Parshwanath Aarti Marathi
जैन सामुदाय हा भारतातील अति प्राचीन समुदाय असून या सामुदायात एकूण २४ तीर्थकार होवून गेले आहे. त्यांपैकी भगवान पार्श्वनाथ हे या सामुदायाचे २३ वे तीर्थकार होते. भगवान पार्श्वनाथ यांनी आपल्या कारकिर्दीत जैन धर्माचा मोठ्या प्रमाणात भारतभर प्रचार आणि प्रसार केला होता. त्यामुळे त्यांना अनेक अनुयायी मिळाले.
भगवान पार्श्वनाथ यांच्या पहिले जैन धर्मात प्रचलित असलेल्या श्रवण धर्माबाबत सर्व सामान्य लोकांना फारशी माहिती नव्हती. भगवान पार्श्वनाथ यांच्यापासून लोकांना श्रमण धर्म समजला. त्यामुळे भगवान पार्श्वनाथ यांच्या कारकिर्दी प्रमाणे त्यांच्या मूर्तीचे दर्शन जरी घेतले तर जीवाला शांती मिळते.
जैन धर्मीय बांधव दरोरोज प्रभू पार्श्वनाथ यांची आराधना करीत असतात. तसचं, त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची स्तुती म्हणून पार्श्वनाथ आरतीचे पठन करीत असतात. पार्श्वनाथ आरतीमध्ये त्यांचे संपूर्ण वर्णन केले आहे.
जैन सामुदाय चे २३ वे तीर्थकार भगवान पार्श्वनाथ यांची आरती – Parshwanath Aarti Marathi
ओं जय पारस देवा स्वामी जय पारस देवा !
सुर नर मुनिजन तुम चरणन की करते नित सेवा |पौष वदी ग्यारस काशी में आनंद अतिभारी,
अश्वसेन वामा माता उर लीनों अवतारी | ओं जय..श्यामवरण नवहस्त काय पग उरग लखन सोहैं,
सुरकृत अति अनुपम पा भूषण सबका मन मोहैं | ओं जय..जलते देख नाग नागिन को मंत्र नवकार दिया,
हरा कमठ का मान, ज्ञान का भानु प्रकाश किया | ओं जय..मात पिता तुम स्वामी मेरे, आस करूँ किसकी,
तुम बिन दाता और न कोर्इ, शरण गहूँ जिसकी | ओं जय..तुम परमातम तुम अध्यातम तुम अंतर्यामी,
स्वर्ग-मोक्ष के दाता तुम हो, त्रिभुवन के स्वामी | ओं जय..दीनबंधु दु:खहरण जिनेश्वर, तुम ही हो मेरे,
दो शिवधाम को वास दास, हम द्वार खड़े तेरे | ओं जय..विपद-विकार मिटाओ मन का, अर्ज सुनो दाता,
सेवक द्वै-कर जोड़ प्रभु के, चरणों चित लाता | ओं जय..
भगवान पार्श्वनाथ यांच्याबद्दल थोडक्यात – Parshwanath Story
भगवान पार्श्वनाथ यांच्या जन्माबाबत जैन ग्रंथांमध्ये वर्णिल्याप्रमाणे त्यांचा जन्म आज पासून सुमारे ३००० वर्षापूर्वी पौष कृष्ण एकादशीच्या दिवशी वाराणसी येथे झाला होता. त्यांचे वडिल अश्र्वसेन हे वाराणसी येथील राजा होते तथा त्यांच्या आईचे नाव वामा होते.
राजघराण्यात जन्म झाल्यामुळे त्यांचे बालपण सुखात गेले. भगवान पार्श्वनाथ राजकुमार म्हणून जीवन जगत असतांना त्यांना आयुष्यात येणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागला नाही. परुंतू, भगवान पार्श्वनाथ जेंव्हा तीस वर्षाचे झाले तेंव्हा त्यांनी राजपाठ सोडून संन्याशी जीवन जगण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे त्यांनी गृह त्याग केला व संन्यासी म्हणून जीवन जगू लागले. आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी ते वाराणसी येथील सम्मेद पर्वतावर ध्यान करू लागले. सुमारे ८३ दिवस कठोर तपश्चर्या केल्यानंतर ८४ व्या दिवशी त्यांना कैवल्य ज्ञान प्राप्त झाले.
कैवल्य ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह या चार चातुर्यामाची शिक्षा दिली. ज्ञान प्राप्त केल्यानंतर भगवान पार्श्वनाथ यांनी सुमारे सत्तर वर्ष आपल्या मत आणि विचारांचा लोकांमध्ये प्रचार आणि प्रसार केला.
आपल्या मतांचा आणि विचारांचा प्रचार करत भगवान पार्श्वनाथ यांनी वयाच्या १०० वर्षी निर्वाण केले. भगवान पार्श्वनाथ हे जैन धर्मातील महान तीर्थकार असून त्यांनी विचाराच्या माध्यमातून अनेक स्त्री पुरुषांना आपले अनुयायी बनवले होते.
भगवान पार्श्वनाथ जैन धर्मियांचे तीर्थकार होण्याबाबत लोकांची अशी धारणा आहे की, भगवान पार्श्वनाथ यांना तीर्थकर बनण्यासाठी नऊ जन्म घ्यावे लागले होते. पहिला जन्म ब्राह्मण, दुसरा जन्म हत्ती, तिसरा जन्म स्वर्ग लोकांतील देवता, चोथा जन्मात राजा, पाचवा जन्म देव, सहावा जन्म चक्रवर्ती सम्राट, सातवा जन्म देवता, आठव्या जन्मात राजा, आणि नव्या जन्मात राजा इंद्रदेव हे नऊ जन्म घेतल्यानंतर दहाव्या जन्मात त्यांना जैन धर्मियांचे तीर्थकर होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले.
भगवान पार्श्वनाथ यांनी त्यांच्या पूर्व जन्मात केलेल्या पुण्य कर्माचे फळच म्हणावे लागेल. भगवान पार्श्वनाथ यांनी आपल्या अनुयायांना दिलेली शिकवण खूप मौल्यवान असून आपण ती आपल्या आचरणात आणायला पाहिजे.
मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून जैन धर्माचे २३ वे तीर्थकर भगवान पार्श्वनाथ यांची आराधना करण्यासाठी पठन करण्यात येत असलेल्या पार्श्वनाथ आरतीचे लिखाण केलं असून, भगवान पार्श्वनाथ यांच्याबाबत थोडक्यात माहिती मिळवली आहे.
वरील लेखातील संपूर्ण माहिती आम्ही इंटरनेटवरून मिळवली असून, आपणास देखील भगवान पार्श्वनाथ यांच्या आरतीचे महत्व कळावे याकरिता आम्ही या आरतीचे लिखाण केलं आहे.