Parshwanath Chalisa Lyrics
जैन धर्माचे २३ वे तीर्थकर भगवान पार्श्वनाथ यांची आराधना करण्यासाठी पार्श्वनाथ चालीसेचे पठन करण्यास विशेष महत्व देण्यात आलं आहे. या चालीसेमध्ये भगवान पार्श्वनाथ यांची विविध शब्दांत स्तुती केली असून, जैन धर्मीय बांधव मोठ्या प्रमाणात या चालीसेचे पठन करीत असतात. आज आपण सुद्धा या लेखात भगवान पार्श्वनाथ यांच्या चालीसेचे लिखाण केलं आहे.
भगवान पार्श्वनाथ चालीसा – Parshwanath Chalisa
शीश नवा अरिहंत को, सिद्धन करुं प्रणाम |
उपाध्याय आचार्य का ले सुखकारी नाम |
सर्व साधु और सरस्वती, जिन मन्दिर सुखकार |
अहिच्छत्र और पार्श्व को, मन मन्दिर में धार |||| चौपाई ||
पार्श्वनाथ जगत हितकारी, हो स्वामी तुम व्रत के धारी |
सुर नर असुर करें तुम सेवा, तुम ही सब देवन के देवा |
तुमसे करम शत्रु भी हारा, तुम कीना जग का निस्तारा |
अश्वसैन के राजदुलारे, वामा की आँखो के तारे |
काशी जी के स्वामी कहाये, सारी परजा मौज उड़ाये |
इक दिन सब मित्रों को लेके, सैर करन को वन में पहुँचे |
हाथी पर कसकर अम्बारी, इक जगंल में गई सवारी |
एक तपस्वी देख वहां पर, उससे बोले वचन सुनाकर |
तपसी! तुम क्यों पाप कमाते, इस लक्कड़ में जीव जलाते |
तपसी तभी कुदाल उठाया, उस लक्कड़ को चीर गिराया |
निकले नाग-नागनी कारे, मरने के थे निकट बिचारे |
रहम प्रभू के दिल में आया, तभी मन्त्र नवकार सुनाया |
भर कर वो पाताल सिधाये, पद्मावति धरणेन्द्र कहाये |
तपसी मर कर देव कहाया, नाम कमठ ग्रन्थों में गाया |
एक समय श्रीपारस स्वामी, राज छोड़ कर वन की ठानी |
तप करते थे ध्यान लगाये, इकदिन कमठ वहां पर आये |
फौरन ; ही प्रभु को पहिचाना, बदला लेना दिल में ठाना |
बहुत अधिक बारिश बरसाई, बादल गरजे बिजली गिराई |
बहुत अधिक पत्थर बरसाये, स्वामी तन को नहीं हिलाये |
पद्मावती धरणेन्द्र भी आए, प्रभु की सेवा मे चित लाए |
धरणेन्द्र ने फन फैलाया, प्रभु के सिर पर छत्र बनाया |
पद्मावति ने फन फैलाया, उस पर स्वामी को बैठाया |
कर्मनाश प्रभु ज्ञान उपाया, समोशरण देवेन्द्र रचाया |
यही जगह अहिच्छत्र कहाये, पात्र केशरी जहां पर आये |
शिष्य पाँच सौ संग विद्वाना, जिनको जाने सकल जहाना |
पार्श्वनाथ का दर्शन पाया सबने जैन धरम अपनाया |
अहिच्छत्र श्री सुन्दर नगरी, जहाँ सुखी थी परजा सगरी |
राजा श्री वसुपाल कहाये, वो इक जिन मन्दिर बनवाये |
प्रतिमा पर पालिश करवाया, फौरन इक मिस्त्री बुलवाया |
वह मिस्तरी मांस था खाता, इससे पालिश था गिर जाता |
मुनि ने उसे उपाय बताया, पारस दर्शन व्रत दिलवाया |
मिस्त्री ने व्रत पालन कीना, फौरन ही रंग चढ़ा नवीना |
गदर सतावन का किस्सा है, इक माली का यों लिक्खा है |
वह माली प्रतिमा को लेकर, झट छुप गया कुए के अन्दर |
उस पानी का अतिशय भारी, दूर होय सारी बीमारी |
जो अहिच्छत्र ह्रदय से ध्वावे, सो नर उत्तम पदवी वावे |
पुत्र संपदा की बढ़ती हो, पापों की इक दम घटती हो |
है तहसील आंवला भारी, स्टेशन पर मिले सवारी |
रामनगर इक ग्राम बराबर, जिसको जाने सब नारी नर |
चालीसे को ‘चन्द्र’ बनाये, हाथ जोड़कर शीश नवाये |सोरठा:
नित चालीसहिं बार, पाठ करे चालीस दिन |
खेय सुगन्ध अपार, अहिच्छत्र में आय के |
होय कुबेर समान, जन्म दरिद्री होय जो |
जिसके नहिं सन्तान, नाम वंश जग में चले ||
भगवान पार्श्वनाथ यांचे अनुयायी मंदिरात किंवा आपल्या घरी रोज त्यांची आराधना करीत असतात. कारण जैन धर्मात आपल्या तीर्थकरांची आराधना करण्यास विशेष महत्व दिल आहे. तसचं, त्यांनी दिलेली शिकवण आपल्या आचरणात आणण्यास विशेष भर देण्यात आला आहे.
त्यामुळे जैन बांधव आपल्या जीवनांत तीर्थकारांच्या आज्ञेनुसार आचरण करीत असतात. जैन ग्रंथांनुसार जैन धर्म हा अति प्राचीन धर्म असून जैन धर्माचे पहीले तीर्थकर भगवान आदिनाथ यांच्यापासून अस्तित्वात आलेल्या या धर्माची शीला जैन धर्माचे २४ वे तीर्थकर भगवान महावीर यांच्यापर्यंत जोपासली गेली आहे.
या सर्व तीर्थकाराणी आपल्या कारकिर्दीत जैन धर्माची पताका आपल्या हाती घेऊन जैन धर्म वाढवण्याची महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली.
जैन ग्रंथांमध्ये नमूद असलेली तीर्थकारांची शिकवण मानवी जीवनास खूप लाभदायक आहे. भगवान महावीर यांच्या २५० वर्षापूर्वी म्हणजे इ.स. पू. ८५० च्या सुमारास भगवान पार्श्वनाथ हे जैन धर्माचा २३ वे तीर्थकार होवून गेले आहेत.
भगवान पार्श्वनाथ यांच्या जन्माबाबत सांगण्यात येते की, आज पासून सुमारे तीन हजार वर्षापूर्वी वाराणसी येथील इक्ष्वाकु वंशीय शासक महाराजा अश्वसेन यांच्या पत्नी राणी वामा यांच्या पोटी पौष कृष्ण एकादशीला भगवान पार्श्वनाथ यांचा जन्म झाला होता.
भगवान पार्श्वनाथ राणी वामा यांच्या गर्भात असतांना राणी वामा यांना स्वप्नांत साप दिसला होता. म्हणून त्यांनी आपल्या बालकाचे नाव पार्श्व ठेवले. भगवान पार्श्वनाथ यांजा जन्म राजघराण्यात झाला असल्याने त्यांचे संगोपोन एका राजकुमारा प्रमाणे झाले. त्यामुळे त्यांना दुख म्हणजे काय याची जाणीव नव्हती. त्यांच्या मते आपण जसे जीवन जगत आहो तसेच बाहेरील लोक सुद्धा जगत आहेत.
परंतु, एके दिवशी भगवान पार्श्वनाथ यांच्या दृष्टीसमोर एक घटना घडली एक तपस्वी पंचाग्नी प्रज्वलित करीत आहे आणि त्या अग्नीमध्ये एक सापाचा जोडा मरत आहे. हे दृश्य पाहून त्यांचा दयाहीन धर्मावरचा विश्वास उडाला.
भगवान पार्श्वनाथ तीस वर्षाचे असतांना त्यांनी संन्याशी जीवन जगण्याचा निर्णय घेतला आणि जैन धर्माची दीक्षा घेवून कशी येथील सम्मेद शिखरावर जावून सुमारे ८३ दिवस तपश्चर्या केली. ८३ दिवसाच्या कठोर तपश्चर्येनंतर ८४ दिवशी भगवान पार्श्वनाथ वैकल्य ज्ञान प्राप्त झाले.
ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी जैन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भ्रमंती करण्यास सुरुवात केली. पुंड्र, ताम्रलिप्त या सारख्या देशांचा प्रवास करून या ठिकाणच्या अनेक लोकांना त्यांनी आपले अनुयायी बनवले.
तसचं, चतुर्विध संघाची स्थापना केली ज्यामध्ये मुनी, आर्यिका, श्रावक, श्राविका या पात्राचा समावेश असतो. आज सुद्धा जैन धर्मात हीच परंपरा पाहायला मिळते. भगवान पार्श्वनाथ यांनी जैन धर्माचा प्रचार सुमारे ७० वर्ष केला.
वयाच्या १०० व्या वर्षी भगवान पार्श्वनाथ यांनी सम्मेद शिखरावर निर्वाण केले. यांच्या पूर्वी याठिकाणी जैन धर्माच्या १६ तीर्थकारणी निर्वाण केले होते. त्यामुळे हे शिखर जैन धर्मीयांचे पवित्र स्थळ बनले आहे.
भगवान पार्श्वनाथ यांनी आपल्या प्रवचनातून अनुयायांना दिलेली सत्य, अहिंसा, अस्तेय, आणि अपरिग्रह या विषयाची शिकवण खूप महत्वाची असून आपण आपल्या आचरणात आणली पाहिजे. भगवान पार्श्वनाथ चालीसेचे पठन केल्याने आपल्या मनाला शांती मिळत असून आपले सर्व दुख नष्ट होतात.