Poem on Success
जीवनात प्रत्येकाचे काही ना काही ध्येय असतातच, आपले लक्ष्य प्राप्त करण्यासाठी हि कविता आपल्याला थोडीशी प्रेरणा देऊन जाईल, यशप्राप्ती साठी माणसाला बर्याच समस्यांना सामोरे जावे लागते, त्या समस्यांना न घाबरता पुढे कसे चालत राहावे ते या कवितेद्वारे समजून घेवूया.
उठ माणसा ही वेळ आहे, भरारी अवकाशात घेण्याची कविता – Poem on Success in Marathi
चला तर मग बघूया कविता….
खूप झाले बहाणे
आता कर तयारी जिंकण्याची ।
उठ माणसा ही वेळ आहे
भरारी अवकाशात घेण्याची।।
कठोर आहेत हे दिवस
जिद्द ठेव त्यावर मात करण्याची।
उठ माणसा ही वेळ आहे
भरारी अवकाशात घेण्याची।।
वाट पाहत बसू नको
तू योग्य वेळ येण्याची।
उठ माणसा ही वेळ आहे
भरारी अवकाशात घेण्याची।।
प्रयत्नांना तू सांगड घाल
तुझ्या मेहनतीची।
उठ माणसा ही वेळ आहे
भरारी अवकाशात घेण्याची।।
जीवन संधी देत आहे तुला
स्वतःला सिद्ध करण्याची।
उठ माणसा ही वेळ आहे
भरारी अवकाशात घेण्याची।।
– युवाकवी
वैभव कैलास भारंबे.
माझ्या कवितांपैकी माझी सर्वात आवडती असलेली कविता जी नेहमी मला एक नवीन प्रेरणा देऊन जाते, आशा करतो तुम्हाला सुद्धा हि कविता वाचून प्रेरणा मिळाली असेल, कविता आवडल्यास आपल्या मित्रांना, नातेवाईकांना प्रेरणा देण्यासाठी या कवितेला त्यांच्याशी शेयर करायला विसरू नका.
मी आणखी अश्याच कविता आणि लेख आपल्यासाठी घेऊन येत राहील.
धन्यवाद आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. आमच्यावर असेच प्रेम करत रहा.