Parbhani Jilha Mahiti
महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील आठ जिल्हयांपैकी एक परभणी!
पुर्वीचा ’प्रभावतीनगर’ नावाने ओळखला जाणारा आजचा परभणी….
परभणी जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Parbhani District Information in Marathi
संपुर्ण मराठवाडा क्षेत्रच पुर्वी निजामांच्या राज्याचा हिस्सा होते पुढे हैदराबाद राज्याचा हिस्सा बनले आणि त्यानंतर 1956 ला राज्यांच्या पुर्नगठनानंतर बाॅम्बे राज्याचा हिस्सा बनले आणि 1960 नंतर मात्र महाराष्ट्राचा भाग झाले.
जिल्हयाच्या उत्तरेला हिंगोली, पुर्वेला नांदेड, दक्षिणेला लातुर आणि पश्चिमेला बीड आणि जालना जिल्हा आहे.
आज परभणी मुंबई व्यतिरीक्त राज्यातील इतर शहरांशी आणि शेजारच्या आंध्रप्रदेश राज्याशी रस्त्याने चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे.
परभणी जिल्हयाच्या पुर्वेला अजिंठा पर्वतरांगा (जिंतुर तालुक्यातुन जातात) आणि दक्षिणेकडे बालाघाट च्या पर्वतरांगा दिसुन येतात.
हिंदुंच्या आणि जैन धर्मीयांच्या धार्मिक पर्यटनाकरता देखील हा जिल्हा ओळखला जातो.
परभणी जिल्हयातील तालुके – Parbhani District Taluka List
परभणी जिल्हयात एकुण 9 तालुके आहेत
1) परभणी
2) गंगाखेड
3) सोनपेठ
4) पाथरी
5) मानवत (या तालुक्याचे पुर्वीचे नाव मणिपुर असे होते)
6) पालम
7) सेलु
8) जिंतुर
9) पुर्णा
परभणी जिल्हयाविषयी उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती – Parbhani Jilha Chi Mahiti
- लोकसंख्या (Population) 18,36,086
- क्षेत्रफळ 6,250.58 वर्ग कि.मी.
- जिल्हयातील मुख्य भाषा मराठी
- एकुण गावं 848
- साक्षरतेचे प्रमाण 77.75%
- 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 958
- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 हा या जिल्हयातुन गेला आहे.
- परभणीत मराठवाडा कृषी विद्यापिठ असुन याचे नाव वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ असे आहे.
- शिर्डीच्या साईबाबांचा जन्म याच जिल्हयातल्या पाथरी गावचा.
- शहराजवळ दत्तधाम हे दत्तपीठ आहे.
- नर्साी चे नामदेव महाराज, गंगाखेड येथील संत जनाबाई, बोरी चे गणिती भास्कराचार्य याच जिल्हयातले.
- राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराज जिंतुर तालुक्यात पाचलेगांव या ठिकाणी जन्माला आले.
- हजरत शाह तुराबुल हक दरगाह नावाचा मुस्लिम संतांचा मकबरा परभणी मधे आहे.
- जिंतुर तालुक्यात जैन धर्माच्या निमगिरी नावाच्या गुफा आहेत.
पर्यटन आणि तिर्थस्थळं – Places To Visit Near Parbhani
- मुद्गलेश्वर महादेव मंदिर – Mudgaleshwar Temple
गोदावरी नदीच्या पात्रात मधोमध महादेवाचे मंदिर उभारले आहे.
अहिल्यादेवी होळकरांनी 250 वर्षांपुर्वी या मंदिराचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते.
या मंदिराविषयी माहिती घेत असतांना हे मंदिर सुमारे 900 वर्षापुर्वीचे असल्याचे या ठिकाणी असलेल्या शिलालेखावरून लक्षात येते.
पावसाळयात तर हे मंदिर काही महिने पाण्याखालीच असते, या ठिकाणी नारायण नागबळी आणि सुखशांती करता पुजाअर्चा देखील केल्या जातात.
मुद्गल पुराणात या ठिकाणचा उल्लेख सापडतो याला देवभुमी देखील म्हंटल्या गेले आहे.
या ठिकाणी दर्शनाकरता येण्याचा योग्य कालावधी एप्रील ते जुन हा आहे.
भगवान शंकरा व्यतिरीक्त नृसिंहाचे आणि श्री गणेशाचे देखील मंदिर या ठिकाणी आहे. महाशिवरात्रीला असंख्य भाविक या मंदिरात मुद्गलेश्वराच्या दर्शनाकरता येतात.
- श्री दिगंबर जैन अतिशय क्षेत्र निमगिरी संस्थान जिंतुर – Digambar Jain Atishay Kshetr Nemgiri
जिंतुर पासुन साधारण 3 कि.मी. अंतरावर नैसर्गिक सौंदर्यात वसलेले हे ठिकाण परभणी वासीयांचे आवडते ठिकाण आहे, कारण प्राकृतिक सौंदर्याने नटलेल्या या ठिकाणी अतिशय पवित्र वातावरणात निमगिरी आणि चंद्रगिरी नावाच्या दोन पर्वतांवर श्री दिगंबर जैन अतिशय क्षेत्र वसलेले आहे.
सहयाद्रि पर्वतांच्या उप रांगामधल्या पर्वतावर हे तिर्थक्षेत्र आहे.
या प्राचीन कलात्मक आणि चमत्कारी जैन गुफा आणि मंदिरं सर्वदुर प्रसिध्द असल्याचे सांगण्यात येते.
पुर्वी हे ठिकाण जैनपुर या नावाने ओळखले जायचे, राष्ट्रकुट साम्राज्यात या पवित्र स्थळाचा विकास झाला त्यानंतर आक्रमणकत्र्यांनी हे ठिकाण नष्ट केले आणि आता वर्तमानात हे जिंतुर म्हणुन ओळखले जाऊ लागले.
प्राचीन काळी जवळपास 300 जैन कुटुंब आणि 14 जैन मंदिरं येथे अस्तित्वात होती, काळाच्या ओघात मात्र आता केवळ 2 मंदिरं शिल्लक राहिली आहेत.
- श्री नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर नवगढ – Shri Neminath Digambar Jain Temple Navagad
नवगढ येथील श्री नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर आपल्या वास्तुकलेकरता आणि प्राचीन कलात्मकतेकरता फार प्रसिध्द आहे.
हे मंदिर पुर्णा नदिच्या किना.यापासुन 2 कि.मी. अंतरावर असुन साधारण 1931 साली हे मंदिर बनवण्यात आले आहे, त्यावेळेस या मुर्तीला येथे स्थापीत करण्यात आले.
या मंदिराच्या निर्माणाकरता निजामाने त्वरीत 10 एकर जमिन दिली होती.
नवगढ चे हे मंदिर कलात्मक, विशाल आणि खुप उंच शिखर आहे.
येथील देवगिरी भगवानाची सुरेख साडे तिन फुटाची मुर्ती काळया पाषाणात पद्मासनात विराजमान आहे.
मंदिराला आतल्या बाजुने चोहीकडे आरसे लावले असुन ते अतिशय सुंदर आणि रेखीव कलाकुसरीने केल्याने सुरेख भासते.
या शांत परिसराला भेट देण्याकरता नवगढ ते परभणी हे अंतर 40 कि.मी. तर नांदेड 60 कि.मी. अंतरावर आहे.
- हजरत तुराबुल हक दर्गा – Dargah Hazrat Syed Shah Turabul Haq
हजरत तुराबुल हक दर्गा हे परभणीतले मुस्लीमांचे श्रध्दास्थान असुन आपल्या वार्षीक मोहात्सवाकरता फार प्रसिध्द आहे.
दरवर्षी 2 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान सर्व धर्माचे हजारो अनयायी या ठिकाणी एकत्र येतात.
ही दर्गा सर्व धर्म समभावाचे प्रतिक असुन संपुर्ण राज्यातुन भाविक दर्शनाकरता येथे येतात. भाविकांच्या अनुभवानुसार जे भाविक या ठिकाणी येतात त्यांच्या ईच्छा पुर्ण होतात अशी त्यांची भावना आहे.
या दग्र्याची लोकप्रीयता एवढी आहे की याला महाराष्ट्रातील अजमेर शरीफ देखील म्हंटल्या जातं.
उत्तम आरोग्याच्या आशेने देखील हजारो रूग्णं या ठिकाणी येतात. 2015 साली फेबु्रवारी महिन्यात उत्सवादरम्यान जवळजवळ 5 लाख भाविक या ठिकाणी आले होते.
- नृसिंह मंदिर पोखर्णी – Narasimha Mandir
परभणी पासुन जवळजवळ 18 कि.मी. अंतरावर असलेले पोखर्णी हे गांव श्री नृसिंह संस्थानामुळे पंचक्रोशीत आणि जिल्हयात प्रसिध्द आहे. येथे महाराष्ट्रा व्यतिरीक्त आंध्र प्रदेशातुनही भाविक दर्शनाकरता येतात.
श्री नृसिंह भगवान याठिकाणी देवी लक्ष्मी सोबत विराजमान असुन हे जागृत देवस्थान म्हणुन प्रसिध्द आहे. मंदिर परिसर अतिशय विस्तीर्ण असुन गाभारा मात्र लहान आहे आणि या गाभा.यात प्रवेश करण्याचे व्दार अडीच ते 3 फुट असल्याने भाविकाला दर्शनाकरता वाकुन जावे लागते.
हे मंदिर अतिशय प्राचीन असुन जवळ जवळ 1000 वर्षांपुर्वी बनले असल्याचे सांगण्यात येते, वास्तुकला हेमाडपंथी असुन एका राजाने हे मंदिर बांधले आहे.
राजाच्या अंध मुलीला नृसिंह भगवानाच्या कृपेने दिसायला लागल्याने राजाची येथे अपार श्रध्दा बसली आणि त्याने नवीन मंदिर बनवुन मुर्तीला तेथे हलवण्याचा विचार व्यक्त केला पण गावक.यांनी त्याला विरोध केल्याने येथेच राजाने हे मंदिर बांधले.
महाराष्ट्र शासनातर्फे या तिर्थस्थळाला बी ग्रेड मिळाला असुन विकास कार्य प्रगतीवर असल्याचे पाहुन लक्षात येते.
मुर्ती क्रोधीत मुखवटयाची असुन सुवर्ण अलंकारांनी तिला सुशोभीत करण्यात येते. शेजारीच परमेश्वराकरता विश्रामासाठी मोराच्या पिसांनी गादी तयार केली आहे.
मंदिर परिसरात शिवलिंगाव्यतिरीक्त भगवान गणेशाचे देखील मंदिर आहे. पुष्करणी तिर्थ म्हणुन खोल विहीर असुन त्या विहीरीला चारी बाजुने सलग अखंड पाय.या आहेत. हे पुष्करणी तिर्थ 1200 वर्ष जुने असल्याचे बोलले जाते.
नृसिंहाच्या नवरात्रात आणि नृसिंह जयंतीला भगवंताचा उत्सव अतिशय दिमाखात साजरा होतो इतरवेळीही दर शनिवारी या ठिकाणी दर्शनाकरता गर्दी असते.
नृसिंहाच्या मुर्तीची दस.याला मिरवणुक निघते, ही मिरवणुक देवीची भेट घेतल्यानंतर परत माघारी येते. ही प्रथा देखील पुर्वापार चालत आल्याचे येथील भाविक सांगतात.
- श्री साईबाबा मंदिर पाथरी – Sri Sai Janmasthan Temple, Pathri
श्री साईबाबांचे जन्मस्थान परभणी जिल्हयातील पाथरी असुन या ठिकाणी साई बाबांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. येथे साई बाबांची सिंहासनाधिष्ठीत मोठी मुर्ती असुन त्यांचे जन्मस्थान, त्यांचे मुळ घर, त्यांच्या घरातील भांडी, चमत्कारीक उदी, या सर्व गोष्टी या जागी अतिशय व्यवस्थित जतन करून ठेवल्या आहेत.
श्री साई स्मारक समितीने मंदिराकरता जागा घेउन तेथे भव्य असे मंदिर बांधले आहे, साधारण 1994 ला मंदिराची निर्मीती सुरू झाली आणि 1999 ला मंदिर भाविकांकरता खुले करण्यात आले.
श्री स्वामी साई शरणानंदाची या ठिकाणी प्रतिमा लावण्यात आली असुन त्यांना प्रत्यक्ष साई बाबांचा सहवास लाभला असल्याने त्यांनीच साईबाबांचा जन्म पाथरी या गावातला असल्याचे सांगितले त्यामुळेच ऐवढे पवित्र ठिकाण समजु शकल्याने त्यांची प्रतिमा आणि त्यांच्याविषयी विस्तृत माहिती या ठिकाणी लिहीली आहे.
त्यांच्या शेजारीच श्री बल्बबाबा यांची प्रतिमा आणि त्यांच्याविषयीची माहिती येथे लिहीली असुन त्यांनीच पाथरीला साईबाबांचे भव्य मंदिर तयार होईल अशी भविष्यवाणी केली होती.
- श्री मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिर – Shri Mrityunjay Pardeshwar Mahadev Temple
पारदेश्वर हे शिवाचे 80 फुट एवढे भव्य मंदिर परभणी शहरात असुन श्री स्वामी सच्चीदानंदजी सरस्वती यांनी या मंदिराचे निर्माण केले आहे. या मंदिराचे मुख्य वैशिष्टय म्हणजे या ठिकाणी 250 किलो ग्राम ची ’’पा.याची’’ (Mercury) शिव पिंड आहे.
भारतातील मोठया शिवलिंगांपैकी हे एक शिवलिंग असुन हजारो भाविक या ठिकाणी या शिवलिंगाचे दर्शन घेण्याकरता येतात. या शिवलिंगाला ’तेजोलिंग’ देखील म्हणतात आणि याला 12 ज्योर्तिलिंगा इतकेच महत्वाचे मानले जाते.
आणखी वाचा:
लक्ष्य दया: तुमच्या जवळ परभणी जिल्ह्याबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्