Polo Information in Marathi
जगात नानाविध खेळ खेळले जातात. चांगले आरोग्य आणि मनोरंजन या दोन्ही गोष्टींचा योग म्हणजे खेळ. जसे कि हॉकी, टेनिस, कबड्डी इ. खेळ जगप्रसिद्ध आहेत, यांपैकीच आणखी एक खेळ म्हणजे पोलो. आपल्याला माहित असेल कि पोलो हा घोड्यावर बसून खेळला जातो. परंतु मित्रांनो जगात पोलोचे आणखीही खूप प्रकार आहेत.
चला तर मग, आज आपण या अफलातून खेळाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
पोलो खेळाचा संपूर्ण इतिहास आणि माहिती – Polo Information in Marathi
पोलो खेळाचा इतिहास – Polo History in Marathi
पोलो हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जात आहे. अगदी राजे आणि महाराजे यांच्या काळात जर सैनिक म्हणून काम करायचे असल्यास पोलो खेळ खेळवला जायचा. अर्थात त्या काळातील पोलो आणि आधुनिक पोलो यांत खूप अंतर आहे. या खेळातून घोडेस्वारी आणि निर्णय क्षमता कळायची. तेव्हा तब्बल १०० -१०० सैनिक हा खेळ सोबत खेळायचे. एक प्रकारे युद्ध कौशल्य येथे बघितल्या जात होते.
आधुनिक पोलो खेळाची सुरुवात मध्य आशिया खंडात झाल्याचे समजते आणि येथूनच तो संपूर्ण जगात प्रसिद्ध झाल्याचे समजते. भारतामध्ये या खेळाची सुरुवात मणिपूर येथील सिलचर या ठिकाणी झाली. सिलचर मधील स्थानिक हा खेळ खेळत होते. येथूनच चहाच्या व्यापारासाठी आलेले इंग्रज पोलो खेळ खेळायला शिकले.
पोलो खेळासाठी लागणारे साहित्य – Polo Equipment
पोलो खेळायचे असल्यास आपल्याला पोलो स्टिक, चेंडू, घोडा, हेल्मेट आणि मैदान इ. महत्वाच्या गोष्टी लागतील. यांव्यतिरिक्त नी गार्ड (गुडघ्या साठी) आणि ग्लब्स सुद्धा लागतील.
पोलो खेळाचे नियम – Polo Rules
खेळामध्ये खेळाडूंच्या हाती एक पोलो स्टिक असते. या स्टीकच्या सहाय्याने खेळाडू चेंडूला फटका मारतो. फटका मारतांना चेंडू विरुद्ध संघाच्या गोल पोस्ट मध्ये मारावा हा हेतू असतो. असे केल्यास गुण मिळतात आणि शेवटी ज्या संघाची गुणसंख्या जास्त तो संघ विजयी ठरतो.
सुरुवात करताना, दोन्ही संघांच्या मध्ये पंच चेंडू उसळतात आणि खेळाला सुरुवात होते. पोलो एकूण ४ डावांमध्ये खेळला जातो. प्रत्येक डाव ७ मिनिटांचा असतो.
पोलो खेळाचे मैदान – Polo Ground or Polo Court
या खेळाचे मैदान आयताकृती असून मैदानाची लांबी २७४.३२ मी आणि रुंदी १८२.८८ मी असते. मैदानात दोन्ही संघांचे गोल पोस्ट राहतात. हे गोल पोस्ट वरच्या दिशेला उघडे असतात तसेच त्यांचा मधील अंतर ७.३१ मी असते.
पोलो खेळातील खेळाडू – Number of players in Polo
हा खेळ दोन संघांत खेळला जातो. यापैकी प्रत्येक संघात ४ खेळाडू असतात.
पोलो खेळाचे प्रकार – Other Types of Polo Game
जगात हॉर्स पोलो खूप प्रसिद्ध असला तरी देखील या खेळाचे विविध प्रकार पाहायला मिळतात. जसे कि,
- वॉटर पोलो : पाण्यात खेळला जातो. (Water Polo game)
- बीच पोलो : समुद्र किनारी खेळला जातो.
- बाईक पोलो : सायकल वर बसून खेळला जातो. (Bike Polo)
- एलीफंट पोलो : हत्तीवर बसून खेळला जातो. (Elephant Polo)
- स्नो पोलो : बर्फाच्या मैदानावर खेळला जातो. (Snow Polo)
पोलो खेळातील भारतीय खेळाडू – Indian Polo Players
१. कर्नल रवी राठोड
२. अभिमन्यू पाठक
३. सिमरन सिंह शेरगिल
४. धृवपाल गोधरा
५. सैय्यद शमशीर अली इ.
पोलो ह्या खेळाबद्दल विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न – Quiz Questions on Polo
१. पोलो हा खेळ ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सामील आहे का?
उत्तर: १९३६ सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेपासून पोलोला ऑलिम्पिक मधून वगळण्यात आले आहे.
२. वॉटर पोलो हा कुठल्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे?
उत्तर: हंगेरी.
३. पोलो खेळात एकूण किती खेळाडू असतात?
उत्तर: या खेळात दोन संघ खेळतात. प्रत्येक संघात ४ असे एकूण ८ खेळाडू खेळतात.
४. भारतात पोलो हा खेळ खेळला जातो का?
उत्तर: होय. भारतातील अनेक राज्यांत पोलो खेळला जातो.
५. पोलो खेळाची सुरुवात कुठे झाली?
उत्तर: या खेळाची सुरुवात मध्य आशिया खंडात झाली असून आधुनिक पोलोची सुरुवात भारतातील मणिपूर राज्यात झाल्याचे समजते.