Dalimb Information in Marathi
लाल रंगाचे आकर्षक फळ, त्याची दाणे सुद्धा लाल रंगाची, पाणीदार व चवीला गोड लागणारी.
डाळिंबात मुबलक घटक प्रमाणशीर असतात,त्यात पाणी, ऊर्जा, प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट, फायबर, साखर तर व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी6 आणि खनिजांमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, जस्त इ.असे गुणधर्मी असलेले डाळिंब.
डाळिंब फळाची संपूर्ण माहिती – Pomegranate Information in Marathi
हिंदी नाव : | अनार |
इंग्रजी नाव : | Pomegranate |
डाळिंबाच्या झाडांची उंची साधारणपणे बारा ते पंधरा फूट असते. याचे खोड धुरकट तांबड्या रंगाचे असते. या झाडाच्या फांद्यावर काटे असतात. पाने हिरवी व दोन-तीन इंच लांब असतात. या झाडाची फुले लाल रंगाची असतात. फळे गोल असतात. फळाला वरून साल असते. आतमध्ये अनेक पापुद्रे असतात. त्यात असंख्य दाणे असतात, ते दाणे लाल व गुलाबी रंगाचे असतात.
डाळिंबाचे रसानुसार गोड, आंबट गोड आणि आंबट असे तीन प्रकार पडतात.
जाती: व्यवहारात डाळिंबाच्या दोन जाती प्रसिद्ध आहेत. पांढऱ्या दाण्याची मस्कती डाळिंबे व ‘बेदाणा’ जातीची काबुली डाळिंबे.
डाळिंबाचे औषधी उपयोग – Benefits of Pomegranate
डाळिंबाची फळे, फुले, मूळ, फळांवरील साल यांचा उपयोग औषध म्हणून केला जातो,
- डाळिंबाचे फळ रुचिवर्धक, भूक वाढविणारे आहे.
- लहान मुलांना अतिसार झाला असेल तर कोवळ्या फुलांचे चूर्ण शेळीच्या दुधात द्यावे.
- रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, उष्णतेचा त्रास कमी होण्यासाठी डाळिंबाचा रस उपयोगी पडतो.
- खोकला झाला तर डाळिबाचा रस उपयुक्त आहे. या फळाच्या सालाच चूर्ण कफनाशक आहे.
- नाकातून रक्तस्राव होत असल्यास सालीचे चूर्ण उपयोगी पडते.
- डाळिंबाच्या रसात खडीसाखर घालून प्यायल्याने पित्त कमी होते.
- हाडे मजबूत करण्यासाठी आणि सांधेदुखी च्या समस्यातून बाहेर निघण्यासाठी रोज डाळिंबाचे सेवन करावे.
- गरोदरपणात स्त्रियांना भरपूर फायदे होतात.
- केस गाळण्याची समस्या दूर होते. कुरळे, कोरडे व निर्जीव केस मजबूत बनण्यास मदत होते.
- त्वचे साठी सुद्धा हे उपयोगी फळ आहे.
- मूतखडा चा त्रास (किडनी स्टोन ) यापासून बराच आराम मिळतो. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डाळिंब खावे.
- वजन कमी करण्यासाठी डाळिंब खूप फायदेशीर आहे.
- या झाडापासून दाडिमाष्टक चूर्ण, दाडिमडिघृत, दाडिमादि चूर्ण, दाडिमाद्यतेल, दाडिमावलेह ही आयुर्वेदिक औषधे बनविली जातात.
इतर माहिती : बारा महिने येणाऱ्या या फळाच्या सततच्या मागणीमुळे शेतकऱ्यांचा विशेष फायदा होतो. असे हे बहुगुणी डाळिंबाचे झाड अंगणात लावतात.
डाळिंब फळाबद्दल विचारले जाणारे काही प्रश्न – Quiz question about Pomegranate
उत्तर: डाळिंबाचे इंग्रजीत Pomegranate तर हिंदीत अनार व शास्त्रीय नाव प्युनिका ग्रॅनेटम् आहे.
उत्तर: डाळिंबात मुबलक घटक प्रमाणशीर असतात,त्यात पाणी, ऊर्जा, प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट, फायबर, साखर तर व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी6 आणि खनिजांमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, जस्त इ.असे गुणधर्मी असलेले डाळिंब.
उत्तर: डाळिंब जास्त खाल्याने गॅस, खोकला, त्वचेवर खाज किवा पुरळ येऊ शकतात. तसेच जी रुग्ण औषधे घेत असतील त्यांना side effect होऊ शकतात. त्यामुळे डाळिंब हे योग्य सल्ल्याने खावी.
उत्तर: भारत तसेच आफ्रिका, काबुल व इराण येथे होते. डाळिंबापासून उत्पादनात कंपन्या जाम, ज्यूस, फ्रूट सँडल तयार करतात.