Places on Earth Where There is No Gravity
गुरुत्वाकर्षण शक्ती विषयी सर्वांना माहिती आहे कि, गुरुत्वाकर्षण शक्ती प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे खेचून घेते, आपणही पृथ्वीवर इतक्या चांगल्या प्रकारे चालू शकतो, इकडे तिकडे फिरू शकतो. ते फक्त पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणा च्या शक्तीमुळे.
पण पृथ्वीवरच असे काही ठिकाणं आहेत कि त्या ठिकाणांवर गुरुत्वाकर्षण कामच करत नाही असे म्हणू शकतो. तर आजच्या लेखात आपण असेच काही ठिकाण पाहणार आहोत, जेथे गुरुत्वार्षण शक्ती कामच करत नाही.
तर चला जाणून घेवूया कोणते आहेत ते ठिकाणे.
गुरुत्वाकर्षण शक्ती काम न करणारी ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत.
जगातील पाच ठिकाणे जेथे काम करत नाही गुरुत्वाकर्षण – Places on Earth Where There is No Gravity
१) मिस्ट्री स्पॉट – Mystery Spot
मिस्ट्री स्पॉट हे ठिकाण अमेरिकेच्या कॅलिफोर्निया मधील सांता क्रूज मध्ये आहे, या ठिकाणाचा शोध जवळ जवळ १९३९ मधेच लागला होता पण जेव्हा या ठिकाणाचा शोध लागला तेव्हा सर्व शास्त्रज्ञांना असे वाटायचे कि इथे काही तरी नवीन जादूची शक्ती आहे,
पण या ठिकाणाची योग्य पडताळ केल्यानंतर माहिती झाले कि येथील काही भागात गुरुत्वाकर्षण शक्ती कामच करत नाही. कारण येथे चुंबकीय क्षेत्र खूप कमी प्रमाणात आहे, म्हणून येथे ग्रॅविटी पाहिजे तसे कार्य करत नाही.
येथे वर्षातून बरेचशे पर्यटक फिरायला येतात आणि आनंद घेतात. येथे पाणी खालच्या बाजूला जात नसून वरच्या बाजूला जात. तसेच येथे येणारे पर्यटक या ठिकाणाचा आनंद घेतात,
२) मैग्नेटिक हिल, लदाख – Magnetic Hill India
मैग्नेटिक हिल हे ठिकाण सुद्धा या यादीत समाविष्ट आहे, आपण कधी लदाख ला गेलेलं आहात काय? जर गेलेले असणार तर आपल्याला याविषयी माहिती असेल, या ठिकाणावर सुद्धा आपल्याला पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती कमी असलेली पाहायला मिळते.
मैग्नेटिक हिल या ठिकाणी प्रवासी वाहने २०-२५ किलोमीटर प्रती तासा च्या वेगाने आपोआप चालतात, या जागेवर आल्या नंतर लोक आपली वाहने न्युट्रल करून बंद करतात. आणि वाहने समोर समोर चालत राहतात. लदाख मध्ये हे ठिकाण “मैग्नेटिक हिल” म्हणून ओळखल्या जात.
३) स्पूक हिल, फ्लोरिडा – Spook Hill
स्पूक हिल, फ्लोरिडा हे ठिकाण सुद्धा “मैग्नेटिक हिल” प्रमाणेच आहे, येथे सुद्धा मैग्नेटिक हिल प्रमाणे काही गोष्टी पाहायला मिळतात.
आपण उतारावर कधी तरी आपल्या वाहनाला न्युट्रल करून चालविले असेल, आणि उतारावर वाहन आरामात खाली गेले असेल सुद्धा पण इथे त्याच्या उलट पाहायला मिळते, इथे चढावर वाहने आपोआप वरती जातात.
फक्त आपल्याला या ठिकाणी आपले वाहन उभे करावे लागते. आपले वाहन आपोआप वरच्या बाजूला चालत राहते, असे होण्यामागे येथील गुरुत्वाकर्षण शक्ती उपस्थित नसल्याने पाहायला मिळते.
४) सेंट इग्नास मिस्ट्री स्पॉट.मिशिगन – St. Ignace Mystery Spot, Michigan
हे ठिकाण अमेरिकेच्या मिशिगन मध्ये आहे, या ठिकाणाचा शोध १९५० च्या शतकात लागला होता, जेव्हा काही लोक या ठिकाणाला भेट द्यायला गेले आणि सोबतच येथे काही गोष्टी शोधण्यासाठी गेले असता त्यांचे शोध घेण्याचे उपकरणे बंद पडली होती,
या ठिकाणच्या भागात गुरुत्वाकर्षण शक्ती कमी प्रमाणात पाहायला मिळते. तुम्ही जेव्हा या ठिकाणी जाणार तेव्हा आपल्याला अंतराळातील एखाद्या स्पेसक्राफ्ट मध्ये आल्यासारखा अनुभव येतो.
५) फॅरो वॉटरफॉल,स्कॉटलंड – Faro Waterfall Scotland
आपण कधी एखाद्या धबधब्याला विरुद्ध वाहताना पाहिले आहे का? कधीच नाही आणि बरेच लोकांना हि गोष्ट अशक्य वाटत असेल, पण आपण जेव्हा फॅरो वॉटरफॉल ला पाहणार तेव्हा आपल्याला हि गोष्ट विपरीत होताना दिसेल,
येथील धबधब्याचे पाणी आपल्याला विरुद्ध दिशेने जाताना दिसते. म्हणजेच वरच्या बाजूला आपल्याला हे पाणी येताना दिसते. असे येथे कमी प्रमाणात असलेल्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे होते. जगात अश्याच प्रकारचे आणखी काही ठिकाणे आहेत,
आणि त्या ठिकाणांची माहिती आपण आणखी एखाद्या लेखात पाहूया. तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यावाद.
Thank You So Much And Keep Loving Us!