापर सुरू झाला. तरी बटाट्याला खरी लोकप्रियता गेल्या ५०० ते ६०० वर्षातच मिळाली आहे. कोलंबसने अमेरिकचा शोध लावल्यावर स्पॅनिश सैन्याने दक्षिण अमेरिकेचा भाग आक्रमण करून आपल्या वर्चस्वाखाली आणला. तेव्हा दक्षिण अमेरिकेत फिरत असताना साधारणपणे १५३२ मध्ये स्पॅनिश सैन्याला बटाट्याचं पीक प्रथम आढळलं. त्यानंतर १५३५ ते १५८५ या कालावधीत स्पेनमध्ये बटाट्याचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. स्पॅनिश लोकांनीच जमिनीखाली उगवणाऱ्या या कंदाला पोटॅटो हे नाव दिलं.
स्पेनमध्ये बटाट्याचा वापर रीतसर सुरू झाल्यानंतर पोर्तुगाल, इटली, फ्रान्स, बेल्जियम व जर्मनीमध्ये बटाट्याचा प्रसार झाला. नंतर इंग्लंडचा राजा जेम्स (पहिला) याने सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजे १६१२ मध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात पहिल्यांदा बटाटे खाल्ले.
त्यावेळी बटाटे भाजून त्याची साल काढून ते मीठ व तेल वापरून बनवलेल्या द्रवपदार्थाबरोबर खात असत. मात्र त्यानंतर इंग्लंडमध्ये बटाट्याचा प्रसार व्हायला १६६२ सालच उजाडावं लागलं. कारण त्यावर्षी इंग्लंडच्या रॉयल सोसायटीने संपूर्ण इंग्लंडमध्ये बटाट्याची लागवड करायचा निर्णय घेतला. याच दरम्यान संपूर्ण युरोप खंडात बटाट्याचा खाद्यपदार्थ म्हणून वापर सुरू झाला.
मात्र अगदी सुरूवातीच्या काळात बटाटा खायला सर्वजन घाबरायचे. कारण बटाटा आणि धोत्रा या विषारी वनस्पतीचं मूळ एकंच आहे. त्यामुळे तेव्हा माणसांऐवजी बटाटे प्रामुख्याने जनावरांनाच खायला घातले जायचे. मात्र हळूहळू बटाट्याची उपयुक्तता पाश्चात्यांना पटली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर बटाटा खायला सुरूवात केली.
परदेशात सर्वत्र लोकप्रिय होत चाललेल्या बटाट्याचं भारतातलं आगमन मात्र १७ व्या शतकातच झालं.१७ व्या शतकातच झालं. १७ व्या शतकात पोर्तुगीजांनी भारतात सर्वप्रथम बटाटा आणला. त्यांनी भारतात बटाट्याची लागवड प्रथम पश्चिम समुद्रकिनारपट्टीच्या प्रदेशात केली. आज सर्रास वापरलं जाणारं बटाटा हे नावही पोर्तुगीजांनीच दिलेलं आहे. पोर्तुगीजांप्रमाणेच ब्रिटिशांनीही बटाट्याचं बियाणं सोबत आणून बंगालसारख्या काही प्रदेशात त्याची लागवड केली. मात्र तिथे बटाट्याला ‘आलू’ हे नाव रूढ झालं.
आज भारतात सर्वत्र बटाटा किंवा आलू हेच संबोधन रूढ आहे.
बटाट्याचा औषधी उपयोग – Potato Benefits in Marathi
- बटाटा अल्कलीयुक्त गुणांनी अतिशय समृद्ध आहे. साहजिक शरीरातील अल्कलीच्या गरजेसाठी तो आवश्यक आहे. पण त्याचबरोबर शरीरात आम्लाचा अतिरेक झाल्यास समतोल साधण्यासाठीही बटाटा पूरक ठरतो.
- खरूजसारख्या त्वचा विकारावर बटाटा हे उत्तम औषध आहे. खरूज झालेल्या ठिकाणी बटाट्याचा कीसलावल्यास ती लवकर बरे होते.
- संधिवातावर कच्च्या बटाट्याचा रस अतिशय गुणकारी ठरतो. जेवणापूर्वी हा रस दोन चमचे घेतल्यास आखडलेले सांधे बरे होतात.
- जठर- आतड्यांच्या रोगावरही बटाट्याचा रस गुणकारी ठरतो.
बटाट्यात पोटॅशियम, गंधक, फॉस्फरस आणि क्लोरीन असल्यामुळे कच्च्या बटाट्याच्या रसाने त्वचा नितळ होण्यासही मदत होते. तसंच या रसातील आम्लामुळे त्वचेतील निर्जीव पेशीही नष्ट होतात. - बटाट्याच्या साली प्रमुख जीवनसत्त्वांची समृद्ध असतात. त्यामुळे बटाटे उकडलेले पाणीही शरीरासाठी गुणकारी ठरतं.
- बटाट्यात प्रोटीनचं प्रमाण तांदळापेक्षा जास्त असतं. त्यामुळे वयोवद्ध आणि अशक्त असलेल्या व्यक्तींनी बटाटे खाणं चांगलं.
- अनेकदा विविध आजारांमुळे डोळे खोल जाऊन डोळ्याभोवती काळी वर्तळ तयार होतात. अशावेळी बटाटे किसून त्याचा कीस कापडात बांधावा आणि तो बोळा डोळ्यांवर ठेवावा. यामुळे डोळ्याभोवतीची काळी चर्तुळ नाहीशी होतात.
१०० गॅम बटाट्यातील अन्नमूल्य:
आर्द्रता | ७४.७ टक्के |
प्रथिने | १.६ टक्के |
मेद | ०.१ टक्के |
खनिजे | ०.६ टक्के |
तंतुमय पदार्थ | ०.४ टक्के |
पिष्टमय पदार्थ | २२.६ टक्के |
बटाट्यातून मिळणारी खनिजं व जीवनसत्त्वं
कॅल्शियम | १० मिली ग्रॅम |
फॉस्फरस | ४० मिली ग्रॅम |
लोह | ०.७ मिली ग्रॅम |
‘क’ जीवनसत्व | १७ मिली ग्रॅम |
बटाट्यामधील पोषक तत्त्वे :
- बंटाट्यातील लोह शरीरातील रक्तवाढीसाठी पूरक ठरतं.
- बटाट्यातल्या कॅल्शियममुळे शरीरातील हाडं मजबूत होतात.
- बटाट्यातील फायबरमुळे पोटातील आतड्यांमधलं वातावरण निर्मळ राहातं.
- बटाट्यात पोटॅशियम असल्यामुळे शरीराला आवश्यक असणाऱ्या मिठाचा समतोल राखला जातो.
- बटाटा पिष्टमय असल्यामुळे पोट व्यवस्थित भरतं.
- बटाट्यात ‘क’ जीवनसत्त्व असल्यामुळे सर्दीसारख्या रोगांना ते आवर घालतं.
- बटाट्यात पॅन्टोथेनिक ऑसिड असतं. ते माणसाला स्ट्रेसपासून बचावण्यात काम करतं.
- बटाट्यात आम्लाऐवजी अल्क असल्यामुळे तो ऑसिडीटी नाशकही आहे.